फोटो सौजन्य: Yandex
दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं अनेकांना जेवणानंतर गोड खायची सवय असते. काहींना जेवल्यानंतर गोड खाण्याचा मोह आवरत नाही. याबाबत तज्त्रांनी मार्दर्शन केलं आहे. सतत गोड खाण्याची सवय चांगली की वाईटच किंवा जेवल्यानंतर गोड खायची इच्छा होते याबाबत शरीर काय संकेत देतं ते जाणून घेऊयात.
शरीरात कोणत्या ना कोणत्या जीवनसत्वांची कमरता असेल किंवा मग मानसिकआणि शारीरिक आरोग्य नियंत्रित नसल्यास देखील गोड खाण्याची इच्छा होते असं तज्त्रांकडून सांगितलं जातं. खरंतर गोड खावं वाटणं हे खूप साधारण आहे पण तुम्हाला सतत जेवल्यानंतर गोड खायचं क्रेव्हिंग येत असेल तर तिथे तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
जेवणानंतर शरीरात इन्सुलिन पातळी वाढते. त्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होतं. यासगळ्याने शरीराला साखरेची गरज आहे असे संकेत मेंदू द्यायला लागतो. त्यामुळे सतत गोड खायची इच्छा निर्माण होते. खरंतर आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे गोड पदार्थ पचन सुधारण्यास मदत करतात. असं जरी असलं तरी तुम्ही जेवणानंतर काय गोड खाताय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
बरेच जण गोड खायची इच्छा होते म्हणून साखर, आईस्क्रिम किंवा लस्सी मिठाई असे गोड पदार्थ खातात. दररोज हे गोड पदार्थ खाण्याची तुम्हाला सवय असेल तर, याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या गोड पदार्थात साखर मोठ्या प्रमाणात असते. साखरेचं अतिप्रमाण आरोग्यासाठी गंभीर बाब होते.
गुळ खाणं आरोग्यदायी मानलं जातं. जेवल्यानंतर तुम्हाला जर गोज खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही गुळाचं सेवन करु शकता. गुळाने पचनसंस्था सुधारते. तसंच रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास देखील गुळ फायदेशीर ठरतं.
याच्या सेवनाने गोड खाल्याचं समाधान ही वाटेल. त्याबरोबर खजूर आणि मनुक्याच्या सेवनाने लोहाची कमतरता दूर होते. .योग्य प्रमाणात खजूर आणि मनुके खाल्याने रक्तदोष दूर होण्यास मदत मिळते.
डार्क चॉकलेटमध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया केलेली साखर रक्तात मिसळत नाही. फळांमध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने फळांचं सेवन करणं आरोग्यदायी मानलं जातं.