Krishna River Pollution
सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारी कृष्णा नदी म्हणून याकडे नजरा लागल्या आहेत. सध्या मात्र कृष्णा नदी वेगळ्याच समस्याने ग्रासलेली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून नदीतील पाणी हिरवे झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य होते.
आजमितीस या पाण्याला गडद हिरवा रंगाने वेढले असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू झाला आहे. या प्रकारामुळे पर्यावरण तसेच जलचर जीवसृष्टीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अचानक पाण्याने रंग बदलल्याने तर्कवितर्क आणि संभ्रम निर्माण झाला आहे.
Sangli News : सांगलीत कृष्णा नदीचा काठ बनतोय ‘ब्लॅक स्पॉट’!
अनेक पाणीपुरवठा योजना नदीकाठी आहेत, तर पाळीव जनावरेही नदीचे पाणी पिण्यासाठी आणली जातात. यामुळे हा आरोग्यकरिता खूप मोठा धोका मानला जात आहे. तसेच नदीच्या पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.
नदीच्या पाण्यावर निर्माण झालेल्या या गूढ हिरव्या रंगामागील नेमके कारण काय, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे.
दोन आठवड्या पासून नांदगाव, तारगाव परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात गडद हिरव्या रंगाचा तवंग दिसून येत आहे. संबंधित प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग व आरोग्य विभाग यांनी तातडीने दखल घेऊन नदीच्या पाण्याचे नमुने तपासावेत व वस्तुस्थिती जाहीर करून नागरीकांना दिलासा द्यावा. – रामचंद्रभाऊ जगदाळे, माजी चेअरमन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रे.
कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी






