crime (फोटो सौजन्य: social media)
भाग्यश्री संदीप वारे (वय ५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. भाग्यश्रीसह तिचे आई-वडील हे ऊसतोडीच्या कामासाठी पिंपळसुटी येथे वास्तव्यास होते. हे कुटुंब शेतातील गोठ्याजवळ झोपलेले असतांना, पहाटे पावणेतीनच्या सुमारास बिबट्याने अचानक या चिमुकलीवर हल्ला केला. मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आई-वडील तात्काळ जागे झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिला उसाच्या शेतात ओढून नेले होते. याची माहिती तातडीने ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरु केली असत, उसाच्या शेतात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.
Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य
घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाकडून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेत पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावणे, कॅमेरा ट्रॅप बसवणे, ड्रोनद्वारे पाहणी करणे आणि रात्रगस्त वाढवण्याचे काम वन विभागाकडून केले जात आहे. या घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर पिंपळसुटी परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार अश्या घटना घडूनही बिबट्यांचा वावर आणि हालचाली रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरात तात्काळ पिंजरे उभारणे, नियमित गस्त वाढवणे आणि बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करणे, अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत.
लज्जास्पद! बिहारच्या औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार
Ans: भाग्यश्री संदीप वारे (वय 5 वर्षे).
Ans: पिंपळसुटी, शिरूर तालुका, पुणे जिल्हा.
Ans: बिबट्याचा तातडीने बंदोबस्त, पिंजरे लावणे आणि वन विभागाने गस्त वाढवावी.






