अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी रसाळ हापूस आंब्यांपासून बनवा चविष्ट मोदक, नोट करून घ्या रेसिपी
हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येकाला सणाला विशेष महत्व आहे. त्याप्रमाणेच प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीसुध्दा मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने साजरा केली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथीची सुरुवात मंगळवारी होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे भक्त मनापासून उपवास करतात. उयाशिवाय गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून बाप्पाला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो. नैवेद्यात कायमच बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवले जाते. पण नेहमीच तेच ठरविक पदार्थ बाप्पाच्या नैवेद्यात दाखवण्याऐवजी तुम्ही रसाळ आंब्याचा वापर करून झटपट मोदक बनवू शकता. या पद्धतीने बनवलेले आंब्याचे मोदक चवीला अतिशय सुंदर लागतात. तुम्ही बनवलेले आंब्याचे मोदक लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया आंब्याचे मोदक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






