नवी दिल्ली : गेल्या 75 दिवसांपासून हिंसाचाराच्या (Manipur News) आगीत होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये एका समाजातील दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या क्रूरतेने संपूर्ण देशात आक्रोश आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यावर जनमानसात प्रचंड संपात व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या (Manipur Violence) तब्बल दोन महिन्यांनंतर आता एफआयआर दाखल झाली आहे.
दोन महिलांना विवस्त्र करून त्यांना ढकलत नेत मारहाण केली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर #ManipurViolence सह पोस्ट करण्यात आला आहे. दोन महिलांवर शेतात सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी महिला आयोग आणि एसटी आयोगाकडे कारवाईची मागणी संघटनेने केली आहे. दोन्ही महिला कुकी जमातीतील असल्याचा फोरमचा दावा आहे.
थौबल जिल्ह्यातील पेची अवांग लेकाई येथील 32 वर्षीय हुइरेम हेरोदास सिंग असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ठळकपणे दिसत आहे.