Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026:उत्तर नेपाळच्या काही भागात पुरामुळे हाहाकार, पुरस्थितीमुळे 132 जणांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Today 2026: आज सकाळपर्यंत उपलब्ध ताज्या अपडेट्सच्या आधारे महाराष्ट्र, देश आणि विदेशातील राजकारण, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि क्रीडा क्षेत्रातील प्रमुख घडामोडी:

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 10:52 AM
Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Top Marathi News Today Live : नेपाळमध्ये जलप्रलय; हजारो लोक गेले वाहून

Follow Us
Follow Us:

Maharashtra to National And International Breaking News: 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस पुन्हा जोर धरणार असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांतराचे सत्र सुरू आहे. दुसरीकडे, मुंबईत कॅब आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या नियमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

 देशात साखरेच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

 

The liveblog has ended.
  • 26 Aug 2026 06:38 PM (IST)

    26 Aug 2026 06:38 PM (IST)

    Dharashiv News: धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा

    धाराशिव : जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठ्या संधी असून धाराशिव उद्योग, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी सज्ज आहे. स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उद्योग उभारावेत, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि धाराशिवला राज्याच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करावे, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

  • 26 Aug 2026 06:23 PM (IST)

    26 Aug 2026 06:23 PM (IST)

    पैसाच-पैसा! ना 100, ना 200 कोटी… US Open 2026 मध्ये टेनिसपटूंवर होणार तब्बल ‘इतक्या’ कोटींची बरसात

    टेनिस ग्रँड स्लॅम यूएस ओपन २०२६ (US Open 2026) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा ३० ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाईल. या स्पर्धेसाठी बक्षिसाच्या रकमेत विक्रमी वाढ झाली आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत २०% वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होणार आहे. यूएस टेनिस असोसिएशनने (USTA) स्पर्धेच्या बक्षीस रकमेची घोषणा केली. या हंगामात किती असेल प्राइस मनी, जाणून घेऊयात.

  • 26 Aug 2026 06:22 PM (IST)

    26 Aug 2026 06:22 PM (IST)

    Nepal Flash Floods Impact : नेपाळमधील नद्यांचे पाणी वाढल्यास बिहारमध्ये चिंता का निर्माण वाढते? जाणून घ्या

    Nepal Flash Floods Impact on Bihar: नेपालमध्ये पूर आणि नद्यांच्या पाण्याच्या वाढीच्या बातम्या समोर येताच बिहारमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण होते. याचे मुख्य कारण बिहार आणि नेपालची भौगोलिक स्थिती आहे. बिहारच्या उत्तरेकडे नेपाळसोबत सुमारे ७२९ किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक केली जाते. राज्याचे ७ जिल्हे थेट नेपाळच्या सीमेशी जोडलेले आहेत. नेपाळमधून वाहणाऱ्या अनेक नद्या बिहारमध्ये प्रवेश करतात, त्यामुळे नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर किंवा हिमथळ फुटण्याच्या घटनेचा परिणाम बिहारच्या सीमावर्ती आणि नदीकाठच्या भागांवरही पडू शकतो.

  • 26 Aug 2026 06:16 PM (IST)

    26 Aug 2026 06:16 PM (IST)

    Dadar Dindi Sohala 2026: दादरमध्ये सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींच्या उपस्थितीत दिंडी सोहळा संपन्न; वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह!

    Dadar Dindi Sohala 2026: दादर येथे सदगुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या उपस्थितीत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या वारकरी भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामस्मरणात दिंडी सोहळ्याला भक्तीचा रंग चढविला.

  • 26 Aug 2026 06:10 PM (IST)

    26 Aug 2026 06:10 PM (IST)

    Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान

    ICC Rankings/Jasprit Bumrah: सध्या भारत विरुद्ध श्रीलंका तर दुसरीकडे बांग्लादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सिरिज सुरू आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सिरिजमध्ये फिट नसल्यामुळे जसप्रीत बुमराहला संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे 36 वर्षीय मिशेल स्टार्कने याचा फायदा घेतला आहे. आयसीसी रॅंकिंगमध्ये त्याने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. याचा जसप्रीत बुमराहला फटका बसला आहे.

  • 26 Aug 2026 05:58 PM (IST)

    26 Aug 2026 05:58 PM (IST)

    श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर

    सध्या भारत आणि श्रीलंकेत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज सामन्याचा चौथा दिवस पार पडला. आज श्रीलंकेचा संघ 290 वर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले. मात्र दुसऱ्या डावात देखील श्रीलंकेची स्थिती बिकट झाला  आहे. चौथ्या दिवशीचा खेळ पावसामुळे काही काळ थांबवण्यात आला. त्यामुळे भारतीय संघाला विजेसाठी उद्याच्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची वाट पहावी लागणार आहे.

  • 26 Aug 2026 05:45 PM (IST)

    26 Aug 2026 05:45 PM (IST)

    हिमालयातून अचानक आलेल्या जलप्रलयाचे गूढ काय?

    नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे नेपाळची त्रेधातिरपीट उडाली आहे . पुराच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आजूबाजूचे वातावरण एकदम स्वच्छ दिसत आहे . त्यामुळे बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला आहे कि , पाऊस नसताना एवढा मोठा पूर कसा आला .

    Glacial Lake Outbrust Flood , मराठीत याला हिमनदीजन्य सरोवराचा अचानक उद्रेक होऊन येणारा पूर असे म्हणता येईल . हिमालयात हिमनद्या वितळताना त्यांच्या जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचून हिमनदीचे सरोवर ( Glacial Lake ) तयार होते. या सरोवराला अनेकदा बर्फ, दगड ,मातीचा नैसर्गिक बांध अडवून ठेवते

  • 26 Aug 2026 05:30 PM (IST)

    26 Aug 2026 05:30 PM (IST)

    सेरेना-अल्काराझचा पराभव; जोकोविच-सबालेन्काही पहिल्याच फेरीत गारद

    न्यूयॉर्कमध्ये वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा, यूएस ओपन ( US Open 2026) सुरू झाली आहे. याची सुरुवात मिश्र दुहेरीच्या सामन्याने झाली. न्यूयॉर्कमधील आर्थर ॲश स्टेडियमवर झालेल्या यूएस ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सेरेना विल्यम्स आणि कार्लोस अल्काराझ या स्टार जोडीला फ्लॅविओ कोबोली आणि बेलिंडा बेन्सिक यांच्याकडून ५-४(४), ४-१ असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे या अमेरिकन दिग्गज खेळाडूचे तीन वर्षांनंतर यूएस ओपनमधील पुनरागमन संपुष्टात आले.दरम्यान, नोव्हाक जोकोविच आणि आर्यना सबालेन्का यांना देखील पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

  • 26 Aug 2026 05:17 PM (IST)

    26 Aug 2026 05:17 PM (IST)

    नेपाळच्या महापुरात १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवरला जाणाऱ्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश

    नेपाळमध्ये आलेल्या अचानक महापुरामुळे (Nepal Flash Flood) मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः भारतीयांसाठी चिंता वाढवणारी बाब म्हणजे १०५ भारतीय पर्यटकांशी संपर्क होत नसल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंडळाच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यामध्ये मानसरोवर यात्रेसाठी निघालेल्या ३१ यात्रेकरूंचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 26 Aug 2026 04:58 PM (IST)

    26 Aug 2026 04:58 PM (IST)

    मराठीला डावलल्याचा आरोप; परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेवरून वाद चिघळला

    मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून सुरू झालेला वाद आता अधिक चिघळला आहे. निमंत्रण पत्रिका संपूर्णपणे हिंदी भाषेत छापण्यात आल्याने मराठी भाषेला डावलल्याचा आरोप होत असतानाच, पत्रिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम आणि नावांच्या स्पेलिंगमधील चुकांवरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

    महापालिकेच्या प्रशासकीय पदाशी संबंधित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी भाषेला प्राधान्य मिळणे अपेक्षित असताना संपूर्ण पत्रिका हिंदीत असल्याने मराठी भाषिक नागरिकांच्या भावना दुखावल्याची टीका होत आहे. याशिवाय भाजपच्या अंतर्गत प्रोटोकॉलचेही पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • 26 Aug 2026 04:49 PM (IST)

    26 Aug 2026 04:49 PM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत अँटी रेबीज मोहीम सुरू

    कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या श्वानांसाठी अँटी रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत तब्बल 60 हजार भटक्या श्वानांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात 20 हजार श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे.या मोहिमेत KDMCच्या पथकांसोबत श्वानप्रेमीही सहभागी झाले आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून, रेबीजचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. या मोहिमेची सुरुवात कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरातून करण्यात आली

  • 26 Aug 2026 04:36 PM (IST)

    26 Aug 2026 04:36 PM (IST)

    मुंबई लोकलमध्ये पुन्हा हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील वाद आणि हाणामारीच्या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या लोकलमधील हाणामारीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काही प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे. गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, कोणत्या लोकलचा किंवा कोणत्या रेल्वे स्थानकाच्या परिसरातील आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • 26 Aug 2026 04:23 PM (IST)

    26 Aug 2026 04:23 PM (IST)

    अमरावतीच्या घटनेनंतर उल्हासनगरातील सरकारी रुग्णालयांच्या फायर सेफ्टीवर प्रश्नचिन्ह

    अमरावतीतील एका रुग्णालयात घडलेल्या भीषण आगीनंतर आता उल्हासनगर शहरातील सरकारी रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे आणि समाजसेवक शिवाजी रगडे यांनी कॅम्प ३ येथील सरकारी सेंट्रल हॉस्पिटल तसेच कॅम्प ४ येथील मॅटर्निटी हॉस्पिटलची पाहणी केली.

    यावेळी उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. दोन्ही रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेल्या फायर सेफ्टी उपकरणांची आणि व्यवस्थेची माहिती घेण्यात आली तसेच त्यांच्या स्थितीची पाहणी करण्यात आली.

    पाहणीनंतर शिवाजी रगडे यांनी गंभीर सवाल उपस्थित करत सांगितले की, दोन्ही रुग्णालयांमध्ये फायर सेफ्टीची उपकरणे आणि यंत्रणा उपलब्ध आहेत; मात्र आपत्कालीन परिस्थितीत त्यांचा वापर कसा करायचा, याबाबत पुरेसे प्रशिक्षित कर्मचारी दिसून येत नाहीत. कोट्यवधी रुपये खर्च करून फायर सेफ्टीची यंत्रणा उभारण्यात आली असली, तरी तिचे योग्य पद्धतीने संचालन आणि देखभाल होत नसेल तर त्याचा उपयोग काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • 26 Aug 2026 04:13 PM (IST)

    26 Aug 2026 04:13 PM (IST)

    खेडमध्ये गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआरची जोरदार धडक; तिघे जखमी

    खेडमध्ये मुंबई-रत्नागिरी मार्गावर मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरणे नाका येथील वारकरी मठासमोर गणेशमूर्ती घेऊन जाणाऱ्या टेम्पोला वॅगनआर कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील एका पुरुषासह दोन महिला जखमी झाल्या असून, त्यातील एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.
    मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पेन येथून गणेशमूर्ती घेऊन साखरपा परिसराच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की वॅगनआरची दिशा बदलून ती मुंबईच्या दिशेने वळली, तर टेम्पो काही अंतर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला थांबला.

  • 26 Aug 2026 04:04 PM (IST)

    26 Aug 2026 04:04 PM (IST)

    आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडून शाळेतील पोषण आहा

    विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच उत्तम पोषण आहार आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी तिसगाव येथील जरिमरी माता प्राथमिक विद्यालय तसेच क. डों. म. पा. शाळा क्र. १८ येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी शाळेतील शालेय पोषण आहाराची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा तसेच शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व समस्यांची त्यांनी माहिती घेतली. मुख्याध्यापिका, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून शाळेच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी जाणून घेतल्या.

  • 26 Aug 2026 04:00 PM (IST)

    26 Aug 2026 04:00 PM (IST)

    DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीमध्ये ‘या’ पदांवर भरती जाहीर; २ लाखांपर्यंत पगार, त्वरित करा अर्ज!

    DPCC Recruitment 2026: दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) ग्रुप ‘ए’ च्या १७ रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत सीनियर एनवायरमेंटल इंजीनियर, एनवायरमेंटल इंजीनियर आणि असिस्टेंट एनवायरमेंटल इंजीनियर ही पदे भरली जाणार आहेत. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाईल, ज्यामध्ये सीनियर एनवायरमेंटल इंजीनियर पदासाठी कमाल वेतन दरमहा २,०९,२०० रुपयांपर्यंत असणार आहे. DPCC कडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, ही भरती नियमित आधारावर केली जाईल. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात आली असून, उमेदवारांना निर्धारित अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणीकृत पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष जमा करावा लागेल.

  • 26 Aug 2026 03:55 PM (IST)

    26 Aug 2026 03:55 PM (IST)

    Salman Khan 38 Years:‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास

    Salman Khan 38 Years: बॉलिवूडचा दबंग सुपरस्टार सलमान खान याने भारतीय सिनेसृष्टीत आपल्या कारकिर्दीची तब्बल ३८ वर्षे पूर्ण केली आहेत. एका छोट्या सहाय्यक भूमिकेतून सुरू झालेला त्याचा प्रवास आज भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि प्रभावी स्टारडमच्या कहाण्यांपैकी एक ठरला आहे. या खास टप्प्यानिमित्त सलमान खान फिल्म्सने सोशल मीडियावर एक खास सेलिब्रेशन व्हिडिओ शेअर करत त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीला उजाळा दिला आहे.

  • 26 Aug 2026 03:48 PM (IST)

    26 Aug 2026 03:48 PM (IST)

    Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप

    Nagpur News : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील अस्थायी कामगारांनी स्थायी नोकरीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. सकाळी ७वाजतापासून कामगार गेटसमोर एकत्र आले होते. कामगारांच्या मागण्यांकडे कंपनी व्यवस्थापनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. भारतीय कामगार सेनेचे सुनील जुमडे तसेच शिवसेना शिंदे गटाचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष ब्रिजलाल रघुवंशी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. कामगारांच्या मागण्या तातडीने मान्य करण्यासाठी व्यवस्थापनाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिस ठाण्यासह शहर व राखीव पोलिस दलाचे अधिकारी आणि जवान सकाळपासून कंपनी परिसरात तैनात केले होते.

  • 26 Aug 2026 03:40 PM (IST)

    26 Aug 2026 03:40 PM (IST)

    Badminton कोर्टवर भारताचा डंका! आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अर्जुन रेड्डीचा आदित्य किरणवर थरारक विजय

    पुणे/Badminton Comeptition: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित, जागतिक बॅडमिंटन महासंघ, बॅडमिंटन आशिया, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टी यांच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या अर्जुन रेड्डी अलुगुवेल्ली याने आठव्या मानांकित संयुक्त अरब अमिरातीच्या आदित्य किरणवर मात करत शानदार विजयी सलामी दिली.

  • 26 Aug 2026 03:30 PM (IST)

    26 Aug 2026 03:30 PM (IST)

    कापसाचे दर 10 हजारांवर जाणार? दिवाळीनंतर अधिक दर मिळण्याची शक्यता

    अकोला : यंदा जागतिक बाजारातील तेजी, रुपयाचे अवमूल्यन आणि कापसाची वाढती मागणी यामुळे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कापसाचा मुहूर्ताचा दर १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहण्याची शक्यता किसान नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली. जाबंधिया यांनी प्रसिद्धीपत्रकातून जागतिक बाजारातील परिस्थितीचे विश्लेषण केले. इराण-अमेरिका संघर्षांबरोबरच अल-निनोच्या प्रभावामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली. त्यातच रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ९५ ते ९६ रुपयांपर्यंत गेला, कच्या तेलाचे दरही ८५ ते ९५ डॉलर प्रतिपिंपलाच्या आसपास असल्याने मानवनिर्मित धाग्यांचे दर वाढले आहेत. परिणामी, सूताची मागणी वाढून कापसाच्या गाठींच्या दरातही वाढ झाली.

  • 26 Aug 2026 03:25 PM (IST)

    26 Aug 2026 03:25 PM (IST)

    Video Viral : मुंबई लोकलमध्ये नेमकं काय घडलं? भरगच्च रेल्वेत दोन जण भिडले, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील वाद आणि हाणामारीच्या घटना पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या लोकलमधील हाणामारीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. घटना नेमकी कोणत्या मार्गावर घडली आणि कधी घडली याची अधिकृत माहिती समोर आली नाही पण याचा व्हिडिओ मात्र सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. चला यात नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

     

  • 26 Aug 2026 03:20 PM (IST)

    26 Aug 2026 03:20 PM (IST)

    Maitreya Movie: चार मित्र, बदलती नाती अन् दडलेल्या भावना; ‘मैत्रेया’चं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

    Maitreya Movie:  मराठी सिनेसृष्टीत आगामी ‘मैत्रेया’ या चित्रपटाची सध्या चर्चा सुरू आहे. मैत्रीच्या नात्यातील बॉण्डिंग आणि त्यापलीकडे दडलेल्या भावनांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. याआधीच्या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे समोर आले नव्हते. मात्र, नव्या पोस्टरमधून समर, आयुषी, स्काय आणि रुची या चार प्रमुख व्यक्तिरेखांची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.

  • 26 Aug 2026 03:15 PM (IST)

    26 Aug 2026 03:15 PM (IST)

    Sony Marathi: ‘कोण होणार करोडपती’ मध्ये येण्यामागचं कारण ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने केलं स्पष्ट

    Sony Marathi: भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली माधुरी दीक्षित जेव्हा हॉटसीटवर स्पर्धक म्हणून नव्हे, तर सूत्रसंचालक म्हणून विराजमान होते, तेव्हा उत्सुकता निर्माण होणं साहजिकच आहे आणि याच उत्सुकतेचं उत्तर आहे ‘कोण होणार करोडपती’! या लोकप्रिय प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकपदी माधुरी दीक्षितची निवड झाल्याची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही तिच्या या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळवण्यासाठी Sony LIV ॲप किंवा WhatsApp द्वारे +91 85919 75331 वर नोंदणी सुरू झाली आहे.

  • 26 Aug 2026 03:10 PM (IST)

    26 Aug 2026 03:10 PM (IST)

    Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: एमपीएससीचा पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते! परीक्षा रद्द झाल्यावर रोहित पवार आक्रमक

    Rohit Pawar on Drug Inspector Exam Cancelled: MPSC पेपरफुटीच्या प्रकरणानंतर आयोगाने औषध निरीक्षक गट-ब पदाची भरती प्रक्रिया रद्द करत असल्याची घोषणा करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज MPSCच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.

    “राजकारण फार वंगाळ, यात शिरु नका. आम्हाला तुमच्यात उद्याचे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तलाठी आणि ड्रग इन्स्पेक्टर दिसतात. चांगले आणि प्रामाणिक अधिकारी हवे असतील, तर ते ज्या प्रक्रियेतून तयार होतात ती प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ असली पाहिजे,” असे रोहित पवार म्हणाले.

  • 26 Aug 2026 02:59 PM (IST)

    26 Aug 2026 02:59 PM (IST)

    16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक! अनिल अग्रवाल यांनी कसा बदलला गेम?

    वेदांता ग्रुपचे चेअरमन आणि अब्जाधीश उद्योगपती अनिल अग्रवाल हा ब्राँड काही सहज बनला नाही. त्याच्या मागे बरीच मोठी गोष्ट आहे. खडतर प्रवास आणि अत्यंत गरिबीतून सुरु झालेली ही वाट अथक प्रयत्नानंतर श्रीमंतीच्या वाटेवर पोहोचली. ही वाटचाल सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक आहे. त्यांनी आपला प्रवास अक्षरशः शून्य भांडवलातून सुरू केला होता. पण आपल्या पहिल्या मोठ्या अधिग्रहणासाठी कर्ज आणि उधारीतून त्यांनी ₹१.६ दशलक्ष उभे केले आणि इथून सुरु झाला प्रवास पुढे ब्राँड बनण्याचा.

  • 26 Aug 2026 02:50 PM (IST)

    26 Aug 2026 02:50 PM (IST)

    सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वयाचा अभाव, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; वाद चव्हाट्यावर

    सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यात कोणताही समन्वय नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. आता भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने प्राधिकरण व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा असलेला अभाव उघड उघड चव्हाट्यावर आला आहे.

  • 26 Aug 2026 02:40 PM (IST)

    26 Aug 2026 02:40 PM (IST)

    महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी, आंदोलन करण्याचा कंत्राटदार महासंघाचा इशारा

    गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86 हजार कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे थकवली असून यामुळेच आता कंत्राटदार टोकाचा पाऊल उचलत आहेत, असा आरोप होताना दिसत आहे. तर महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे आतापर्यंत सात कंत्राटदारांना आपला जीव गमावला आहे. यानंतर आता येत्या आठ दिवसांत शासनाने देयक वेळेवर दिली नाहीत रस्त्यावर उतरून आंदोलन करू इशारा असा इशारा कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी सरकारला दिला आहे.

  • 26 Aug 2026 02:30 PM (IST)

    26 Aug 2026 02:30 PM (IST)

    निघोजे ग्रामसभेत महिला सरपंच विरुद्ध महिला सदस्य; वाद थेट पोलीस ठाण्यात, गुन्हा दाखल

    निघोजे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असतानाच महिला सरपंच सुनीता येळवंडे आणि ग्रामपंचायत सदस्य छाया येळवंडे यांच्यात काही विषयांवरून वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर महिला सदस्याने सरपंचांवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ग्रामसभा सुरू असताना घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही तैनात होता. या प्रकारानंतर सरपंच सुनीता येळवंडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्य छाया येळवंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • 26 Aug 2026 02:21 PM (IST)

    26 Aug 2026 02:21 PM (IST)

    MPSC कडून औषध निरीक्षक भरती रद्द, दोषींवर कारवाईची उमेदवारांची मागणी

    MPSC कडून अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब भरती परीक्षा रद्द करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण शाखेच्या अहवालात परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघड झाले आहे. यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दोषींवर कारवाईची मागणी उमेदवारांनी केली असून लवकरच या पदासाठी फेरपरीक्षा घेतली जाणार असून त्याचे वेळापत्रक MPSC च्या संकेतस्थळावर जाहीर केलं जाणार आहे.

  • 26 Aug 2026 02:10 PM (IST)

    26 Aug 2026 02:10 PM (IST)

    ५०० रुपयांच्या लाचेसाठी उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्त्याला अटक, २ दिवसांची पोलीस कोठडी

    सायबर फ्रॉड केसमध्ये गोठवलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी न्यायालयातील अर्जावर अभिप्राय देण्याकरिता प्रत्येकी ५०० रुपये लाच मागितल्याप्रकरणी उल्हासनगरच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता सुषमा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला अधिवक्त्याच्या अर्जावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सुषमा पाटील यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

  • 26 Aug 2026 02:00 PM (IST)

    26 Aug 2026 02:00 PM (IST)

    वादानंतर क्रिती सेननची रक्षाबंधन जाहिरात हटवली; कपड्यांवरून झाला होता मोठा वाद

    बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन सध्या तिच्या आगामी चित्रपटांपेक्षा एका रक्षाबंधन विशेष जाहिरातीमुळे चर्चेत आहे. या जाहिरातीतील तिच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्वेलरी कंपनीसाठी कृतीने ही जाहिरात केली होती, त्या कंपनीने ती सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवल्याची माहिती समोर आली आहे.

  • 26 Aug 2026 01:55 PM (IST)

    26 Aug 2026 01:55 PM (IST)

    हैतीमध्ये सशस्त्र टोळीचा हैदोस! 47 जणांची निर्घृण हत्या अन् 50 हून अधिक जणांचे अपहरण

    कॅरिबियन बेट राष्ट्र असलेल्या हैतीमधून (America) एक अत्यंत धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. राजधानी पोर्ट-ओ-प्रिन्सच्या जवळ असलेल्या केन्सकॉफ या डोंगराळ भागात एका सशस्त्र टोळीने अचानक हल्ला चढवून विस्थापित नागरिकांची निर्घृण कत्तल केली. या रक्तरंजित हल्ल्यात निष्पाप मुलांसह किमान ४७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ५० हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हैती येथील एकात्मिक कार्यालयाने (BINUH) मंगळवारी या भीषण हत्याकांडाला दुजोरा दिला असून, अलिकडच्या वर्षांतील हे सर्वात मोठे आणि भयंकर सामूहिक अपहरण असल्याचे स्पष्ट केले आहे.

  • 26 Aug 2026 01:50 PM (IST)

    26 Aug 2026 01:50 PM (IST)

    16 लाख उधार घेत सुरु केला व्यवसाय, आज 3600000000000 चे मालक!

    भारतीय उद्योग विश्वातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक नाव म्हणजे अनिल अग्रवाल. वेदांता ग्रुपचे संस्थापक होण्यापासून ते संपूर्ण जगाच्या कोपऱ्या कोपऱ्यात नाव पोहोचलण्याचा प्रवास फार रंजक होता. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन त्यांच्या भूतकाळातील आठवणी आणि व्यावसायिक प्रवासाबाबतचा रंजक किस्सा शेअर केला आहे. यावेळी त्यांनी आपला अनुभव आलेल्या अडचणी या सगळ्याचा उल्लेख केला. यात सांगताना ते प्रकर्षाने म्हणाले की व्यवसायातील प्रत्येक प्रयत्न यशस्वी होतोचं असं नाही. कधीकधी अपयशच हा पर्याय पुढे जाण्याचा महत्त्वाचा मार्ग दाखवतो. नेमका कसा होता प्रवास?

  • 26 Aug 2026 01:45 PM (IST)

    26 Aug 2026 01:45 PM (IST)

    मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड आणले हे माहीत आहे!

    मुंबईपासून पुण्यापर्यंत कोणी कुठले गुंड होते हे मला चांगले माहित आहे. जावलीत कोण कुठून गुंड आणत याची चांगली मला माहिती आहे. असा घनाघाती शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आ. शशिकांत शिंदे यांनी जावळीतील राजकीय विरोधकांवर हल्लाबोल केला.

  • 26 Aug 2026 01:35 PM (IST)

    26 Aug 2026 01:35 PM (IST)

    भारताचे वर्ल्ड कप स्वप्न भंगले! अर्जेंटिनाकडून दारुण पराभव

    पुरुष हॉकी विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत ( FIH Hockey World Cup 2026) भारतीय संघाचा प्रवास आता संपला आहे. दुसऱ्या फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला अर्जेंटिनाकडून ३-५ असा पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीतील स्थानाच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला मोठ्या विजयाची गरज होती. परंतु, त्यांनी हा सामना गमवला. आता भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. यासह पुन्हा एकदा विश्वविजेता बनण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी, भारतीय संघाला नेदरलँड्सविरुद्धही पराभवाला सामोरे जावे लागले होते.

  • 26 Aug 2026 01:30 PM (IST)

    26 Aug 2026 01:30 PM (IST)

    मुंबईच्या आमदारांनी किती केले काम? रिपोर्ट कार्ड जाहीर; काँग्रेसचे आमदार अव्वल

    मुंबईतील आमदारांच्या विधिमंडळातील कामगिरीबाबत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या ‘मुंबईज एमएलए रिपोर्ट कार्ड २०२६’ (Mumbai MLA Report Card 2026) मध्ये मुंबईतील ३३ आमदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५ या कालावधीत आमदारांनी विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता, विधिमंडळातील सहभाग, उपस्थिती आणि इतर निकषांच्या आधारे हे मूल्यांकन करण्यात आले आहे.

  • 26 Aug 2026 01:25 PM (IST)

    26 Aug 2026 01:25 PM (IST)

    खूशखबर! सांगलीच्या एम.डी. पवार बँकेत नोकरीची सुवर्णसंधी

    सांगलीच्या एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि., उरुण इस्लामपूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत एकूण ११ रिक्त पदे भरली जाणार असून, यामध्ये शाखाधिकारी, ऑफिसर आणि शिपाई यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने किंवा ई-मेलद्वारे अर्ज करण्याची मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.

  • 26 Aug 2026 01:20 PM (IST)

    26 Aug 2026 01:20 PM (IST)

    ‘या’ शेअरमध्ये तुफान तेजी! गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल?

    शेअर बाजारमध्ये उलथापालथ माजली असताना कधी मार्केट तेजीमध्ये असतं तर कधी मार्केट लोअर सर्किटमध्ये असतं. पण मार्केटमध्ये प्रचंड हालचाल असताना मात्र काही स्टॉक्स आहेत जे गुंतवणूकदारांना तगडा नफा देत आहे. असा एक शेअर आहे जो सध्या मार्केटमध्ये तुफान तेजी दाखवत आहे. या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत. नेमका कोणता असा शेअर आहे ज्याने शेअर बाजारात इतकी तेजी दाखवत आहे. तुमच्याकडे हा शेअर आहे का? 

  • 26 Aug 2026 01:15 PM (IST)

    26 Aug 2026 01:15 PM (IST)

    सुपौलमध्ये भरधाव कारने कीर्तन करणाऱ्या भाविकांना चिरडले; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    बिहारच्या सुपौल जिल्ह्यात मंगळवारी रात्री भीषण रस्ता अपघात झाला. पिपरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटैया चौकाजवळ एनएच-३२७ई मार्गावर बजरंगबली मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करणाऱ्या सहा जणांना भरधाव कारने चिरडले. या दुर्घटनेत तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा पाचवर पोहोचला असून एका जखमीवर उपचार सुरू आहे.

  • 26 Aug 2026 01:05 PM (IST)

    26 Aug 2026 01:05 PM (IST)

    वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कशी झाली होती अरूणा इराणींबरोबर भेट

    फिल्ममेकर कुकू कोहली यांचे २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आले आहे. कुकू कोहली यांनी अभिनेत्री अरुणा ईराणी यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. मात्र, दोघांनीही त्यांचे नाते आणि लग्न अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवले होते.

  • 26 Aug 2026 01:00 PM (IST)

    26 Aug 2026 01:00 PM (IST)

    गुंतवणूकदारांचे पैसे झाले डबल? कंपनीने दिला 2 वेळा बोनस

    २० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा स्टॉक सध्या मार्केटमध्ये बराच चर्चेत आहे. सुपर टॅनरी हे या शेअरचं नाव आहे. हा पेनी स्टॉकमध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. बुधवारी BSE वर सुपर टॅनरीचे शेअर्स १०% नी वाढले. त्याची किमती सध्या १३.१० रुपयांवर पोहोचली. कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या ४ दिवसांत सुपर टॅनरीच्या शेअर्समध्ये ७१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना दोनदा बोनस शेअर्स देखील दिला आहे.

  • 26 Aug 2026 12:58 PM (IST)

    26 Aug 2026 12:58 PM (IST)

    IND vs SL: फॉलोऑन खेळणाऱ्या श्रीलंकेच्या २ विकेट्स, अजूनही १३० धावांनी मागे

    भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस सुरू आहे. कोलंबो येथील सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (एसएससी) मैदानावर भारतीय संघाने श्रीलंकेवर फॉलो-ऑन लादला आहे. श्रीलंकेचा दुसरा डाव नाजूक स्थितीत सुरु झाला आहे. दुपारच्या जेवणापर्यंत त्यांनी ८३ धावांत दोन गडी गमावले होते. श्रीलंका अजूनही १३० धावांनी मागे आहे. त्यामुळे श्रीलंका हरण्याची चिन्हं अधिक दिसून येत आहे. भारताच्या पहिल्या डावातील ५०३/९ या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, संपूर्ण श्रीलंकन ​​संघ केवळ २९० धावांत सर्वबाद झाला.

  • 26 Aug 2026 12:40 PM (IST)

    26 Aug 2026 12:40 PM (IST)

    भारतीय बाजारात Boltt चा पहिला स्मार्टफोन लाँच

    बोल्ट एस 5जी आणि बोल्ट इव्हो ची किंमत आणि उपलब्धता

    नव्या स्मार्टफोनच्या किंमतींबद्दल बोलायचं झालं तर, बोल्ट एस 5जी चे बेस व्हेरिअंट असलेल्या 4GB + 64GB मॉडेलची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होते. तर डिव्हाईसच्या 6GB +128GB व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. तसेच, या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आहे. बोल्ट इव्होच्या बेस व्हेरिअंटची किंमत 10,999 रुपयांपासून सुरु होते. तर 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये आहे. कंपनी डे 1 ऑफरअंतर्गत या स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंट्सच्या खरेदीवर 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. या स्मार्टफोन्सची विक्री भारतात 1 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे

  • 26 Aug 2026 12:35 PM (IST)

    26 Aug 2026 12:35 PM (IST)

    Gen Z साठी शिवसेनेचा नवा प्लॅन! स्पर्धा परीक्षा केंद्रांसह लोकप्रतिनिधींकडे फेलोशिपची संधी

     पर्यावरण, मानवाधिकार आणि जागतिक मुद्द्यांवर Gen Z सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप लवकर एकत्र येते आणि आपले मत उघडपणे मांडते. पारंपारिक नोकऱ्यांपेक्षा स्वतःचा व्यवसाय, स्टार्टअप कल्चर आणि उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत (Side Hustles) शोधण्याकडे त्यांचा कल असतो,अशाच पिढीसोबत अंधेरीत १५ हजार Gen Z शी शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला. (Shrikant Shinde)

    स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात अभ्यास केंद्र, आमदार व खासदारांकडे फेलोशीप प्रोग्रॅम शिवसेनेकडून लवकरच सुरु केले जातील, अशी ग्वाही शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. अंधेरी येथे आमदार मुरजी पटेल यांनी आयोजित केलेल्या युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार रवींद्र वायकर, महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आनंद परांजपे आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

  • 26 Aug 2026 12:30 PM (IST)

    26 Aug 2026 12:30 PM (IST)

    लेकीसाठी सिंगल आई बनले बाबा, Video Viral

    व्हायरल व्हिडिओ हा थायलंडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. एका थाई वडिलांनी आपल्या मुलीला मदर्स डेच्या दिवशी एकटे वाटू नये यासाठी काही खास करु पाहिले होते. मुख्य म्हणजे ही मुलगी त्यांची स्वत:ची नसून त्यांनी मुलीला दत्तक घेतलेले असते. शाळेत मदर्स डे निमित्त खास कार्यक्रम आयोजिक केलेला असतो ज्यात मुलांच्या आईची उपस्थिती गरजेची असते. आता इतर विद्यार्थ्यांच्या आईला पाहिल्यानंतर निश्चितच मुलीला आपल्या आईची आठवण येऊ लागेल. असे होऊ नये आणि तिच्या मनात एकटेपणाची भावना येऊ नये यासाठी वडिलच आई बनून शाळेत हजेरी लावतात.

  • 26 Aug 2026 12:24 PM (IST)

    26 Aug 2026 12:24 PM (IST)

    तब्बल ४.६४ लाख मतदारांचा पत्ता नाही! ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी होणार जाहीर

    मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मिरा-भाईंदर आणि ओवळा-माजिवडा या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये नुकत्याच राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेत तब्बल ४ लाख ६४ हजारांहून अधिक मतदारांचा शोध लागला नसल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार यादीतील नावे शोधमोहिमेत आढळून न आल्याने मतदार नोंदणीच्या प्रक्रियेबाबत तसेच यादीच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (SIR Voter List)

  • 26 Aug 2026 11:59 AM (IST)

    26 Aug 2026 11:59 AM (IST)

    एसआयआरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज,मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

    विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) पहिल्या टप्प्यातील हाऊस-टू-हाऊस सर्व्हेचे काम मुदतवाढीसह निर्धारित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करत, एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रारुप मतदार यादी, हरकती-सुनावणी व पुढील कार्यवाहीसाठी नियोजन करा असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.

  • 26 Aug 2026 11:42 AM (IST)

    26 Aug 2026 11:42 AM (IST)

    आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मुख्यमंत्र्यांच्या चर्चेशिवाय माघार नाही

    मांजरी येथील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या 14 दिवसांपासून वसतिगृहासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत आदिवासी विकास प्रकल्प आयुक्त, उपायुक्त, प्रकल्प अधिकारी आणि आंदोलक विद्यार्थी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून मार्ग निघाला नसल्याने एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली.आदिवासी समन्वय समिती आणि आदिवासी विकास मंत्री यांच्यात बैठक झाली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. आदिवासी मंत्री आणि आदिवासी आमदार यांच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. त्यामध्ये केवळ २०२६ च्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याचे सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी हा निर्णय धुडकावून लावला असून आता थेट मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून अधिकाधिक सकारात्मक निर्णय झाला तरच आंदोलन स्थगित करण्यात येईल अन्यथा, हे आंदोलन अधिकाधिक तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे.

  • 26 Aug 2026 11:36 AM (IST)

    26 Aug 2026 11:36 AM (IST)

    सत्ताधारी भाजपने ओव्हरहेड केबलचे वादग्रस्त धोरण गुंडाळले

    पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वरिष्ठ स्तरावरून झालेल्या थेट हस्तक्षेपामुळे ओव्हरहेड केबलचे वादग्रस्त धोरण गुंडाळण्याची नामुष्की आली असल्याचं बोलले जात आहे. स्थायी समितीने घाईघाईने मंजूर केलेला हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आला असता, तीव्र विरोध आणि वरिष्ठ स्तरावरून आलेल्या आदेशानंतर थेट मागे घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे.

  • 26 Aug 2026 11:22 AM (IST)

    26 Aug 2026 11:22 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाची सर्वेक्षण मोहीम सुरु

    सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांची संख्या वाढून किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NCVBDC) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुणे जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने व्यापक सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. किटकजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.

Web Title: 26 august 2026 maharashtra breaking news today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले
1

विषारी दारू प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; मुख्य आरोपीला थरारकरित्या पकडले

Mumbai Krida Sankul: मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास
2

Mumbai Krida Sankul: मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा; तीन ठिकाणी SVKM करणार विकास

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई
3

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
4

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.