अमरावती : महाराष्ट्रामध्ये जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. त्याचबरोबर अमरावतीमध्ये सर्वत्र गणपतीची धामधूम सुरु आहे. याचदरम्यान खंडेलवाल यांच्या घरातील गणपतींनी अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. खंडेलवाल यांच्याकडे ३५१ गणेश मूर्तींची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आकर्षित झाले आहे. खंडेलवाल हे दरवषी ३५१ गणेश मूर्तींची सजावट करतात आणि यंदाचे हे त्यांचे २५ वे वर्ष आहे. यामध्ये मुख्य आकर्षण चांद्रयान ३ गणपतीचे आहे.
लहान मोठ्या गणरायांच्या मूर्तींना विविध देखाव्यांनी आकर्षक करण्यात आले आहे. संगमनेरपासून तर दगडांवर काढलेल्या गणपती पर्यंतच्या मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. आकर्षक अशा गणरायांच्या मूर्तींनी खंडेलवाल हाऊस सध्या सजले आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक घरांमध्ये त्याचबरोबर सार्वजनिक मंडळांच्या गणरायाची सजावटीची थीम ही चांद्रयान ३ आहे.
चांद्रयान ३ हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस होता त्यामुळे यंदा अनेकांनी चांद्रयानची थीम गणरायाच्या आगमनासाठी देखावा साकारला आहे.