LPG Supply India tanker Sarv Shakti crosses Strait of Hormuz (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
गेल्या दोन महिन्याभरापासून अमेरिका इराण संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांत सध्या युद्धबंदी लागू असली तर होर्मुझमध्ये एकेमकांवर विळखा कायम आहे. यामुळे जगभरातील अनेक देशांची जहाज समुद्रात अडकून पडली आहे. अशा परिस्थितीत भारताच्या सर्व शक्ति जहाजाने ४५ हजार टन LPG सह सुखरुप मार्ग काढला आहे. इराणच्या लारक आणि केशम बेटाजवळून हे जहाज सुरक्षित बाहेर पडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजाने इराणच्या सर्व सागरी अटींचे काटेकोर पालन केले आहे. या जहाजावर एकूण १८ भारतीय नाविक होते. यामुळे याची ओळख उघड करण्यात आली होती. ज्यामुळे प्रवासात नाविकांना कोणताही अडथला येणार नाही.
सध्या भारत मोठ्या प्रमाणावर उर्जा संकटाचा सामना करत आहे. मध्यपूर्वेकडील उर्जा साखळी विस्कळीत झाल्यामुळे देशात LPG चा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा लागल्या आहे. मात्र सर्व शक्ति च्या होर्मुझमधून सुखरुप बाहेर पडल्याने भारताला मोठा दिला मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज विशाखापट्टणमच्या LPG टर्मनिलवर उतरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या होर्मुझमध्ये १४ ते १६ जहाजे अडकली असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत शिवालिक, नंदा देवी, जग लाडकी, पाइन गॅस, जग वसंत, BW टायर, BW एल्म, ग्रीन आशा या जहाजांनी होर्मुझचा मार्ग यशस्वीरित्या पार केला आहे. या जहाजांच्या मदतीने भारतात मोठ्या प्रमाणात LPG आणि कच्चे तेल वाहून आणले जाते जे भारताच्या देशांतर्गत उर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
ही जहाजे सुरक्षित परतल्याने भारताचा मोठा रणनीतिक विजय मानला जात आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या राजनैतिक आणि धोरणात्मक प्रयत्नांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्व शक्ति मायदेशी येताच भारताच्या LPG पुरवठा साखळी पुन्हा रुळावर येणार आहे.






