आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ओव्याचा काढा
पोट स्वच्छ करण्यासाठी कोणता पदार्थ खावा?
ओव्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
ओव्याचा काढा बनवण्याची सोपी कृती?
दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. सतत मसालेदार, अतितेलकट आणि जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी आणि इतर समस्या वाढण्याची शक्यता असते. बऱ्याचदा अपुऱ्या झोपेमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात गॅस, ऍसिडिटी आणि अपचन होते. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा इत्यादी गंभीर समस्या वाढून शरीराचे नुकसान होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ओव्याच्या काढ्याचे सेवन कशी करावे? ओव्याचा काढा बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. प्रत्येक घरात ओवा असतोच. ओव्याचे सेवन केल्यामुळे पोटात वाढलेल्या वेदना आणि अपचनाच्या समस्या कमी होऊन आराम मिळतो.(फोटो सौजन्य – istock)
Winter Health Problem: हिवाळ्यातील गुडघेदुखी काय आहेत कारणं, लक्षणं आणि उपचार
ओव्याचा काढा, भाजलेला ओवा इत्यादी कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. ओव्यामध्ये थायमॉल, कॅर्व्हाक्रोल, फ्लॅव्होनॉइड्स, विटामिन ए, विटामिन बी -कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि तंतुमय घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओवा चावून खाल्ल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जाईल. ओव्यामध्ये असलेल्या घटकांमुळे आतड्यांना आलेली सूज आलेली सूज कमी होण्यास मदत होते. हा पदार्थ बुरशीजन्य रोगांपासून सुटका मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरतो. पोटात वाढलेल्या वेदना शांत करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे.
काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात एक चमचा ओवा घालून उकळी येण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी येऊन टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले पाणी गाळून त्यात मध मिक्स करून प्यावे. यामुळे अपचन, आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस आणि पचनाच्या सर्वच समस्यांपासून कायमचा आराम मिळेल. जेवल्यानंतर काहींना पोटात जडपणा जाणवू लागतो. पोटात वाढलेल्या जडपणामुळे व्यवस्थित झोप सुद्धा लागत नाही. अशावेळी चिमूटभर ओवा गरम पाण्यासोबत खाल्ल्यास लगेच आराम मिळेल. थंडीच्या दिवसांमध्ये पोटात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी ओव्याचे सेवन करावे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात किंवा पोटात खूप जास्त वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. तसेच सर्दी, खोकला आणि कफाची समस्या कमी करण्यासाठी ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. ओव्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी गूळ किंवा मधाचा वापर करावा. यामध्ये असलेल्या थायमॉलमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल. ऍसिडिटी, छातीत वाढलेली जळजळ, आंबट ढेकर, अन्ननलिकेमध्ये जमा झालेले पित्त कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे.
Ans: फळे, भाज्या आणि धान्यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी असणे.
Ans: आहारात फायबरचे प्रमाण वाढवा, जसे की फळे, भाज्या आणि पूर्ण धान्यांचा समावेश करा.
Ans: आले चघळल्याने किंवा आल्याचा चहा प्यायल्याने पोटातील आम्ल नियंत्रित होते आणि पचन सुधारते.






