नवी दिल्ली : आज शिंदे गटाने (Shinde Group) राष्ट्रीय कार्यकारिणीची स्थापना केल्यानंतर तसेच शिंदे गटातील ऑनलाईन बैठकीला (online meeting) शिवसेनेचे 14 खासदार उपस्थित असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर नवी दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद (New Delhi Sanjay raut press conference) घेत शिंदे गटावर सडकून टिका केली. राज्यात सध्या कॉमेडी एक्स्प्रेस २ कार्यक्रम सुरू आहे. पहिला कार्यक्रम आपण मुंबईत पाहिला, आता पार्ट टू आला आहे, असंही राऊत म्हणाले. त्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याची धडपड सुरू आहे. मूळ शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackreay) आणि कार्यकारिणीने शिवसेना उभी केली. शिवसेना (shivsena) हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही. फूटुन जाऊन गट स्थापन केला असेल पण त्यांना शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
[read_also content=”उद्या दिल्लीत शिवसेनेचे नाराज 12 खासदार पत्रकार परिषद घेणार https://www.navarashtra.com/india/12-disgruntled-mp-of-shivsena-will-hold-a-press-conference-in-delhi-tomorrow-305587.html”]
दरम्यान, राजन विचारे हेच मुख्य प्रतोद आहेत. आमदारांना वाचविण्यासाठी धडपड सुरु आहे. शिंदे गटाची कार्यकारिणी ही अनाधिकृत आहे, तसेच शिंदे गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करु शकतो? असं सुद्धा राऊत म्हणाले. शिंदे गटाच्या ऑनलाईन बैठकीला 14 खासदार उपस्थित होते हे वृत्त खोटे असल्याचं राऊत म्हणाले. आमदार वाचविण्यासाठी भ्रम निर्माण केला जातोय, शिंदे फडणवीस सरकार फार काळ टिकणार नाही. कोणत्या आधारावर शिवसेना तुमची आहे हे सांगत आहात असा खडा सवाल सुद्धा राऊतांनी शिंदे गटाला विचारला आहे. 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलावर कायम आहे. स्वत: कातडी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची टिका राऊतांनी शिंदे गटावर केलीय.