(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
रितेश देशमुख दिग्दर्शित आणि प्रमुख भूमिकेत असलेला ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार कमाई करत आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही व्हर्जनमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एक महिन्यात मोठा टप्पा गाठत ऐतिहासिक यश मिळवलं आहे. १ मे रोजी मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफाट व्यावसायिक यश मिळवले आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हते, तर संपूर्ण देशभरात राजा शिवाजी चित्रपटाची क्रेझ पहिल्यादिवसापासून पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या फक्त मराठीच नाही तर, हिंदी व्हर्जननेही चांगली कामगिरी केली आहे. राजा शिवाजी चित्रपटाने एका महिन्यात किती कमाई केली आहे जाणून घेऊया..
चित्रपटाची एकूण कमाई किती?
१ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज झाल्यापासून राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या चित्रपटाने मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत एक महिन्यातच ऐतिहासिक कमाई नोंदवली आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या मराठी व्हर्जनने एकूण सुमारे 82.66 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली असून त्यातील नेट कलेक्शन 70.02 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
तर दुसरीकडे, हिंदी व्हर्जननेही प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. राजा शिवाजी या चित्रपटाने हिंदीक २९.७९ कोटी रूपयांची एकूण कमाई आणि २५.१५ कोटी रूपयांचे निव्वळ( नेट) कलेक्शन केल आहे. याचबरोबर हिंदीत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.
चित्रपटाची एकूण भारतातील नेट कमाई 100 कोटींचा टप्पा पार करत आहे, तर जागतिक स्तरावर त्याने सुमारे 114 ते 115 कोटी रुपयांच्या आसपास ग्रॉस कमाई केली आहे. मराठी व्हर्जनचा या यशात सर्वात मोठा वाटा असून हिंदी व्हर्जननेही चांगला प्रतिसाद देत चित्रपटाला पॅन-इंडिया स्तरावर पोहोचवले आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटातील कलाकार
‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत असून यात रितेश देशमुख यांच्यासह मोठ्या स्टारकास्टचा समावेश आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतात.
या चित्रपटाचे एक खास आकर्षण म्हणजे सलमान खानचा विशेष कॅमिओ, जो प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्याच्या भूमिकेमुळे चित्रपटाला अधिक मोठा प्रतिसाद मिळत असून थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळत आहे.याशिवाय, या चित्रपटात एक खास गोष्ट म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांची मुले राहिल आणि रियान यांनीही ‘राजा शिवाजी’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे, ज्यामुळे हा चित्रपट त्यांच्या कुटुंबासाठीही विशेष ठरला आहे.






