प्रत्येक घासात मिळेल भन्नाट चव! कमीत कमी साहित्यात बनवा मऊ लुसलुशीत मावा केक, नोट करून घ्या रेसिपी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडतो. वाढदिवसाच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात केक आणला जातो. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडचे आणि फ्लेवरचे केक उपलब्ध आहेत. क्रीम आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेले केक चवीला अतिशय सुंदर लागतात. पण नेहमीच विकतचे केक आणून खाण्याऐवजी झटपट कमीत कमी साहित्यात केक बनवावा. आज आम्ही तुम्हाला मऊ लुसलुशीत मावा केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला मावा केक घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. इराणी काळात मावा केक खूप जास्त फेमस होता. मात्र हल्ली क्रीमचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या केकमुळे मावा केक फार कमी बेकरीमध्ये मिळतो. कोणत्याही कॅफेमध्ये किंवा घरगुती बेकिंगमध्ये मावा केक बनवला जातो. हानिकारक क्रीमचा वापर करून तयार केलेला क्रीम केक खाण्याऐवजी घरी बनवलेला मावा केक खावा. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)






