भंडाराच्या बायपास महामार्गावरील उड्डाण पुलावरुन मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. होंडा सिटी कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती- पत्नीसह त्यांचे दोन चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. उड्डाणपुलावरून जाणाऱ्या दुचाकीला होंडा सिटीने मागेहुन जोरदार दिली. ही घटना आज (२१ जून) पहाटेच्या सुमारास घडली.
वाढदिवसादिवशीच काळाचा घाला; डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणीचा मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, ही घटना भांडाराच्या बायपास महामार्गावरील कोरंबी देवस्थानाजवळ घडली. यात अपघातग्रस्त कुटुंब हे लाखनी येथून भंडाऱ्याच्या परसोडी या गावाकडं जात असताना हा अपघात घडला. यातील सर्व जखमींवर भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.देविदास नांन्हे (वय 37), कविता नान्हे (वय 32), चेतना नान्हे (वय 8), दिव्यांश नान्हे ( वय 5) असं अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पूढील कारवाई सुरू केली असून या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Satara News : कोयत्याचा धाक दाखवत अडीच लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला
हेळगाव (ता. कराड) येथील रस्त्यालगत असणाऱ्या घरात अज्ञात चोरट्यांनी महिलेला व कुटुंबातील लोकांना कोयत्याच्या धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोन महिलांच्या गळ्यातील मिनी गंठण व कपाटातील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण अडीच लाखांवर डल्ला मारला. जबरी चोरीचा हा प्रकार शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडला. चोरट्यांचा शेजारील बंद घरे फोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. चोरीच्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेळगावला कराड-कोरेगाव रस्त्यालगतच्या सुनंदा संजय सूर्यवंशी यांच्या घराचा किचनचा दरवाजा जोरजोरात आपटत चोरट्यांनी कडी काढून आत प्रवेश केला. त्यावेळी सुनंदा या जाग्या झाल्या. टी-शर्ट व बरमोडा घातलेला ३० ते ३५ वयोगटातील दोन चोरट्यांनी सुनंदा सूर्यवंशी यांना कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने त्यांच्या व मुलीच्या गळ्यातील सोन्याची मिनी गंठण हिसकावून घेतले.
दरम्यान, किचनच्या शेजारील बेडरूममधील लोखंडी कपाट ड्रॉवर उचकटून सोन्याचे एक ग्रॅम वजनाचे डूल असा एकूण सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकूण अडीच लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करत ऊसाच्या शेतातून पोबारा केला.
चोरट्यांनी बाजूच्या नंदा हनमंत जाधव, जयवंत निवृत्ती कांबळे,बाबासो जगन्नाथ पाटील, अर्जुन भिमराव सुर्यवंशी यांची बंद घरे फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. चोरीची फिर्याद सुनंदा सूर्यवंशी यांनी मसूर पोलिसात दिली आहे. तपास सपोनि आदिनाथ खरात करीत आहेत.
HIT AND RUN: 19 वर्षीय तरुणीने उडवली स्कुटी, अपघातात महिलेचा मृत्यू