Passport Fee Hike : पासपोर्ट महागला! केंद्र सरकारने वाढवले अर्ज शुल्क; १ जुलैपासून लागू होणार नवे दर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट सुधारणा नियम २०२६ अंतर्गत अधिकृत सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, १ जुलैपासून पासपोर्ट शुल्कात वाढ होणार आहे.
पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट फीमध्येही वाढ
याशिवाय पासपोर्टसाठी लागणाऱ्या पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट (PCC) सरेंडर सर्टिफिकेटच्या फीमध्येही ५०० रुपयांवरुन ७५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
जर तुम्हाला पासपोर्ट फी वाचवायची असेल तर जुन्या दराने पासपोर्ट काढू शकता. यासाठी तुम्हाला ३० जून पूर्वी अर्ज करणे फायद्याचे ठरेल. ३० जुन नंतर अर्ज केल्यास नवीन नियमांनुसार शुल्क आकारले जाईल.






