दिशा सालीयन प्रकरणात सबळ पुरावे सापडत असल्याने ठाकरे कुटुंबाची पायाखालची वाळू सरकली आहे. दिशा सालीयन प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोन वेळा फोन करतात तर मोदीं यांच्याजवळ गेले असतीलच. मंत्री दिपक केसरकर जे बोलत आहेत. ते खोट असेल तर आदित्य ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी आपले मोबाईल टॉवर लोकेशन व सिडीआर रिपोर्ट दाखवावेत, म्हणजे कोण खरे आणि कोण खोटे आहेत ते कळेल. आता ठाकरेंनी स्वतःला खरे करून दाखविण्याची वेळ आली आहे, असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले.
कणकवलीत आ.नितेश राणे यांची पत्रकार परिषद
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यावर टीका करण्याची हिम्मत संजय राऊत यांनी करू नये. ३७० कलम हटविण्याचा काय फायदा झाला, हे भांडुपमध्ये बसून समजणार नाही. त्यासाठी काश्मीरमध्ये जावे, पाक व्याप्त काश्मीर आम्ही घेणारच पण कधी घेणार? हे संजय राऊत सारख्या तीनपाट माणसाला का सांगावे? आम्ही देशाच्या जनतेला सांगू, आता संजय राऊत यांचे ओझे शरद पवार उद्धव ठाकरे यांनी किती वेळ उचलावे? दुसऱ्यांना ओझे बोलण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबावर ओझे झाला आहात ते बघ अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले.
अमित शहा, नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्र राज्यात येतात ते राज्याला काही तरी देण्यासाठी येत आहेत. तुझ्या सारखी गद्दारी करण्यासाठी नाही. ३७० ला पाठिंबा दिला नसता तर तुझ्या मालकाला लोकांनी मातोश्रीच्या बाहेर काढून मारले असते. म्हणून तुम्ही तेव्हा पाठींबा दिला. काय दिवे लावले हे बघायचे असेल तर दिवा घे आणि काश्मीरला जावून तिकडे ध्वज फडकतो आहे. तो मोदी आणि शहा यांच्यामुळे ते पहा असे नितेश राणे यांनी सांगितले.
जेव्हा अखंड हिंदुस्थान होईल तेव्हा राऊत मोदी आणि शहा यांचे अभिनंदन करेल. जेव्हा तुझ्या ढुंगणावर पवार, ठाकरे लाथ मारतील तेव्हा आम्ही त्यांचे अभिनंदन करु असेही सुनावले. प्रकाश आंबेडकर तुमच्या बाजूने किती उभे आहेत. हे येणाऱ्या दिवसात समजेल लवकरच चित्रपट प्रदर्शित होईल. ईव्हीएम बाजूला केल्यानंतर अबू आजमीचा एक तरी उमेदवार निवडून येईल का? त्याच्या घरातील एक तरी मत मिळेल का?
विनायक राऊत हे राजकीय व्हेंटिलेटरवर
मी फायरब्रॅंड नेता असल्याचे उबाठा आमदार वैभव नाईक म्हणत आहेत, त्यांनी ते स्वीकारले आहे. तर त्यांच्या पक्षातून माझ्या मतदारसंघात इच्छुक असलेल्या तीन-तीन उमेदवारांना याबाबतची माहिती द्यावी. संसद म्हणजे देशाच्या विकासाचे प्रश्न मांडायचे असतात. पिझ्झा बर्गरचे विषय नाही. विनायक राऊत हे राजकीय व्हेंटिलेटरवर आहेत. लवकरच राजकीय राम नाम होईल. उबाठामध्ये चोरी केलेलं धन असेल त्याबद्दल ते कधीच बोलत नाहीत. जनशक्ती ही भारतीय जनता पक्षासोबत आहे. देशाच्या भूमीत निवडून येऊन देशाची गद्दारी करावी यालाच इम्तियाज जलील म्हणतात, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली.