मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमुल काँग्रेसच्या (Trinamool Congress) अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या विधानाने चर्चा रंगल्या आहेत. ममता बॅनर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) कौतुक केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाईट नाही आणि तिथे असे अनेक लोक आहेत जे भाजपला (BJP) पाठिंबा देत नाहीत, असे त्या म्हणाल्या आहेत.
एमआयएम (AIMIM), काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. तर, भाजपला बॅनर्जींच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देण्याऐवजी बंगालमधला राजकीय हिंसाचाराकडे बोट दाखवले असून त्यात सुधारणा करण्याकडे लक्ष वेधले. असदुद्दीन ओवैसी यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे. २००३ मध्ये बॅनर्जींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देशभक्त म्हटले होते आणि आरएसएसनेही त्यांना दुर्गा म्हटले होते, असे ओवैसी म्हणाले.
Kolkata, West Bengal | RSS was not so bad earlier, I don’t think they are bad now either. There are many people in the RSS who are good & don’t support the BJP: West Bengal CM Mamata Banerjee (31.08) pic.twitter.com/Tac3chfppB
— ANI (@ANI) September 2, 2022
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विधान केले. त्या म्हणाल्या की, आरएसएस काही वाईट नाहीय. त्यात अजूनही असे काही लोक आहेत, ज्यांना भाजप करत असलेले राजकारण पटत नाही, असे त्या म्हणाल्या.