पंढरपूर : महाराष्ट्रातील मराठी माणसाचा अपमान होईल असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले असून, त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी व त्यांची हकालपट्टी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्यातून राजभवनाला १ लाख पत्र पाठवण्याचा संकल्प महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.
यावेळी अध्यक्ष महिबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, शहराध्यक्ष स्वप्नील जगताप यांनी कोश्यारी यांचा निषेध व्यक्त करून १ हजार पत्र पाठवून देण्यात आली आहेत. असे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
मुंबईतून गुजराथी व राज्यस्थानी लोक निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. असे वक्तव्य करून कोश्यारी यांनी महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या १०६ हुत्मात्यांचा अपमान करून महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. राज्यपाल हे पद वरिष्ठ असून त्या पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचा प्रत्येकाला आदर आहे. मात्र सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करून राज्यपाल पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असून ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. यापूर्वी ही राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबत अनेकांकडून नाराजी व्यक्त करून देखील भाजपा अशा वाचाळ कोश्यारी यांना पाठीशी घालत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. याचा निषेध करण्यासाठी व राज्यपाल कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करण्यासाठी सदरची मोहीम राबविण्यात आल्याची शिंदे यांनी नमूद केले.
[read_also content=”पिंपरी- चिंचवड प्राधिकरण अन् ‘पीएमआरडीए’चा संबंधच काय?; मुख्यमंत्र्यांसमोर आमदार महेश लांडगे यांची आक्रमक भूमिका https://www.navarashtra.com/maharashtra/what-is-the-relationship-between-pimpri-chinchwad-authority-and-pmrda-aggressive-stance-of-mla-mahesh-landge-in-front-of-chief-minister-nrdm-311098.html”]
दरम्यान यावेळी जिल्हा सचिव अतुल खरात, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे, शुभम पवार, सुरज गंगेकर, विश्वजित व्यवहारे, राकेश साळुंखे, विशाल सावंत, दादा थिटे, संतोष बंडगर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.