बंगालच्या झालमुरीचा वाढत ट्रेंड! या पदार्थांचा वापर करून झटपट बनवा तिखटजाळ बंगाली झालमुरी, नोट करा रेसिपी
सोशल मीडियासह संपूर्ण देशभरात बंगाल निवडणुकांची मोठी चर्चा रंगली आहे. त्यात मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालमुरीच्या दुकानाला भेट देत, झालमुरी खाण्याचा आनंद लुटला. त्यानंतर संपूर्ण भारतात एकाच पदार्थाची मोठी चर्चा रंगली. बंगाली झालमुरी हा पश्चिम बंगाल आणि कोलकातामधील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड पैकी ऐक एक आहे. महाराष्ट्रात भूक लागल्यानंतर ज्याप्रमाणे वडापाव खाल्ला जातो तसेच पश्चिम बंगालमध्ये झालमुरी खाल्ली जाते. हा पदार्थ चवीला अतिशय तिखट असतो. यात विविध मसाले आणि कांदा टोमॅटोचा वापर केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या दौऱ्यात चाखलेल्या झालमुरीचे आणि तिथे असलेल्या खाद्यसंस्कृतीचे कौतुक केले. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील राजकीय विजयामुळे बंगाली झालमुरी पुन्हा एकदा ट्रेडींगला आली आहे. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर विकतचे पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही बंगाली झालमुरी घरीच बनवून खाऊ शकता. या व्हायरल रेसिपीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चला तर जाणून घेऊया झालमुरी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






