महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; CM देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
नागपूर : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. काल (दि.20) मतदान झाले असून येत्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्या युतीच्या बाजूने कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसह मतदारांना देखील निकालाची उत्सुकता लागली आहे. सध्या तरी एक्झिट पोलचे निकाल समोर येत असून विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत दाखवत आहे. सरकार स्थापनेबाबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतदानाच्या वाढलेली टक्केवारी याचा भाजपलाच फायदा होणार आहे. अनेक ठिकाणी मी फोन करून माहिती घेतली. 25 ते 30 मतदान केंद्रावरील बुथवर आणि काही मतदारसंघात महिलांची टक्केवारी वाढली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढलेली आहे. सरकार आम्हीच स्थापन करणार आहोत. पण अद्याप कोणत्याही अपक्षासोबत आम्ही संपर्क साधलेला नाही,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महायुती व महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे शेवट पर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोणाचेही सरकार आले तरी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले. फडणवीस म्हणाले की, “निकालानंतर तिन्ही पक्ष बसू आणि चांगला निर्णय घेऊ, पदाधिकारी यांच्या भावना असल्या तरी त्यावर कितीदा बोलणार. साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे त्यावरुन सरकार बद्दल आपुलकी दिसून येत आहे,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
त्याचबरोबर राहुल गांधी यांनी भाजपवर आणि गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी एकत्रित आहेत तोवर ते सुरक्षित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानी यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करणार आहेत. गौतम अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जेलमध्ये जातील. भाजपचा निधी त्यांच्याशी जोडलेला आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी एकाच शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘राहुल गांधी रोजच बोलतात त्यावर काय बोलायचे?’ असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.