मुंबई : शिवसेनेतील ३९ आमदारांनी (Shivsena 39 MLA) बंड केल्यानंतर आता नगरसेवक सुद्धा शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करत आहेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. (Many corporators from Navi Mumbai, Thane, Kalyan Dobinvali, Ambernath, Ulhasnagar, Mira Bhayander have joined the Shinde group) त्यानंतर आता खासदार (MP) सुद्धा शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. याला कारण सुद्धा असेच आहे. कारण आज शिंदे गटातील झालेल्या ऑनलाईन बैठकीला १४ खासदारांनी (Online Meeting 14 MP) हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळं शिवसेनेच्या गोटात चिंता वाढली असून, जर हे खासदार शिंदे गटात गेले तर शिवसेनेला आणखी मोठं भगदाड पडणार आहे.
[read_also content=”पद्मश्री लक्ष्मण माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/padmashri-laxman-mane-officially-joined-the-nationalist-congress-party-today-305515.html”]
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असं पत्र खासदार राहुल शेवाळेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. यानंतर खासदारांची नाराजी थोपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुर्मू यांनी पाठिंबा दिल्याचं बोललं जात आहे. मात्र आता शिवसेनेच्या १४ खासदारांनी थेट शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावल्याने उद्धव ठाकरे यांना अजून मोठा धक्का बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तसेच हे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.