मध्य प्रदेश, राजस्थान-छत्तीसगडमध्ये भाजपकडून हरल्यानंतर काय म्हणाले राहुल गांधी?

देशातील चार राज्यांच्या निवडणूक निकाल हाती आले असून मध्य प्रदेश, राजस्थान-छत्तीसगडमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. याबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, हा जनादेश आनंदाने स्वीकारतो पण विचारधारेचा लढा सुरूच राहील.

    विधानसभा निवडणुकीत  (assembly election 2023) मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला असून भाजपने  विजय मिळवला आहे. तर, तेलंगणात काँग्रेसला काही प्रमाणात फायदा झाला आहे. तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपच्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिक्रीय समोर आली आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक निकाल स्वीकारला असून विचारधारेचा लढा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. राहुल यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहितं म्हण्टलं की, आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानचा जनादेश आनंदाने स्वीकारतो पण विचारधारेचा लढा सुरूच राहील.

    तेलंगणातील जनतेचे मानले आभार

    तेलंगणातील जनतेचे आभार मानताना राहुल गांधी म्हणाले की, ‘प्रजालू तेलंगणा बनवण्याचे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करू. जे दोरालू (जमीनदार) आणि जे प्रजालू (सामान्य लोकांसाठी) काम करतात त्यांच्या विरोधात लढा हा काँग्रेसच्या तेलंगणा प्रचाराचा मुख्य विषय आहे. तेलंगणातील विजयासाठी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हे प्रमुख कारण मानले जात आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने सर्वात तरुण राज्यात काँग्रेसला बळ दिल्याचे अनेक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

    तेलंगणातही भाजपला फायदा झाला

    राज्यात पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढल्याने तेलंगणातही भाजप उत्साहात आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा तेलंगणात भाजपने जवळपास दुप्पट मतदान केले आहे. भाजपने येथे 8 जागा जिंकल्या आहेत. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राज्यात काँग्रेसला 65 जागा मिळाल्या आहेत. तर बीआरएसला यावेळी केवळ ३९ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला ४६ जागा मिळाल्या आहेत, तर बीआरएसला ४९ जागा कमी पडल्या आहेत. त्याचवेळी भाजपला 7 जागांचा फायदा झाला आहे.