भुदरगड : भुदरगड तालुक्यातील निळपण येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर पूर्वेस व वेदगंगा नदीपासुन वरील बाजुच्या जवळपास पंचवीस ते तीस एकर क्षेत्रात अचानक लागलेल्या आगीमुळे संपुर्ण क्षेत्रातील असलेले ऊसाचे पिक जळुन खाक झाले आहे.
निळपण गावापासून खालच्या बाजूस वेदगंगा नदी व दुधगंगा उजवा कालवा यामुळे सर्वत्र ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे ही आग पसरली असती तर गावातील लोकवस्तीत व घरापर्यंत गेली असती, त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला असता. प्रसंगावधान राखून गावातील तरूणांनी व ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण करण्यात आले, अन्यथा गावाजवळील शकडो एकराहून अधिक क्षेत्र जळुन खाक झाले असते व प्रचंड प्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले असते. यामुळे निळपण येथील जवळपास वीस ते पंचवीस शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
दरम्यान शुक्रवारी अचानक अकराच्या सुमारास आग लागली होती. यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे संपुर्ण शेतीचे क्षेत्र हे एकमेकाला लागुन असल्याने ही आग सर्वत्र पसरल्याने आगीवर नियंत्रण ठेवण्यास कठीण झाले, त्यामुळे संपुर्ण ऊस जळुन खाक झाला. या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. यामध्ये शहाजी जोतिराम ढेरे, धनाजी जोतिराम ढेरे, दत्तात्रय विष्णु मेंगाणे, धनाजी विठ्ठल देसाई, महादेव आप्पासो मेंगाणे, बाबुराव दादु देसाई, संतोष शंकरराव देवणे, संभाजी शंकर गुरव, साताप्पा अर्जुन मेंगाणे, यशवंत नागु निलवर्ण, सर्जेराव नागु निलवर्ण, अशोक नारायण निलवर्ण, बाळासो बापु चौगुले, जीवन जयसिंग चौगुले, शिवाजी तुकाराम देसाई, किरण रन्ताकर कुलकर्णी, सर्जेराव केरबा मेंगाणे, परशुराम केरबा मेंगाणे, मोहन सखाराम मेंगाणे अशा वीस ते पंचवीस शेतकर्यांचा ऊस आगीत जळून खाक होऊन मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच बिद्री साखर कारखाना संचालक मधुआप्पा देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपुस केली. शेतकऱ्यांचा ऊस ताबाडतोड कारखान्याला घालण्याचे आश्वासन दिले.