सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
सकाळी उठल्यानंतर नियमित पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अनेकांना डिटॉक्स पेयांचे सेवन करण्याची सवय असते. डिटॉक्स ड्रिंक प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. डिटॉक्स पेयांसोबतच गाजर, बीट इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. गाजर खाल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळतो. उपाशी पोटी हेल्दी पेयांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि शरीर शुद्ध राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गाजर शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबट तिखट चवीचा गोडसर शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतो. गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन, जीवनसत्त्व ए आणि अँण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच शरीराला इतरही अनेक फायदे होतात. लिंबाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. यासोबतच आल्याच्या सेवनामुळे शरीराला आलेली सूज कमी होते आणि रक्तभिसरण सुधारते. चला तर जाणून घेऊया गाजर शॉट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
राजस्थानचा फेमस पदार्थ डाल ढोकाळी कधी चाखली आहे का? चवीसह आरोग्यासाठीही फायदेशीर आहे ही डिश