Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Top Marathi News Today Live : इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल : डोनाल्ड ट्रम्प

Marathi Breaking Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशसह राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन, अर्थविश्वसह इतर महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींसाठी 'नवराष्ट्र'ला भेट देत राहा...

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2026 | 06:22 PM
Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Top Marathi News Today Live : बारामतीसह राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Follow Us
Follow Us:

Marathi Breaking News Updates : इराणवर अमेरिका आणि इस्त्रायल या दोन्ही देशांकडून वारंवार हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इराणवर हल्ल्यांमुळे जागतिक तेल संकट ओढवताना दिसत आहे. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केले आहे. ‘इराणसोबतचा संभाव्य नवीन करार हा माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि जो बायडेन यांच्या कार्यकाळात तेहरानसोबत झालेल्या करारापेक्षा चांगला असेल. इराणसोबतचा नवीन करार जगात शांतता प्रस्थापित करेल’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका आणि इराण यांच्यात होणारा करार हा (माजी अध्यक्ष) बराक ओबामा आणि जो बायडेन यांनी स्वाक्षरी केलेल्या जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन (JCPOA) पेक्षा खूपच चांगला असेल. त्यांनी जुन्या कराराला अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक आणि सर्वात वाईट करारांपैकी एक म्हटले. ट्रम्प यांनी दावा केला की, या करारामुळे इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याचा मार्ग मिळू शकला असता, जो त्यांच्या प्रशासनाने रोखला. त्यांनी असाही आरोप केला की, त्यावेळी इराणला अब्जावधी डॉलर्स रोख रक्कम देण्यात आली होती आणि ही रक्कम अमेरिकन बँकांमधून काढण्यात आली होती.

The liveblog has ended.
  • 21 Apr 2026 06:19 PM (IST)

    21 Apr 2026 06:19 PM (IST)

    षडयंत्र की अपघात? अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासह 5 देशांतील रिफायनरींना लागली आग

    पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी राजस्थानमधील पाचपद्रा येथील एका रिफायनरीचे उद्घाटन करणार होते. सुमारे १३ वर्षांपूर्वी संकल्पित केलेल्या या प्रकल्पाचे स्वप्न साकार होणार होते. मात्र, उद्घाटनाच्या केवळ एक दिवस आधी, रिफायनरीच्या मुख्य प्रक्रिया युनिट्सना भीषण आग लागली, ज्यामुळे उद्घाटन पुढे ढकलण्यात आले.

  • 21 Apr 2026 06:10 PM (IST)

    21 Apr 2026 06:10 PM (IST)

    ICC T20 Ranking मध्ये भारतीय लेकींची 'कमाल'; शेफाली वर्माचा धमाका अन्...

    ICC T20 Ranking 2026: आयसीसीने टी-20 फॉर्मटचे नवे रॅकिंग जाहीर केले आहे. यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शेफाली वर्माने चांगली कामगिरी केली आहे. शेफाली वर्माने फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांची झेप घेतली आहे. दुसरीकडे, साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-2० सामन्यात 47 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही क्रमवारीत प्रगती केली असून, ती लवकरच टॉप-१० मध्ये पुन्हा झेप घेईल असे चित्र पाहायला मिळत आहे.

  • 21 Apr 2026 06:04 PM (IST)

    21 Apr 2026 06:04 PM (IST)

    Sharad Pawar Health News: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारामती दौरा रद्द

    Sharad Pawar Health News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना मुंबईतील Breach Candy Hospital येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती त्यांच्या कन्या आणि खासदार Supriya Sule यांनी दिली. प्रकृती अस्वस्थतेमुळे पवार आजचा बारामती दौरा करू शकणार नाहीत.

  • 21 Apr 2026 05:45 PM (IST)

    21 Apr 2026 05:45 PM (IST)

    लग्नसराईचा जोर, बर्फाला आला ‘सोन्याचा भाव’

    हिंगोली जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस चढत असताना लग्नसराईच्या हंगामाने बर्फाच्या मागणीत अभूतपूर्व वाढ केली आहे. परिणामी, बर्फाचे दर अक्षरशः गगनाला भिडले असून बाजारपेठेत ‘बर्फ सोन्याच्या भावात’ विकला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील बर्फ कारखान्यांवर पहाटेपासूनच व्यापारी, केटरर्स आणि किरकोळ विक्रेत्यांची मोठी गर्दी उसळत आहे.

  • 21 Apr 2026 05:30 PM (IST)

    21 Apr 2026 05:30 PM (IST)

    Gold – Silver च्या दरात तब्बल ‘इतकी’ घट

    गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आज, २१ एप्रिल रोजी, MCX वर सोन्याचे दर घसरणीसह उघडले. सोन्याचा भाव १६ रुपयांनी घसरून चर चांदीचा भावही १,६९९ रुपयांनी घसरून घसरला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा भाव ०.३२% घसरणीसह प्रति औंस ४८१२ डॉलरवर आहे. चांदीचा भावही १.३५% घसरणीसह प्रति औंस ७८.९६ डॉलरवर आहे.

    आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याचे दर ०.३२ टक्क्यांनी घसरले असून, सध्या ते ४,८१२ डॉलर्स प्रति औंस या दराने विकले जात आहेत. याव्यतिरिक्त, चांदीचे दर ७८.९६ डॉलर्स प्रति औंस असून, त्यात १.३५ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

     

  • 21 Apr 2026 05:20 PM (IST)

    21 Apr 2026 05:20 PM (IST)

    मालिकेत गाजलेल्या जोडीने खऱ्या आयुष्यातही जोडली गाठ!

    मराठी TV क्षेत्रात गाजलेल्या मालिकांमधील अनेक जोड्यांनी खऱ्या आयुष्यातही त्याच जोडीदाराला निवडले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा-अंजली या जोडीने काही वर्षांपूर्वी खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. पुढे, सिद्धार्थ आणि तितिक्षा या जोडीनेही खऱ्या आयुष्यातही लग्न केले. दरम्यान, मराठी TV क्षेत्रातून आणखीन एक आनंदाची बातमी आली आहे. ‘कारभारी लयभारी’ या मालिकेतून गाजलेली जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र येत आहेत. अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे लग्न करणार आहेत. तसेच त्यांनी गुपचूप साखरपुडाही उरकून टाकला आहे.

  • 21 Apr 2026 05:14 PM (IST)

    21 Apr 2026 05:14 PM (IST)

    Harley Davidson च्या हजारो बाईक्समध्ये झाला मोठा बिघाड

    भारताव्यतिरिक्त, Harley-Davidson आपल्या बाईक्स जगभरातील अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, या कंपनीच्या हजारो बाईक्समध्ये काही दोष आढळून आले आहेत; ज्यामुळे कंपनीला ‘रिकॉल’ सूचना जारी करावी लागली आहे. युनायटेड स्टेट्समध्ये Harley-Davidson च्या अंदाजे 17000 वाहनांसाठी रिकॉल जारी करण्यात आला आहे. या रिकॉलमध्ये 2025 आणि 2026 या वर्षांतील मॉडेलचा समावेश आहे.

  • 21 Apr 2026 04:50 PM (IST)

    21 Apr 2026 04:50 PM (IST)

    लेन्सकार्टमध्ये तिलक टिकली वाद, नालासोपाऱ्यात विश्व हिंदू महासंघाचा निषेध

    चष्मा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या Lenskart या कंपनीत तिलक, टिकली आणि कलावा धारण करण्यास मज्जाव केल्याचा आरोप समोर आल्याने नालासोपाऱ्यात वाद निर्माण झाला आहे. कंपनीचे सहसंस्थापक पियुष बन्सल यांच्याशी संबंधित या मुद्द्यावर स्थानिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर नालासोपारा पूर्व येथील ब्रॉडवे समोरील मार्वल इमारतीतील लेन्सकार्टच्या दुकानात विश्व हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भेट देत निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना तिलक लावून हिंदू परंपरा व संस्कृतीचे पालन करण्यास घाबरू नये, असे आवाहन केले. तसेच, धार्मिक प्रतीकांवर निर्बंध घालण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

  • 21 Apr 2026 04:45 PM (IST)

    21 Apr 2026 04:45 PM (IST)

    कल्याण डोंबिवली मनपा महासभेत पाण्यावरून जोरदार खडाजंगी

    काही भागांत पाणी मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागत असल्याचे आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असून विरोधकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 21 Apr 2026 04:40 PM (IST)

    21 Apr 2026 04:40 PM (IST)

    लेन्सकार्टमध्ये तिलक-टिकली वाद, नालासोपाऱ्यात विश्व हिंदू महासंघाचा निषेध

    चष्मा विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या Lenskart या कंपनीत तिलक, टिकली आणि कलावा धारण करण्यास मज्जाव केल्याचा आरोप समोर आल्याने नालासोपाऱ्यात वाद निर्माण झाला आहे. कंपनीचे सहसंस्थापक पियुष बन्सल यांच्याशी संबंधित या मुद्द्यावर स्थानिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. या पार्श्वभूमीवर नालासोपारा पूर्व येथील ब्रॉडवे समोरील मार्वल इमारतीतील लेन्सकार्टच्या दुकानात विश्व हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भेट देत निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना तिलक लावून हिंदू परंपरा व संस्कृतीचे पालन करण्यास घाबरू नये, असे आवाहन केले. तसेच, धार्मिक प्रतीकांवर निर्बंध घालण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

  • 21 Apr 2026 04:35 PM (IST)

    21 Apr 2026 04:35 PM (IST)

    महात्मा फुले जनआरोग्य योजनेत 2,399 उपचारांचा समावेश

    महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा मोठा विस्तार करण्यात आला असून आता २,३९९ उपचारांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचारांचे आरोग्य कवच मिळणार आहे. हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड व मेंदूच्या आजारांसह अपघाती शस्त्रक्रियांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे गंभीर आजारांवरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत.

  • 21 Apr 2026 04:30 PM (IST)

    21 Apr 2026 04:30 PM (IST)

    संतोष देशमुखांच्या पत्नीला निवडणूक लढवायची नव्हती,कुटुंबीयांचा दबाव

    मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे आता या ठिकाणी सरपंच पदाची पोटनिवडणूक होत आहे.. या निवडणुकीमध्ये अश्विनी देशमुख व स्वरूपानंद देशमुख हे दोन उमेदवार समोर उभे राहिले असून स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना ही निवडणूक लढवायची नव्हती. त्यांच्यावर कुटुंबातून दबाव आला त्यामुळे त्या निवडणूक रिंगणात उतरल्याचा दावा विरोधी उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केला आहे... संतोष देशमुख यांचे विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मी पूर्ण करणार आहे. याशिवाय संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये मी शेवटपर्यंत सहभागी राहणार असल्याचे देखील स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटले आहे.

  • 21 Apr 2026 04:25 PM (IST)

    21 Apr 2026 04:25 PM (IST)

    बाबाजानी दुर्राणींचे नगरसेवक पद धोक्यात, पालिकेची नोटीस

     

    पाथरी शहरातील हनुमान नगर येथील दहा हजार स्क्वेअर जगात तिची अंदाजे किंमत एक कोटी रुपये या ठिकाणी अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरनी साईबाबा मंदिर रोडवरील हमीद टॉवरचे बांधकाम अतिक्रमण करून केली असल्याने राज्याच्या नगरविकास विभागाने या प्रकरणी दखल घेतली आहे तर पाथरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी या प्रकरणी नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य तथा 17 वर्षे आमदार राहिलेले आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांना नोटीस बजावली आहे सदरील बांधकाम हे अनाधिकृत असून ते 30 दिवसांमध्ये स्वखर्चातून पाडावे अन्यथा नगरपालिका हे बांधकाम पाटील आणि त्याचा खर्च बाबाजानी दुर्राणी आणि त्यांच्या कुटुंबाकडून वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तर त्यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द करण्यात येऊ नये याबाबत खुलासा सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आली आहेत तर दुसरीकडे बाबाजानी दुरानी यांनी मोठ्या प्रमाणात या दोन्ही प्रकरणात अनियमित्ता केल्या असून ते व त्यांचे नातेवाईक या प्रकरणी जेलमध्ये जातील असा खळबळ जनक दावा शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केला आहे. परभणीच्या राजकारणातील मातब्बर नेते बाबाजानी दुर्राणी यांना अशी नोटीस बजावण्यात आली असल्याने परभणी मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

  • 21 Apr 2026 04:20 PM (IST)

    21 Apr 2026 04:20 PM (IST)

    वादळी वाऱ्यामुळे पपईची बाग भुईसपाट

    अकोला जिल्ह्याला काल वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला आहे. यामध्ये मूर्तीजापूर येथील शेतकरी पप्पू नंदकिशोर गुप्ता यांची पपईची बाग भुईसपाट झाली. सुमारे ४० ते ५० हजार रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ​पप्पू गुप्ता दरवर्षी पपई, सोयाबीन आणि हळदीची पिके घेतात. मात्र, यंदा पपई हे त्यांचे मुख्य पीक होते. काल झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे पपईची झाडे कोलमडली असून बागेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी या नुकसानीची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. कृषी विभागाने त्यांच्या बागेची पाहणी केली आहे. तातडीने पंचनामा करून योग्य ती मदत करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

  • 21 Apr 2026 04:15 PM (IST)

    21 Apr 2026 04:15 PM (IST)

    राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप कारवाईच्या मागणीसाठी उपोषण

    अहिल्यानगरच्या राळेगण थेरपाळ गावात वस्ती विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायत सदस्य किरण कारखिले यांनी कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा दावा केला आहे. तक्रारी करूनही प्रशासनाने कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे.

  • 21 Apr 2026 04:15 PM (IST)

    21 Apr 2026 04:15 PM (IST)

    वाडा तालुक्यात अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट

    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आज भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत भावेश दिलीप वावरे (वय 25) या कामगाराचा मृत्यू झाला असून चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींमध्ये मोनिका पडवळे, मोनिका जाधव, अर्चना मिसाळ आणि जयश्री रावते यांचा समावेश असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. संबंधित कारखान्यात एकूण सुमारे 32 कामगार काम करत असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

  • 21 Apr 2026 04:10 PM (IST)

    21 Apr 2026 04:10 PM (IST)

    रेल्वे कारशेड चे काम पावसाळ्यात येणाऱ्या महापुराचा धोका वाढणार असल्याने बंद पाडले

    मध्य रेल्वे वरील मुंबई पुणे मेन लाइन वरील कर्जत तालुक्यात भिवपुरी रोड ते कर्जत या दरम्यान रेल्वे कडून कारशेड बांधले जाणार आहे.या कारशेड कामासाठी मातीचा भराव करण्याचे काम सुरू असून उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार कर्जत तहसीलदार यांनी जागेची पाहणी केली.मात्र ठोस उपाययोजना करीत नाही तोवर मातीच्या भराव टाकण्याचं काम बंद करावे ही मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे यशस्वी ठरली आहे.दरम्यान दरवर्षी वावे, बेंडसे,भातगाव आणि बार्डी गावात महापुराचे पाणी शिरते,नवीन माती भराव यामुळे या भागात पावसाळ्यात महापूर सदृश परिस्थिती निर्माण होईल तेव्हा अनेक गावे पाण्यामध्ये अडकून पडतील.तहसीलदार यांच्याकडून स्थळ पाहणी करण्यात आल्यानंतर पुढील आठ दिवसात वरिष्ठ स्तरावर बैठक लावून तेथे करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांच्यावर निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

  • 21 Apr 2026 04:05 PM (IST)

    21 Apr 2026 04:05 PM (IST)

    महानगरपालिकेच्या दवाखान्यात महिन्या भरापासून रोटा व्हायरस लसीचा तुटवडा

     

    वसई-विरार शहर महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून रोटा व्हायरस लस उपलब्ध नाही.पालकांची गैरसोय  लस नसल्यामुळे लहान मुलांच्या पालकांना वारंवार दवाखान्यांचे फेरे मारावे लागत असून चिंता वाढली आहे.लसीचे महत्त्व  ही लस लहान मुलांमध्ये होणारा गंभीर जुलाब, उलट्या आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.लसीकरण वेळापत्रक – बाळांना 6, 10 आणि 14 आठवड्यांत तोंडावाटे 3 डोस दिले जातात; वेळेत लस न मिळाल्यास आजाराचा धोका वाढतो.

  • 21 Apr 2026 03:50 PM (IST)

    21 Apr 2026 03:50 PM (IST)

    Nanded Politics : जयंतीचा मेळा की राजकीय खेला?

    Nanded News : नांदेड : महात्मा बसवेश्वर जयंतीच्या निमित्ताने नांदेड शहरातील कौठा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भव्या कार्यक्रमाने सामाजिक एकात्मतेचा संदेशा दिला असला, तरी त्यामागे नव्या राजकीया समीकरणांची साखर पेरणी सुरू झाल्याची चर्चा राजकीय (Political News) वर्तुळात रंगू लागली आहे. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवा संघटनेची राजकीय ताकद लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्यांना बरोबर घेऊन यावर्षीची बसवेश्वर जयंती साजरी केल्यामुळे राजकीय निरीक्षकाच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • 21 Apr 2026 03:40 PM (IST)

    21 Apr 2026 03:40 PM (IST)

    श्रीसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात घुमला शास्त्रीय संगीताचा स्वर

    सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आयोजित ‘सिद्ध कलाविष्कार’ या शास्त्रीय संगीत सभेला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवार (दि.१८) रोजी पार पडलेल्या या स्वर-सोहळ्याने मंदिर परिसर भक्तिमय आणि सुरेल वातावरणाने भारावून गेला. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार-प्रचार व्हावा आणि तरुण पिढीला या कलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष सिद्धेश्वर बमणी, माजी सभापती महादेव चाकोते, बाळासाहेब भोगडे, प्रकाश बिराजदार, नीलकंठप्पा कोनापुरे, डॉ. माधवी रायते आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्री सिद्धरामेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

  • 21 Apr 2026 03:30 PM (IST)

    21 Apr 2026 03:30 PM (IST)

    Amarnath Yatra 2026 : एक दैवी चमत्कार आणि कबुतरं झाली अमर

    Amarnath Yatra 2026: चार धाम यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यांना हिंदू धर्मात आणि शिवभक्तांमध्ये देखील विशेष महत्व आहे. आराध्य देव म्हणून भगवान शिवाला पाहिलं जातं. जसं चार धाम यात्रेला महत्व आहे तसंच शिवभक्तांसाठी अमरनाथ यात्रा देखील महत्वाची आहे. धर्मग्रंथांमध्ये आणि इतर काही पौराणिक संदर्भानुसार, अमरनाथ गुहेबद्दल अनेक रंजक कथा आहेत. उंचसखल टेकड्यांमध्ये वसलेले हे पवित्र स्थान श्रद्धा, धैर्य आणि मुक्ती यांचा एक अद्भुत संगम आहे. धर्मग्रंथांमध्ये अमरनाथ गुहेबद्दल अनेक आकर्षक कथा सांगितल्या आहेत. पौराणिक कथेनुसार, याच ठिकाणी भगवान शिवाने माता पार्वतीला सर्वप्रथम अमर कथा सांगितली.

  • 21 Apr 2026 03:19 PM (IST)

    21 Apr 2026 03:19 PM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

    8th Pay Commission News Marathi: वाढती महागाई आणि घरगुती खर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगाबद्दलची चर्चा झाली असून किमान मूळ वेतनात लक्षणीय वाढ होण्याच्या अफवा पसरल्या आहेत. सध्याचे १८,००० रुपयांचे मूळ वेतन वाढवून ६९,००० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे, म्हणजेच एकाच वेळी ५१,००० रुपयांची मोठी वाढ. हा आकडा आश्चर्यकारक वाटत असला तरी, कर्मचारी संघटनांनी यामागे ठोस तर्क आणि एक नवीन आर्थिक गणित मांडले आहे. ही मागणी कशी निर्माण झाली आणि सरकार प्रत्यक्षात याला मंजुरी देईल का, हे सविस्तर जाणून घेऊया…

  • 21 Apr 2026 03:09 PM (IST)

    21 Apr 2026 03:09 PM (IST)

    Beed Crime: ‘मुलीचं लग्न माझ्याशी लावा’ नाही तर...

    बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने जबरदस्ती घरात घुसून तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लाऊन द्या, अन्यथा तिच्या वडिलांना जीव ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील एका खेडेगावात घडली.

  • 21 Apr 2026 02:59 PM (IST)

    21 Apr 2026 02:59 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी

    सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. कणकवली शहरात अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची तारांबळ उडाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे पाऊस सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांचे विक्रीसाठी आणलेले साहित्य भिजून गेले होते.

  • 21 Apr 2026 02:51 PM (IST)

    21 Apr 2026 02:51 PM (IST)

    भारतीय कामगार सेनेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्धव ठाकरेंचे भाषण

    भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण दिले. यावेळी भाषणात ते म्हणाले की, कोणी कितीही मोठा असला तरी काळ बदलत असतो आणि प्रत्येकाचा काळ जातो. माणसात आत्मविश्वास असेल तर त्याला कोणी हरवू शकत नाही. तसेच, लोक येतात आणि जातात, पण त्यांच्या कर्माची छाप कायम राहते.

  • 21 Apr 2026 02:40 PM (IST)

    21 Apr 2026 02:40 PM (IST)

    प्रियंका चतुर्वेदींवर ठाकरे गटातील अंतर्गत टीका उघड

    महिला आरक्षण विधेयकावरून ठाकरे गटात मतभेद उघड झाले आहेत. पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात मत व्यक्त केल्यामुळे माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर पक्षातीलच नेते सचिन अहिर यांनी उपरोधिक टीका केली. या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी समोर आली असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • 21 Apr 2026 02:32 PM (IST)

    21 Apr 2026 02:32 PM (IST)

    मनोरुग्णालय कर्मचाऱ्यांचा संप; सेवांवर परिणाम

    रत्नागिरी, पुणे आणि नागपूर येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. रत्नागिरीत 50 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. किचन व वॉर्डमधील कामकाजावर परिणाम झाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे व रिक्त पदे भरणे या प्रमुख मागण्या असून त्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे.

  • 21 Apr 2026 02:21 PM (IST)

    21 Apr 2026 02:21 PM (IST)

    जप्त केलेलं आमचं जहाज अमेरिकेनं सोडावं, इराणची मागणी

    अमेरिकेच्या नौदलाकडून इराणी तुस्का नावाचं जहाज जप्त करण्यात आलं आहे. अमेरिकेने जप्त केलेलं आमचं जहाज सोडावं, इराणने मागणी केली आहे. चीनहून इराणकडे केमिकल घेऊन जहाज येत होतं या केमिकलचा उपयोग क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी होतो अमेरिकेचा दावा केला आहे.

  • 21 Apr 2026 02:00 PM (IST)

    21 Apr 2026 02:00 PM (IST)

    Women Reservation महिला आरक्षणावरून काँग्रेसची केंद्रावर टीका

    महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत अंमलबजावणीतील विलंब आणि आकडेवारीतील संदिग्धतेवर प्रश्न उपस्थित केले. माजी आमदार अभय छाजेड यांनी महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत भूमिका स्पष्ट करत, सरकारकडून पारदर्शकतेची मागणी केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे, राजेंद्र शेलार, रजनी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

  • 21 Apr 2026 01:55 PM (IST)

    21 Apr 2026 01:55 PM (IST)

    तुम्हीही अनधिकृत बांधकाम केलंय? तर आता महापालिकेचा हातोडा पडणार

    सध्या पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई अधिक तीव्र आणि प्रभावी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

  • 21 Apr 2026 01:50 PM (IST)

    21 Apr 2026 01:50 PM (IST)

    ‘मटका किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षकांसोबत कलाकारांचीही उत्सुकता शिगेला, करण जौहरकडून विशेष दाद

    ‘मटका किंग’ या बहुप्रतिक्षित वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.१९६० च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित ही कथा एका कापूस व्यापाऱ्याच्या प्रवासावर आधारित आहे. एक साधी कल्पना कशी हळूहळू संपूर्ण शहरभर गाजणाऱ्या मोठ्या घटनामध्ये बदलते, हे या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.या अनोख्या कथानकामुळे ‘मटका किंग’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या वॉच लिस्टमध्ये वरच्या स्थानावर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 21 Apr 2026 01:45 PM (IST)

    21 Apr 2026 01:45 PM (IST)

    दृष्टिहीन शेतकऱ्याने पिकवला दहा एकर कांदा, सटाण्यातील डॉ. कांतीलाल दुबे यांची प्रेरणादायी कहाणी

    नाशिक जिल्हा म्हटलं की कांद्याचं माहेरघर अशी ओळख सहजपणे समोर येते. बागलाण, कळवण, देवळा या तालुक्यांतील शेतकरी नवनवीन प्रयोग करत उत्पादन वाढवत आहेत. मात्र या साऱ्यांमध्ये सटाण्यातील एका अंध शेतकऱ्याची कहाणी वेगळी ठरते. कारण ती केवळ शेतीतील यशाची नाही, तर जिद्द, आत्मविश्वास आणि अंतरदृष्टीची आहे.

  • 21 Apr 2026 01:40 PM (IST)

    21 Apr 2026 01:40 PM (IST)

    ‘इराण धमक्यांपुढे झुकणार नाही’; गालिबाफ यांचा शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांना मोठा इशारा

    अमेरिका आणि इराण तणाव (US Iran Conflict) आता टोकाला पोहोचला आहे. ट्रम्प वांरवार इराणला कडक शब्दात इशारा देत आहे. जोपर्यंत शांतता चर्चा सफल होत नाही, तोपर्यंत होर्मुझमधील नाकेबंदी सुरुच राहिले असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर इराणच्या संसदेचे अध्यक्ष गालिबाफ यांनी ट्रम्प यांच्या धमकीला कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

  • 21 Apr 2026 01:35 PM (IST)

    21 Apr 2026 01:35 PM (IST)

    Bigg Boss Marathi 6 मध्ये यश मिळवल्यानंतर तन्वी कोलते चर्चेत

    Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले दणक्यात पार पडला. सीझन 6 च्या महाविजेत्याची घोषणा करण्यात आली. महिलेने ट्रॉफी जिंकत नवा इतिहास रचला आहे. संपूर्ण सीझनभर सातत्यपूर्ण कामगिरी, टास्कमधील ठाम भूमिका आणि प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा यामुळे हा विजय विशेष ठरला. घरातील संघर्ष, मैत्री, रणनीती आणि भावनिक क्षण यांचा योग्य समतोल साधत तिने शेवटपर्यंत दमदार खेळ केला.या सीझनची विजेती दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी कोलते ठरली आहे. तिच्या विजयामुळे चाहत्यांमध्ये आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण असून सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • 21 Apr 2026 01:25 PM (IST)

    21 Apr 2026 01:25 PM (IST)

    पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर

    नारी शक्ती विधेयकाचा विषय पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही गाजला. “नारी फुल नही चिंगारी है” तसेच “नारी शक्ती विधेयकास विरोध करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी सभेत जोरदार घोषणाबाजी केली. संसदेत मांडण्यात आलेल्या ‘नारी शक्ती सन्मान विधेयका’च्या नामंजुरीचे पडसाद सोमवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये घोषणाबाजी आणि गोंधळ झाल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर महापौरांनी मध्यस्ती करत सर्व सभासदांना जागेवर बसण्याच्या सूचना दिल्या. आणि कामकाजाला सुमारे अर्धा तास विलंब झाला.

  • 21 Apr 2026 01:16 PM (IST)

    21 Apr 2026 01:16 PM (IST)

    संशयातून भीषण कांड! पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या, नंतर स्वतःचं आयुष्य संपवलं

    उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून आणि संशयातून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्यांनतर त्याने आत्महत्या केली. ही घटना उत्तरप्रदेश येथील बांदा जिल्ह्यातील बबेरू कोतवाली क्षेत्रातील बगेहटा गावात घडली.

  • 21 Apr 2026 01:09 PM (IST)

    21 Apr 2026 01:09 PM (IST)

    संजय राऊतांनी काढले सत्ताधारी नेत्यांचे वाभाडे

    महिला आरक्षण विधेयकावरुन देशामध्ये आणि राज्यामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. हे विधेयक नामंजूर झाल्यामुळे भाजप नेत्यांनी विरोधकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विरोधकांपैकी कोणीही आरक्षणाच्या मुद्द्यावर माझ्सासोबत डिबेट करावी, मी तयार आहे. असे आव्हान दिले. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारुन तुम्ही वेळ व ठिकाण सांगा. असेही संसदेमध्ये काय झालं हे मी सांगू शकेन, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीसांना दिले. यावरुन खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) देखील मुख्यमंत्री फडणवीसांना खरपूस समाचार घेतला.

  • 21 Apr 2026 01:02 PM (IST)

    21 Apr 2026 01:02 PM (IST)

    एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ

    उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना व सुट्टीमध्ये आजोळी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. याची अंमलबजावणी सुरू झालेली असल्याने प्रवासी पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पालक सहलींचे आयोजन करतात. उन्हाळ्याच्या दिवसात एसटी बसला होणारी गर्दी लक्षात घेऊन उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे. आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेल पुरवठ्यावर झालेला परिणाम आणि वाढते खर्च यामुळे ही दरवाढ अटळ असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ही तात्पुरती भाडेवाढ १५जून पर्यंत राहणार असून, त्यानंतर दर पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

  • 21 Apr 2026 12:48 PM (IST)

    21 Apr 2026 12:48 PM (IST)

    महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र; विनायक राऊतांचा आरोप

    भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण, शेळके अपघात प्रकरण आणि राज्यातील वाढत्या ड्रग्जच्या विळख्यावरून सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

  • 21 Apr 2026 12:35 PM (IST)

    21 Apr 2026 12:35 PM (IST)

    प्रणिती शिंदेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले

    फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. टिळक भवन येथे झालेल्या विशेष पत्रकार परिषदेला काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे व खासदार शोभा बच्छाव यांनी संबोधित केले. यावेळी दोन्ही खासदारांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून देशाचे तुकडे पाडायचे होते. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह सर्व विरोधकांनी हाणून पाडला असून सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा, नरेंद्र मोदींनाही चर्चेला आणा, असे प्रतिआव्हान काँग्रेस कार्य समितीच्या सदस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले आहे.

  • 21 Apr 2026 12:25 PM (IST)

    21 Apr 2026 12:25 PM (IST)

    कोरेगाव पार्क परिसरात तरुणावर हल्ला

    पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्कातील गाडगे वसाहतीत एकाच्या गळ्यावर लोखंडी हत्याराने वार करून वैमनस्यातून तरूणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव बबन राजगुरु (वय २७, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ किशोर गायकवाड (वय २३, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत गायकवाड यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 21 Apr 2026 12:12 PM (IST)

    21 Apr 2026 12:12 PM (IST)

    नगरसेवक अमाेल बालवडकरांच्या आरोपानंतर महापौरांकडून चौकशीचे आदेश

    बाणेर येथे उभारण्यात आलेले महापालिकेचे सुमारे ४० काेटी रुपयांचे रुग्णालय एका संस्थेला पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चालविण्यास दिल्याचा आराेप नगरसेवक अमाेल बालवडकर यांनी सर्वसाधारण सभेत केला. यानंतर नगरसेवकांनी आराेग्य सुविधांवर टिका केल्यानंतर महापाैर मंजुषा नागुपरे यांनी चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनानाला दिले आहेत.

  • 21 Apr 2026 12:01 PM (IST)

    21 Apr 2026 12:01 PM (IST)

    राजशिष्टाराचा हरताळ; खासदार धानोरकर आक्रमक, लोकसभा अध्यक्षांकडे विशेषाधिकार भंगाची मागणी

    चंद्रपूर महापालिकेच्यावतीने आयोजित 'हिराई महोत्सवा'च्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) मुद्द्यावरून मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच जिल्हा प्रशासन आणि मनपावर ताशेरे ओढले आणि कार्यक्रमातून 'वॉक आऊट' केले. याप्रकरणी आता त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेत विशेषाधिकार भंगाची मागणी केली आहे.

  • 21 Apr 2026 12:00 PM (IST)

    21 Apr 2026 12:00 PM (IST)

    अनेक ठिकाणी गॅस टंचाई कायम; तीन आठवड्यांपासून सिलेंडर नाहीच, नागरिकांचे हाल

    कणकवली तालुक्यातील फोंडा घाट परिसरातील गावांमध्ये मागील तीन आठवड्यांपासून इंडेन गॅसची गाडी न आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रशिया-युक्रेन किंवा मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील विस्कळीतपणाचा फटका आता थेट ग्रामीण भागातील चुलींपर्यंत पोहोचला असल्याचे चित्र दिसत आहे.

  • 21 Apr 2026 11:53 AM (IST)

    21 Apr 2026 11:53 AM (IST)

    नऊ महिन्यांच्या गर्भवतीचा खून; सोलापूरमधील घटना, 'एक्स बॉयफ्रेंड'चा प्रकार

    लग्नास नकार दिल्याचा जुना राग मनात धरून एका नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला एक्स बॉयफ्रेंडने संपवल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सोनी गणेश रामपुरे असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापू सुरेश आरगोड याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  • 21 Apr 2026 11:50 AM (IST)

    21 Apr 2026 11:50 AM (IST)

    वेटिंग लिस्टमध्ये तिकिट अडकलंय? IRCTC च्या ‘ऑप्ट विकल्प’ फिचरने मिळू शकते Confirm Ticket; जाणून घ्या प्रोसेस

    लांबचा प्रवास करायचा तर तिकीट बुक करणं आणि ते कन्फर्म होणं फार महत्त्वाचं ठरतं. तुमचं तिकीट जर कन्फर्म झालं नाही तर प्रवासात बसायला सीट मिळू शकत नाही. अशात कन्फर्म तिकिट प्रवासासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. तुमचेही तिकिट जर वेटिंग लिस्टमध्ये अडकले असेल आणि तुम्हाला ते कन्फर्म करायचे असेल तर आयआरसीटीसीच्या ‘ऑप्ट विकल्प’ फिचरची तुम्हाला मदत होऊ शकते. या फिचरच्या मदतीने तुम्हाला तुमचे वेटिंग लिस्टमध्ये अडकलेले तिकिट कन्फर्म करता येणार आहे.

  • 21 Apr 2026 11:48 AM (IST)

    21 Apr 2026 11:48 AM (IST)

    हुतात्मा साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून रणकंदन

    सांगलीच्या वाळवा इथल्या क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्या विरोधात सभासदांकडून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारखान्याचे चेअरमन व क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडींची सुपुत्र वैभव नायकवाडी यांच्यावर गंभीर आरोप करत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कारखाना कर्जमुक्त करण्याबरोबर विद्यमान चेअरमन वैभव नायकवडी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली असून, या आंदोलनामध्ये नागनाथ अण्णा नायकवडींचे नातू आणि वैभव नायकवडीचे पुतणे माजी सरपंच गौरव नायकवडी देखील सहभागी झाले आहेत.

  • 21 Apr 2026 11:45 AM (IST)

    21 Apr 2026 11:45 AM (IST)

    ‘ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शंकुतला देवी यांची पुण्यतिथी

    भारतातील सुप्रसिद्ध गणितज्ञ आणि “ह्यूमन कॉम्प्युटर” म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या शंकुतलादेवी यांची पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना अंकांची विलक्षण आवड आणि नैसर्गिक गणिती क्षमता होती. कोणत्याही प्रकारची गुंतागुंतीची गणिते त्या काही सेकंदांत तोंडी सोडवत असत. त्यांनी जगभरात विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या गणिती कौशल्याचे प्रदर्शन केले. १९८० मध्ये त्यांनी अतिशय मोठ्या दोन संख्यांचा गुणाकार केवळ काही सेकंदांत करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले. त्यांच्या या अद्भुत क्षमतेमुळे त्यांना “ह्यूमन कॉम्प्युटर” ही उपाधी मिळाली.

  • 21 Apr 2026 11:40 AM (IST)

    21 Apr 2026 11:40 AM (IST)

    विज्ञान भवनमध्ये होणार अधिकारी वर्गाचा गौरव; उपराष्ट्रपती अन् पंतप्रधान मांडणार विचार

    आज सर्वत्र मोठ्या उत्साहामध्ये ‘नागरी सेवा दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मंगळवारी ‘नागरी सेवा दिना’निमित्त देशातील सनदी अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहे. सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनानुसार, १९४७ साली याच दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखिल भारतीय प्रशासकीय सेवेच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना, सनदी अधिकाऱ्यांना भारताचा भक्कम पाया असे संबोधले होते. हा प्रसंग नागरिक-केंद्रित प्रशासनाप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करतो. तेव्हापासून दरवर्षी नागरी सेवा दिन साजरा केला जातो.

  • 21 Apr 2026 11:36 AM (IST)

    21 Apr 2026 11:36 AM (IST)

    पंढरपूरच्या नगराध्यक्षांवर टक्केवारीचा आरोप; उद्यान लोकार्पणावरून भाजप आमने-सामने

    पंढरपूर इथला जिजामाता उद्यान लोकार्पण कार्यक्रमावरून भाजप शिवसेना आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. उद्यान लोकार्पण कार्यक्रमात भाजप आमदार समाधान आवताडे यांनी नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि त्यांच्या नगरसेवकांवर टक्केवारीचा गंभीर आरोप केला आहे‌.

Web Title: Marathi breaking news live updates maharashtra news marathi top news international news national news crime news live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:29 AM

Topics:  

  • Breaking News
  • Navarashtra Live Updates

संबंधित बातम्या

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा
1

Satara News: नागरिकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले तर फोडणार! कराड पंचायत समितीच्या सभेत सदस्यांचा महावितरणला थेट इशारा

Khan Sir News: खान सरांच्या कोचिंगवरील हल्ल्याने खळबळ; बिहारमध्ये चालतो तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा कोचिंग व्यवसाय
2

Khan Sir News: खान सरांच्या कोचिंगवरील हल्ल्याने खळबळ; बिहारमध्ये चालतो तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींचा कोचिंग व्यवसाय

National Politics: देशाच्या राजकारणात भूकंपाचे संकेत; आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर
3

National Politics: देशाच्या राजकारणात भूकंपाचे संकेत; आणखी एक मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर

Gram Panchayat elections 2026: ग्रामीण भागांत निवडणुकीचा धुरळा; १४,२३७ ग्रामपंचायतींमध्ये जोरदार तयारी
4

Gram Panchayat elections 2026: ग्रामीण भागांत निवडणुकीचा धुरळा; १४,२३७ ग्रामपंचायतींमध्ये जोरदार तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.