Jackfruit Kabab Recipe : तुम्ही कधी फणसाचे कबाब खाल्ले आहेत का? आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत आवरणाने भरलेले हे कबाब चवीला फार छान लागतात. पार्टी स्नॅक्ससाठी तुम्ही यांना घरीच बनवून पाहुण्यांना सर्व्ह करु शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
फणस हे फळ अनेकांच्या आवडीचं आहे.
तुम्ही कच्च्या फणसाची भाजी आजवर खाल्ली असेल.
फार कमी लोकांना माहितीये की यापासून कबाब देखील तयार केले जाऊ शकतात.
फणस ही एक बहुगुणी आणि पौष्टिक फळभाजी आहे. कच्च्या फणसापासून चवदार भाजी बनवली जाते. फणसाची भाजी, बिर्याणी किंवा कटलेट यांसोबतच फणसाचे कबाबही अतिशय चविष्ट लागतात. होय, तुम्ही बरोबर वाचलं भाजी, बिर्याणीप्रमाणेच फणसाचे कबाब देखील बनवता येतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे कबाब पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतात. आम्हाला खात्री आहे की याची चव घरातील सर्वांनाच खुश करून जाईल. चला रेसिपीजाणून घेऊया.