फोटो सौजन्य - Social Media
असे काय विशेष आहे या Promo मध्ये?
‘विसरू नको तू मला’ या मालिकेचा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. मालिकेच्या शीर्षक गीताने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. ‘विसरू नको तू मला’ हे गीत अतिशय शांत आणि सुरेल आहे. Visuals कडे पाहिले तर मालिकेच्या promo मध्ये शाल्व आणि तन्वी हे दोन प्रसिद्ध चेहरे सूर्या आणि वैदेही हे पात्र साकारताना दिसत आहेत. सूर्या हे पात्र दशावतारामध्ये सक्रिय असल्याचे दाखवण्यात आले आहे तर वैदेही डॉक्टर आहे. सूर्या वैदेहीच्या प्रेमात पडलेला दाखवण्यात आला आहे. प्रेमाचा हा सुरुवातीचा टप्पा असून, जिथे नजर जाईल तिथे सूर्याला फक्त वैदेहीच दिसते. Promo मध्ये दाखवण्यात आले आहे की वैदेहीची गाडी बंद पडते तेव्हा सूर्या तिला मदतही करतो.
सूर्या थोडा मिश्किल स्वभावाचा दाखवण्यात आला आहे तर वैदेही थोडी सिरीयस स्वभावाची दाखवण्यात आली आहे. ही जोडी पुढे काय धमाल करेल हे पाहण्याचे ठरणार आहे.
काय म्हणाले मालिकाप्रेमी?
‘विसरू नको तू मला’ या मालिकेचा प्रोमो Star Pravah वाहिनेच्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्सवर पोस्ट करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकी काही मालिकाप्रेमींनी त्यांच्या आवडत्या मालिकेचे नाव लिहून त्या मालिकेची वेळ बदलू नये याची विनंती केली आहे. तर बहुतेक मालिकांपेमींनी ‘विसरू नको तू मला’ या मालिकेच्या Title Song ची प्रशंसा केली आहे आणि कास्टिंगचे कौतुक केले आहे.
कधीपासून सुरु होणार मालिकेचे प्रक्षेपण?
‘विसरू नको तू मला’ ही मालिका 29 जूनपासून स्टार प्रवाह या वाहिनेवर पाहता येणार आहे. महत्वाचे म्हणजे आणखीन बऱ्याच नव्या मालिकांच्या एन्ट्रीमुळे या मालिकेची वेळ अद्याप अधिकृतरित्या जाहीर नाहीये. तरी संध्याकाळी साडे 6 ते साडे 9 या Prime Time मध्ये मालिकेचे प्रक्षेपण केले जाईल.






