संग्रहित फोटो
पुणे : मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे वाल्मिक कराड याचे एक एक कारनामे समोर येत आहेत. वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. कुटुंबियांच्या नावे आणि इतरांच्या नावाने त्याने संपत्ती जमवल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. पुणे शहरातही वाल्मिक कराड याने मोठ्या प्रमाणावर संपत्तीची खरेदी केल्याचा आरोप होत आहे. वाल्मीक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्याने आपल्या पत्नी, मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर ही संपत्ती ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांने विदेशात देखील गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.
वाल्मीक कराडच्या संपत्तीचा थांगपत्ता अजूनही लागला नसून बीड, पुण्यापासून ते थेट सोलापूर जिल्ह्यातील बार्शीपर्यंत त्याची संपत्ती असल्याचे दिसून येत आहे. पुण्यामध्ये वाल्मीक कराडची 100 कोटींवर संपत्ती असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर पुण्यामध्ये दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट असल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बार्शीमध्ये तब्बल 35 एकर जमीन वाल्मीक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. अंदाजे मूल्य सुमारे दीड कोटी रुपयांच्या घरात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधवच्या नावे चार जमिनीचा सातबारा आहे. या संदर्भातील ट्विट सुद्धा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलं आहे. यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा वाल्मीक कराडची मोठी संपत्ती असल्याचे समोर आले होते. दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट ज्योतीच्या नावे होते. त्यामुळे पुण्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता कोट्यवधींची जमीन आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, सोलापुरातील बार्शीमधील शेंद्री गावात जाधव यांच्या मालकीच्या ४ शेतजमिनी असल्याची माहिती मिळाली. गट क्रमांक ५०४ मधील उपविभाग १, २, ३, ४ अशा एकूण ४ शेतजमिनी ज्योती जाधवच्या मालकीच्या आहेत. या सगळ्या जमिनींचं एकूण क्षेत्रफळ ३५ एकरांच्या घरात जातं. बाजारभावानुसार त्यांचं मूल्य दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे.
हे सुद्धा वाचा : तरुणाई वाईटाच्या मार्गावर! ‘ऑनलाईन मटका तेजीत’; पोलिसांचे दुर्लक्ष?
दमानिया यांची पोस्ट
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत खळबळजनक दावा केला आहे. सोलापुरमध्ये ज्योती मंगल जाधव महिलेच्या नावावर चार सातबारे असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही महिला कोण आहे? याचा ईडीने तपास करावा, तसेच या जमिनी विकत घेण्यासाठी पैसे कुणी दिले, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी पोस्टद्वारे केली आहे.
वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असे काही माध्यमांनी दाखवले. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का ? ह्याच्या नावाचे हे सोलापुरातले हे ४ सातबारे आहेत. ह्या ज्योति मंगळ जाधव कोण आहेत, ह्याचा तपास ED ने करावा. कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील… pic.twitter.com/uRy2VNQbPS
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 17, 2025