राज ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का (फोटो -सोशल मीडिया)
मुंबई महानगरपालिकेत मनसेल केवळ 9 जागांवर आघाडी
मुंबईत महायुतीचा महापौर बसणार असे चित्र
भाजप शिवसेनेची 125 जागांवर आघाडी
Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील सर्वात महत्वाची समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. राज्यातील मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा महानगरपालिकांची निवडणूक अत्यंत चुरशीची समजली जात होती. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित आले. मात्र त्याचा परिणाम विजयात झाल्याचा दिसून येत नाहीये. मुंबईत मनसेला दुहेरी आकडा देखील गाठता आलेला नाही. सध्या मनसे केवळ 9 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का समजला जात आहे.
मुंबईत ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता संपुष्टात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही शेवटची निवडणूक असल्याचे आवाहन ठाकरे बंधू यांनी केले होते. मात्र त्यांच्या आवाहनाला जनतेने नारळ दिल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी यंदा ठाकरे बंधू एकत्रित आले. मात्र निवडणुकीत मानसेला अपेक्षित यश मिळतंय दिसत नाहीये.
सध्या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष केवळ 9 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी मतमोजणी अजूनही सुरू आहे. त्यात भाजप शिवसेना 125 जागांवर पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ठाकरे बंधू केवळ 75 जागांवर पुढे आहेत. त्यात मनसे केवळ 9 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळलेला दिसून येत नाहीये.
राज ठाकरे यांनी यंदाची निवडणूक मराठी-अमराठी, अदाणी, मराठी माणसाचे अस्तित्व या सर्व विषयांवर लढवली होती. विकासाचे फारसे मुद्दे त्यामध्ये दिसून आले नाहीत. त्यामुळे यंदा मुंबईच्या जनतेने विकासाचे मुद्दे उपस्थित करणाऱ्या पक्षांना आपला कौल दिल्याचे समजते आहे.
प्रवीण दरेकर काय म्हणाले?
मुंबई महानगरपालिकेत भाजपला मिळत असलेल्या यशावर प्रवीजन दरेकर म्हणाले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मिळवून दिला. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठपुरावा केला. मराठी माणसे कोणामुळे राज्याबाहेर, मुंबईवर गेली? देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडीमध्ये घरे दिली.”
पुढे बोलताना भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले, “आज आम्ही मराठी माणूस मुंबईत राहावा यासाठी प्रयत्न करत आहोत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व, त्यांचे विकासाची भूमिका आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेली आहे. ठाकरेंचे दुकान आता बंद झालेले आहे.”






