दारूच्या व्यसनाच्या अधीन गेलेल्या मुलांनी आपल्या आईची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून सावत्र मुलाने खलबत्त्याने डोके ठेचून निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १५) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरातील भारतनगरमध्ये घडली. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) असे आहे. तर आरोपी मुलाचे नाव विजय अरुण निकम (वय ३५) असे आहे. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.
कराडमध्ये एकाला मित्रांकडूनच मारहाण; एका मेसेजबद्दल विचारले अन्…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार. सावित्रीबाई निकम या महाद्वार रोड परिसरात किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करत होत्या. त्यांचा सावत्र मुलगा विजय निकम हा अधूनमधून सेंट्रिंग आणि डिजिटल बोर्ड पेस्टिंगचे काम करत होते. मात्र त्याला दारूचे व्यसन लागले होते. आई- वडिलांच्या छोट्याश्या पत्राच्या घरात तो आईसोबत राहत होता. तो सतत पैश्यांसाठी त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून त्याची पत्नी आणि दोन मुली माहेरी विजापूर येथे गेला होता. बुधवारी सकाळी विजयने पुन्हा दारूसाठी पैसे मागितले. सावित्रीबाईंनी पैसे देण्यास नकार दिला याच संतापाच्या भारत विजयने घरातील खलबत्ता उचलून आईच्या डोक्यावर वार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
त्याने एवढ्या जोरात वार केला की तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. घरभर रक्त सांडलेले होत आणि रक्ताचे ओघळ उंबऱ्यापर्यंत वाहत आले होते. परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. विजयने स्वतःच इस्पूर्ली येथील बहिणीला फोन करून “आईची हत्या केली” अशी माहिती दिली. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली आणि पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी रोहिणी जयवंत पोर्लेकर (वय २९, रा. इस्पूर्ली, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली असून, राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
पश्चातापाचा लवलेश नाही
आईचा संपवून तो दारातच बसून होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्या चेहऱ्यावर आपल्या कृत्याच्या पश्चातापाचा लवलेशही नव्हता.नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संताप व्यक्त केला जात आहे.