भाज्या खाण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा झणझणीत टोमॅटोची चटणी, गरमागरम भाकरीसोबत लागेल मस्त
रोजच्या जेवणात किंवा डब्यासाठी त्याच ठराविक भाज्या खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. जेवणाच्या डब्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत पदार्थ खायला हवे असतात. पालेभाज्या, कडधान्य खायला अनेकांना आवडत नाही. कायमच विकतचे, तिखट, तेलकट पदार्थ सतत खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी झणझणीत टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटोची चटणी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडते. टोमॅटोच्या चटणीसोबत तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळता भात सुद्धा खाऊ शकता. ही चटणी कढईमध्ये न बनवताना तव्यात बनवावी. यामुळे चटणीला स्मोकी चव येईल आणि सगळेच आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया तवा टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






