आजच्या ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर
Marathi Breaking Live Updates : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ओटावाच्या माध्यमातून उच्चायुक्तांच्या नियुक्तीला दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी एक स्वागतयोग्य पाऊल म्हणून वर्णन केले.
जयशंकर यांनी ‘एक्स’वर याबाबत पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी ‘न्यूयॉर्कमध्ये कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्याशी चांगली बैठक झाली. दोन्ही देशांतील संबंध पुन्हा निर्माण करताना उच्चायुक्तांच्या नियुक्तीचे स्वागत आहे. या संदर्भात आम्ही पुढील पावलांवर चर्चा केली. मंत्री अनिता आनंद यांचे भारतात स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत’.
ऑगस्टमध्ये, भारताने दिनेश पटनायक यांची कॅनडामधील भारताच्या पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली. गेल्या आठवड्यात पटनायक यांनी कॅनडाच्या गव्हर्नर जनरल मेरी सायमन यांना त्यांची पत्रे सादर केली. त्यानंतर आता ते त्यांच्या पदभार स्वीकारताना दिसत आहे.
30 Sep 2025 05:58 PM (IST)
अनेकजनांना प्रवास करताना , काम करताना किंवा इतर काही गोष्टी करताना मोबाईलवर गाणी ऐकण्याची सवय असते किंवा मोबाईलवरुन संभाषण साधायचे असते. अशा वेळी त्यांना हेडफोन वापरावा लागतो.अशाच एक हेडफोन सोनी इंडियाने WH 1000XM6लाँच केले आहे, जो त्यांच्या लोकप्रिय 1000X मालिकेतील एक नवीन भर आहे. या हेडफोनमध्ये 12-मायक्रोफोन-आधारित रिअल-टाइम अॅडॉप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन, सुधारित साउंड प्रोसेसिंग आणि नवीन डिझाइन आहे. त्याचे अॅडॉप्टिव्ह एनसी ऑप्टिमायझर आणि नवीन अँबियंट साउंड मोड पर्यावरणानुसार ध्वनी आणि संतुलन समायोजित करतात. याव्यतिरिक्त, DSEE एक्स्ट्रीम आणि LDAC सपोर्ट उच्च-रेझॉल्यूशन ऑडिओ अनुभव प्रदान करतो.
30 Sep 2025 05:45 PM (IST)
महाराष्ट्रातील मुंबईतील परेल परिसरातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अल दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीत आपले नाव समोर आल्याचा दावा करत एका व्यक्तीची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. पिडीत हे ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असून ते आदित्य बिर्ला ग्रुपचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. आरोपींना पीडित ज्येष्ठ नागरिकास डिजीटल पद्धतीने अटक करून त्यांच्याकडे ७० लाख रुपये उकळल्याची माहिती आहे.
30 Sep 2025 05:41 PM (IST)
दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका लागण्याचे संकेत मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलंय. मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी ठाकरेंच्या विरोधात महायुतीकडून रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप अन् राष्ट्रवादी ताकदीने सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबई मनपासाठी महायुतीकडून जागावाटपाची तयारी सुरू झाली असेल. असे असताना नवी मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटण्याच्या मार्गावर आहे असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दोन्ही पक्ष दोन्ही शहरांमध्ये स्वतंत्रपणे महापालिका निवडणुका लढवू शकतात. महापालिका निवडणुका जवळ येत असताना, परस्पर आरोप-प्रत्यारोपांमुळे आघाडीतील भागीदारांमधील दरी वाढत चालली आहे. निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
30 Sep 2025 05:30 PM (IST)
महात्मा गांधी यांनी समाजवाद, सामाजिक न्याय, सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली तर असत्य आणि हिंसा ही संघाची विचारधारा आहे. देशाच्या फाळणीला महात्मा गांधी जबाबदार असल्याचा अपप्रचार संघ व संघ परिवाराने केला. परंतु द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत कोणी मांडला हे सर्वांना माहित आहे, पण बदनामी मात्र महात्मा गांधींची करण्यात आली परंतु आज तोच संघ महात्मा गांधी यांना शरण गेला हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
30 Sep 2025 05:22 PM (IST)
महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. माण तालुक्यात नुकतीच अतिवृष्टी झाली. जोरदार झालेल्या पावसामुळे शेतामधील पिकाचे तसेच अनेक व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नवरात्रचे उपवास असताना पायात चप्पल न घालता अनवाणी स्वरूपात ते शेतकऱ्यांच्या बांध्यावर गेले. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
30 Sep 2025 04:55 PM (IST)
आज सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निवजे गावावर चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळामुळे चव्हाटावाडी परिसरातील अनेक घरांचे छप्पर व पत्रे उडून गेले असून झाडेही कोसळली आहेत. नवीन घराचे छप्पर पूर्णतः उडून गेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रामस्थांनी या नुकसानीचा प्रत्यक्ष अनुभव सांगितला आहे.
30 Sep 2025 04:50 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४३ हजार शेतकऱ्यांना कृषी पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई रक्कम ५ ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. आंबा आणि काजू पिक विमा अद्यापपर्यंत वितरित न झाल्याने शेतकरी विजय प्रभू यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांना घेराव घातला. त्यानंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीशी चर्चा करून नुकसान भरपाई रक्कम लवकर देण्याचे लेखी आदेश काढले आहेत.
30 Sep 2025 04:50 PM (IST)
विरार पश्चिमेला विवा कॉलेज या ठिकाणी वसई विरार मधला सर्वात मोठा गरबा आयोजित केला जातो विवा कॉलेज मधील शिकणारे विद्यार्थी या व्यतिरिक्त बाहेरून येणारे नागरिक हे एन्ट्री पास घेऊन या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी येत असतात तर विवा कॉलेजमधून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहेत. विवा कॉलेज मधील बारावी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांची लव जिहाद पसरवण्याची प्रवृत्ती असल्याचं समोर आलं आहे.
30 Sep 2025 04:43 PM (IST)
कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यामधील 9 0 टक्के शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून पूर्ण संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. वर्षातून एकदाच भारताचे पीक घेतले जाते त्यातच संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत ही अशी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच सतत होणाऱ्या नुकसानी मुले शेतीतकरी शेती व्यवसायापासून दूर जायला लागला आहे.तालुक्यातील 6 मे पासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी बियाणं पेरलं नाही. परंतु ज्यांनी बियाणं पेरलं आहे त्यांचे मात्र शंभर टक्के नुकसान झाले आहे. दरम्यान कर्जत तहसीलदार यांच्याकडून महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेऊन उद्यापासून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
30 Sep 2025 04:43 PM (IST)
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये करूर येथे अभिनेता आणि नेता विजयच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हायकोर्टात टीव्हीकेच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी याचिका दाखल केली आहे.
30 Sep 2025 04:41 PM (IST)
टीव्हीके पक्षाच्या रॅलीमध्ये करूर येथे अभिनेता आणि नेता विजयच्या रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हायकोर्टात टीव्हीकेच्या कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणात अनेक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान आता या सर्व प्रकरणावर अभिनेता आणि नेता विजयने प्रतिक्रिया दिली आहे.
30 Sep 2025 04:21 PM (IST)
भारतासारख्या विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशात अनेक प्रांत आणि राज्य आहेत. जशी आपल्याकडे विविधतेची परंपरा आहे त्याला, जातीय बंधनांचा विळखा आहे हेही तितकेच खरे.
30 Sep 2025 04:18 PM (IST)
अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतीच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. दरम्यान या प्रकरणातील सुनावणी मद्रास हायकोर्टाने पुढे ढकलली आहे. दरम्यान या चेंगराचेंगरीत 40 लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसानी मोठी कारवाई केली आहे.
30 Sep 2025 03:47 PM (IST)
अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विजय थलापती हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. दरम्यान या प्रकरणातील सुनावणी मद्रास हायकोर्टाने पुढे ढकलली आहे. दरम्यान या चेंगराचेंगरीत 40 लोकांचा हकनाक मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसानी मोठी कारवाई केली आहे.
30 Sep 2025 03:34 PM (IST)
राज्यभरातून सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी होत आहे, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधीही ओला दुष्काळ जाहिर झालेला नाही. पण ज्या वेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण दिल्या जातात.
30 Sep 2025 03:26 PM (IST)
हाताोंडाशी आलेला घास पावसानं हिसकावला, आता न्याय मागायचा तरी कुणाकडं? असा प्रश्न सध्या बळीराजाला भेडसावत आहे. राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतीचं अतोनात नुकसान झालं.
30 Sep 2025 03:15 PM (IST)
मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आलेल्या पूराने शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर आज (30 सप्टेंबर) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
30 Sep 2025 03:05 PM (IST)
तेजा सज्जाचा “हनुमान” फेम दिग्दर्शक प्रशांत वर्मा त्यांच्या “प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स” अंतर्गत त्यांचा पुढचा चित्रपट “महाकाली” घेऊन येत आहेत. चित्रपटातील अक्षय खन्नाचा पहिला लूक आज प्रदर्शित झाला.
30 Sep 2025 02:55 PM (IST)
सोशल मीडियावर कायमच जगप्रसिद्ध ब्रँड प्रादाची कायमच चर्चा असते. हा एक लोकप्रिय ब्रँड आहे. प्रादा कायमच त्यांच्या चप्पला आणि बॅगमध्ये काहींना काही नवीन डिझाईन तयार करत असतात. सोशल मीडियावर प्रादाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. प्रादाने नुकतीच टोट बॅग लाँच केली आहे. या टोट बँगची किंमत सुमारे २.७३ लाख रुपये आहे. यातील मनोरंजक गोष्ट म्हणजे प्रादाने लाँच केलेली बॅग भारतीय ट्रेनच्या फरशीसारखी दिसून आली आहे. या बॅगचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
30 Sep 2025 02:50 PM (IST)
Pakistan news in marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात एक मोठी घटना घडली आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटा येथे मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. यामुळे संपूर्ण बलुचिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू आणि ३२ जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे. सध्या शहरात आणबामी घोषणा जाहीर करण्यात आली आहे.
30 Sep 2025 02:45 PM (IST)
कोेणाचा काळ कसा आणि कधी येईल हे सांगता नाही. एक क्षुल्लक कारण देखील मृत्यू होण्याचं निमित्त ठरतो. अशीच एक मन पिळवटून टाकण्याऱ्या घटनेने डोंबिवली हळहळतेय. चार वर्षाची चिमुकली आणि तिची मावशी गाढ झोपेत असताना या दोघींना सर्पदंश झाला. डोंबिवलीच्या खंबाळपाड्यातील या घटनेने परिसरातील सरपटणाऱ्या जनावरांबाबत भिती व्यक्त केली जात आहे.
30 Sep 2025 02:40 PM (IST)
Tumbbad Sequel: बॉलिवूडमधील एक उत्तम हॉरर थ्रिलर चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘तुंबाड’ने २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या मनावर स्थान निर्माण केलं. हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे पुन्हा प्रदर्शन केल्यानंतरही प्रेक्षकांनी त्याला तितकंच प्रेम दिलं. या सिनेमातील हस्तर या राक्षासामुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तुंबाडच्या सिक्वेलची म्हणजेच तुंबाड २ची घोषणा करण्यात आली आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आले आहे.
30 Sep 2025 02:35 PM (IST)
बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोण आणि चित्रपट निर्मात्या फराह खान या दोघींनि इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले असल्याची माहिती समोर आली आहे. आता दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. दीपिका पदुकोणला चित्रपटसृष्टीत लाँच करणारी फराह खानने तिच्या नवीनतम व्हीलॉगमध्ये तिच्या ८ तासांच्या शिफ्टवर टीका केली आहे. तेव्हापासून त्यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. परंतु, दीपिका किंवा फराहने अद्याप या वृत्तांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात.
30 Sep 2025 02:30 PM (IST)
कर्नाटक येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली नंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून या दाम्पत्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना बंगळुरू येथील उल्लाल परिसरात घडली आहे. मृत दाम्पत्याचे लग्न सप्टेंबर २०२२ मध्ये झाले होते आणि त्यांना कोणतेही मुलबाळ नव्हते.
30 Sep 2025 02:29 PM (IST)
पुणे : वर्षभरापूर्वी पुण्यात झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरला संपवले. 5 सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या आदल्या रात्री आठ वाजता पुण्यातील नाना पेठ परिसरात दोन मारेकऱ्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही दिवसाखाली आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. आता कोमकर हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. अटकेत असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा आदेश दिला आहे.
30 Sep 2025 02:25 PM (IST)
आशिया कप 2025 चा फायनलचा सामना पार पडला, यामध्ये भारताच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करुन आशिया कप नावावर केला आहे. त्यानंतर आशिया कप 2025 च्या ट्राॅफीचा मोठा वाद पाहायला मिळाला. त्यानंतर आता भारताचा संघ मायदेशामध्ये परतला आहे तर पाकिस्तानचा संघ आशिया कप 2025 झाल्यानंतर कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दिसणार आहे. पाकिस्तानच्या संघाने या आशियाच्या स्पर्धेमध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये पाकिस्तानच्या संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
30 Sep 2025 02:20 PM (IST)
नृत्यदिग्दर्शक धनश्री वर्माने नुकताच ‘राईज अँड फॉल’ या शोमध्ये एक धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिने तिचा एक्स पती आणि भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या लग्नाचा आणि घटस्फोटाचा अनुभव शेअर केला आहे आणि तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ती नक्की काय म्हणाली हे आपण आता जाणून घेणार आहोत.
30 Sep 2025 02:13 PM (IST)
India Weather Update: काल देशभरात संमिश्र असे हवामान पाहायला मिळाले. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. तर अनेक राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला आहे. मात्र आज पुन्हा देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
30 Sep 2025 02:13 PM (IST)
खाजगी टेलिकॉम कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलने अलीकडेच काही उत्कृष्ट आणि परवडणारे प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत, ज्यामुळे अनेक वापरकर्ते समाधानी झाले आहेत. लाखो वापरकर्ते आता खाजगी टेलिकॉम कंपन्या सोडून बीएसएनएलमध्ये सामील झाले आहेत. अलीकडेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएलचे स्वदेशी 4G नेटवर्क देखील लाँच केले.
30 Sep 2025 01:55 PM (IST)
कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ६५ वर्षांनंतर आजही ‘जैसे थे’च आहे. धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने, उपोषणे केली. त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून गुरुवारी (दि. २) गांधी जयंतीदिनी सकाळी दहा वाजता कोयनानगर येथील नेहरू गार्डनजवळील शिवाजीसागर जलाशयात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा कोयना धरणग्रस्त, अभयारणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चैतन्य दळवी यांनी धरणग्रस्तांच्या बैठकीत बोलताना दिला.
30 Sep 2025 01:45 PM (IST)
नुकतेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझात युद्धबंसाठी घोषणा केली आहे. यासाठी ट्रम्प यांनी २० कलमी योजना आखली आहे. या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी जगभरातील इतर देशांना गाझात शांतीच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
30 Sep 2025 01:40 PM (IST)
जीएसटी कपातीनंतर, दुचाकी वाहने पूर्वीपेक्षा स्वस्त झाली आहेत. जर तुम्ही परवडणारी बाईक शोधत असाल, तर टीव्हीएस स्टार सिटी प्लस हा एक चांगला पर्याय असू शकतो. या बाईकवर आता २८% जीएसटी आणि १% सेस ऐवजी फक्त १८% जीएसटी लागू होतो. याचा अर्थ एक्स-शोरूम किमतीत अंदाजे ₹८,५०० ची कपात सध्या दिसून येत आहे.
30 Sep 2025 01:35 PM (IST)
पुणे आणि पिंपरी-चिंचवडची दैनंदिन वाहतूक सांभाळणारी पीएमपीएमएल बस सेवा शहराची ‘रक्तवाहिनी’ मानली जाते. नव्या अध्यक्षांनी पदभार स्वीकारल्यानंतर डबल डेकर बस, चालकांसाठी मोबाईल बंदी, चालक-वाहकांना डेपोवर प्रत्यक्ष हजेरी बंधनकारक असे काही चांगले निर्णय घेतले. परंतू प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. प्रवाशांना बसमध्ये ऑनलाइन तिकिटासाठी टाळाटाळ करणे, बस थांब्यावर न थांबणे, ॲपवरून तिकिट काढण्यासाठी बस नंबर विचारले असता, बसमध्ये बसताना पाहिले नाही का? अशी उध्दटपणे उत्तरे देणे.
30 Sep 2025 01:25 PM (IST)
एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वेअर येथे महामात्मा गांधीच्या (Mahatma Gandhi) पुतळ्याची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे या घडनेवर जगभरातील भारतीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच वेळी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. घटनेला हिंसक कृत्य म्हणून संबोधले आहे.
30 Sep 2025 01:15 PM (IST)
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या सुमारे २०० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक ६ई ७६२ ला बॉम्बची धमकी मिळाली. या धमकीनंतर दिल्ली विमानतळावर पूर्ण आणीबाणी जाहीर करण्यात आली. फ्लाइट ट्रॅकिंगनुसार, एअरबस ए३२१ निओ विमान सकाळी ७:५३ वाजता उतरवण्यात आले. इंडिगोने अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
30 Sep 2025 01:06 PM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. या सगळ्यात बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भोजपुरी चित्रपटांचे सुपरस्टार आणि गायक पवन सिंह बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने पवन सिंह आज (३० सप्टेंबर) सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेणार आहेत.
30 Sep 2025 01:05 PM (IST)
कोल्हापूर येथून एक हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकली त्यांनतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून पत्नीची निर्घृण हत्या केल्याची समोर आली आहे. रोहिणी पाटील असं मृत महिलेचे नाव आहे. तर प्रशांत पाटील असं पत्नीची हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. रोहित हत्या करून पळून गेला होता. प्रशांत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतलं आहे.
30 Sep 2025 01:01 PM (IST)
पाटण (वा.) तालुक्यातील कोयना विभाग मध्यरात्री १२ वाजून ९ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ४ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.
या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटर अंतरावर होता. तालुक्यात कुठेही पडझड झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
30 Sep 2025 12:50 PM (IST)
धुळे येथून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भारण्यावरून शाळेत काही पालकांनी शाळेतील कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही शाळेला टाळे ठोकून काम बंद आंदोलन करू, अशी आक्रमक भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे.
30 Sep 2025 12:40 PM (IST)
पुण्यातून गुन्हेगारीची एक घटना समोर आली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुण्यातील सनशाईन स्पा सेंटरवर छापा टाकत हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये धाडीत पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
30 Sep 2025 12:30 PM (IST)
अकोला : अकोल्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. एका नराधम सावत्र बापाने आपल्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या नराधमाला अटक करण्यात आली असून आहे. चिमुकीली हि केवळ पाच वर्षांची आहे असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सद्यस्थितीत मुलीची प्रकृती स्थिर आहे.
30 Sep 2025 12:15 PM (IST)
नवीमुंबई येथील करावे गावातून एक धक्कदायक हत्येची बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एनआरआय पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे. मात्र या घट्नेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
30 Sep 2025 12:00 PM (IST)
गेल्या ४८ तासांत महाराष्ट्रात पाऊस आणि पुरामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात चार, धाराशिव आणि अहिल्यानगरमध्ये प्रत्येकी दोन आणि जालना आणि यवतमाळमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पूरग्रस्त भागांचा आढावा घेतला आणि लोकांना मदत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
30 Sep 2025 11:50 AM (IST)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे (RBI) बँक सुट्ट्यांचे अधिकृत कॅलेंडर जारी केलं जातं. या कॅलेंडरनुसार, ऑक्टोबरमध्ये बँका 18 दिवस बंद राहतील. सणांव्यतिरिक्त, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बँका बंद असतात. या काळातही बँकाचे कामकाज होत नाही. सणांमुळे बॅंकेच्या सुट्टांमध्ये वाढ झाली आहे.
30 Sep 2025 11:40 AM (IST)
खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यावरुन शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याबद्दल बोलताना राऊतांनी म्हटले की, गुजरात सूरत, अहमदाबाद याठिकाणी जाऊन शिंदेंनी त्यांचा दसरा मेळावा घ्यायला पाहिजे. इथे कशाला ढोंग करत आहात. कोण आहात तुम्ही? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला.
30 Sep 2025 11:15 AM (IST)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझातील युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. नुकतेच त्यांनी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.या वेळी ट्रम्प यांनी गाझातील युद्धबंदीसाठी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहूंसमोर एक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला नेतन्याहूंनी मंजुरी दिली आहे.
30 Sep 2025 11:07 AM (IST)
सामान्य लोकांच्या अनेक प्रशासकीय समस्या असतात. यासाठी कोणाकडे जावे असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. सरकारी कार्यालयामध्ये त्यांच्या कामाला कोणी लगबगीने हात लावेल याची तर अपेक्षाच नसते. सरकारी कामांमध्ये होणाऱ्या दिरंगाईवर आणि इतर बाबींवर वचक बसवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. यापुढे कोणतीही समस्या आणि तक्रार सामान्य लोकांना थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करता येणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर तक्रार करता येणार असून यासाठी आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागणार आहे. यामुळे सरकारी काम आणि चार दिवस थांब ही परिस्थिती आता सुधारेल अशी आशा आहे.
30 Sep 2025 10:59 AM (IST)
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्माला झेलल्यानंतर, रौफने विमान अपघातासारखा आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही दिवसांपूर्वीच, भारताविरुद्धच्या सुपर फोर सामन्यादरम्यान अशाच प्रकारचा आनंद साजरा केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याला दंड ठोठावला होता. त्यामुळे, जर त्याने पुन्हा असेच कृत्य केले तर त्याला ICC च्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
30 Sep 2025 10:51 AM (IST)
सोशल मीडिया किंग, प्रसिद्ध अभिनेता आणि भाडिपाचा सर्वेसर्वा सारंग साठ्येनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सारंगने पॉलाबरोबर अखेर लग्न करून चाहत्यांना खुश करून टाकले आहे. सारंग आणि पॉला गेली १२ वर्ष लिव्ह इनमध्ये एकत्र राहत होते. दोघांनी आम्ही लग्न करणार नाही असं ठरवलं होतं पण अचानक त्यांनी लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याला चाहत्यांसह त्याचे मित्र-मैत्रिणींनी देखील अभिनंदन करत आहे. प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कंमेंटचा वर्षाव होत आहे.
30 Sep 2025 10:40 AM (IST)
“माझ्या एका निर्णयामुळे एक शक्तीशाली आयात लॉबी नाराज झाली झाली असून माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व षडयंत्र रचले जात आहे. कच्च्या तेलाच्या आयातीमुळे देशातून जवळपास २२ लाख कोटी रुपये बाहेर जात होते. या निर्णयामुळे काहींच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, त्यामुळे ते नाराजीने बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मी आजवर कुठल्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळेच ठेकेदार मला घाबरत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावरील आरोपांवर उत्तर दिले आहे.