फोटो सौजन्य : जुई गडकरी इन्स्टाग्राम
मालिकेतील खलनायिका प्रिया म्हणजेच प्रिया तेंडुलकर, कल्पना म्हणजेच प्राजक्ता दिघे आणि सायली म्हणजेच जुई गडकरी या तिघी मिळून शेगावची ट्रिप केली. या ट्रिप दरम्यानचा फोटो अभिनेत्री जुई गडकरीने शेअर केला आहे. जुई म्हणते की, पण त्यांनी बोलावल्या शिवाय जाणं होत नाही होच खरं!४५ मिनीटांचे रोजचे एपिसोड्स, ४५ डिग्री, बुकिंग मिळेल कि नाही या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे सगळ्याच गोष्टी व्यवस्थित ॲडजस्ट झाल्या आणि शेगाव ला झालेलं श्री गजानन महाराजांचं सुंदर दर्शन!प्रवास सुखरुप झाला.. सगळंच छान! मन शांत झालं.
“चाळीत कैरी चोरण्याची मज्जा वेगळीच होती” योगिता चव्हाणने दिला उन्हाळाच्या आठवणींना उजाळा
तीन लहान मुली ट्रीप ला गेल्यासारखं वाटलं! गाडीत सीट बदलुन घेतल्या, कर्राम कुर्ररुम खाऊ खाल्ला, ऊनो खेळलो(मी मातीच खात होते), शेगाव कचोरी खल्ली. सेटेशनवर गाडीची वाट बघत पुन्हा ऊनो खेळलो!! मित्राच्या आईने करुन दिलेल्या जेवणावर ताव मारला, झोपा काढल्या, सुर्यास्तानंतरही ऊष्ण वाहणारा वारा अनुभवला. स्टेशनवर पहिल्यादाच बॅटरी बग्गी मध्ये बसलो! (एकदम विमानतळावरच असल्यासारखं वाटलं)! एकुण काय तर त्यांच्या कृपेने सगळंच छान झालं.
‘ठरलं तर मग’ मालिका सध्य़ा ज्या वळणावर आहे ते पाहता प्रेक्षक देखील या मालिकेला चांगलीच पसंती देत आहेत. प्रियाचं पितळ आता उघड पडलं असून तिचे कायमचे तीन तेरा वाजलेत. या आता प्रिया यातून पुन्हा सहीसलामत सुटणार की शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेले तीन वर्ष सायली आणि अर्जुनच्या हातावर तुरी देत प्रिया प्रत्येक गुन्ह्यातून सहीसलामत सुटायची. मात्र आता प्रियाच्या पापाचा घडा भरला असल्याने प्रिया तन्वी किल्लेदार नाही तप बबली लोखंडे असल्याचं देखील सत्य समोर आहे. पुरावे समोर आल्यावर प्रियाने सत्य कबूल केलं की, किल्लेदार आणि सुभेदारांच्या संपत्ती पाहिजे असल्याने तिने सगळं केलं आणि यानंतर सायलीने प्रियाला घराबाहेर काढलं.






