Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra to World Breaking News: आज काय घडतंय? कुठे काय झालं? राजकीय उलथापालथीपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत, सर्व ताज्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स फक्त येथे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 06, 2026 | 05:40 PM
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:

Stock Market Today: शेअर बाजारात बाजारात तेजीची अपेक्षा

India Share Market Update: ६ मे रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा विचार करत हा दावा करण्यात आला आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २१६ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,३२२ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

The liveblog has ended.
  • 06 May 2026 04:47 PM (IST)

    06 May 2026 04:47 PM (IST)

    हिंद महासागरात पाकिस्तानचं राज्य? चीनकडून खरेदी करणार ‘हे’ घातक शस्त्र

    एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीन (China) आणि पाकिस्तानने हिंद महासागरात मोठा गेम केला आहे. चीनने आपल्या सर्वात प्रगत पाणबुड्या पाकिस्तानच्या नौदलला दिल्या आहेत. यामुळे दक्षिण आशियातील सागरी सुरक्षेच्या समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 06 May 2026 04:36 PM (IST)

    06 May 2026 04:36 PM (IST)

    बंगळुरूचा झाला गेम! आता ‘या’ ठिकाणी होणार महामुकाबला

    यपीएलचा महासंग्राम सुरू होऊन महिना होऊन गेला आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन दाखल झाली आहे. त्यातच आता प्ले ऑफचे सामने कुठे आणि किती तारखेला होणार आहेत, याचे वेळापत्रक समोर आले आहे ते जाणून घेऊयात. बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ आणि फायनलच्या वेळापत्रकात मोठा बदल केला आहे.

    सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा...

  • 06 May 2026 04:25 PM (IST)

    06 May 2026 04:25 PM (IST)

    तामिळनाडूच्या राजकारणात ‘विजय’ पर्व! उद्या सकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

    तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात उद्या एक सुवर्णक्षण लिहिला जाणार आहे. ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि सुपरस्टार विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा अधिकृत दावा सादर केला आहे. पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, विजय उद्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

    सविस्तर बातमी येथे वाचा

  • 06 May 2026 03:55 PM (IST)

    06 May 2026 03:55 PM (IST)

    Mahabharata: रणनीती आणि प्रेमाचा संगम: अर्जुन–सुभद्रा विवाहाची अनोखी कथा

    महाभारत या महान ग्रंथातील श्रीकृष्ण, अर्जुन आणि सुभद्रा यांची कथा केवळ एक विवाहकथा नसून, ती प्रेम, धैर्य, रणनीती आणि धर्म यांचा सुंदर संगम आहे. श्रीकृष्ण यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि कुशाग्र बुद्धीने हा विवाह घडवून आणला आणि त्यामागे केवळ भावनिक नव्हे, तर राजकीय व सामाजिक कारणांचाही विचार होता.

    पांडवांपैकी अर्जुन अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ योद्धा होता. एकदा एका नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे त्याला १२ वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला. या काळात त्याने अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा केली, विविध ऋषी-मुनींचे आशीर्वाद घेतले आणि अनेक नवीन अनुभव मिळवले. याच प्रवासात तो द्वारका येथे पोहोचला. तेथे श्रीकृष्ण यांचे राज्य होते.

  • 06 May 2026 03:45 PM (IST)

    06 May 2026 03:45 PM (IST)

    Vijay Congress Alliance: तामिळनाडूमध्ये नवीन समीकरण? विजयच्या पक्षाला काँग्रेसचे समर्थन

    Vijay Congress Alliance News: तामिळनाडूच्या राजकारणात बुधवारी एक मोठी आणि अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. सुपरस्टार थलापती विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाला सरकार स्थापनेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. २३४ जागांच्या तामिळनाडू विधानसभेत १०८ जागा जिंकून TVK हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताच्या ११८ या जादूई आकड्यापासून तो अवघ्या १० जागा दूर होता. आता काँग्रेसच्या ५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय यांचा सत्तेचा मार्ग सुकर होताना दिसत आहे.

  • 06 May 2026 03:30 PM (IST)

    06 May 2026 03:30 PM (IST)

    देशभरात Cervical Cancer जागरूकता मोहिमेला सुरुवात!

    एमएसडी (ज्याला युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये मर्क एंड कंपनी, इंक., रहवे, एन.जे., यूएसए म्हणून ओळखले जाते) यांनी आज भारतात आपल्या सर्वाइकल कॅन्सर जागरूकता मोहिमेची सुरुवात जाहीर केली. हा उपक्रम प्रसिद्ध अभिनेत्री, सार्वजनिक व्यक्तिमत्त्व आणि आई माधुरी दीक्षित नेने यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश महिलांच्या प्रतिबंधात्मक आरोग्याविषयीच्या चर्चांना पुढे आणणे आणि देशभरातील महिला व पालकांना सर्वाइकल कॅन्सर आणि त्याच्या प्रतिबंधासाठी उपलब्ध असलेल्या योग्य आरोग्य पर्यायांविषयी डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.दर सात मिनिटांनी भारतात जवळपास एका महिलेचा सर्वाइकल कॅन्सरमुळे मृत्यू होतो, जरी हा आजार मोठ्या प्रमाणात टाळता येण्यासारखा आहे.(फोटो सौजन्य – istock)

  • 06 May 2026 03:20 PM (IST)

    06 May 2026 03:20 PM (IST)

    बंगालच्या झालमुरीचा वाढत ट्रेंड!

    सोशल मीडियासह संपूर्ण देशभरात बंगाल निवडणुकांची मोठी चर्चा रंगली आहे. त्यात मागील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालमुरीच्या दुकानाला भेट देत, झालमुरी खाण्याचा आनंद लुटला. त्यानंतर संपूर्ण भारतात एकाच पदार्थाची मोठी चर्चा रंगली. बंगाली झालमुरी हा पश्चिम बंगाल आणि कोलकातामधील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड पैकी ऐक एक आहे. महाराष्ट्रात भूक लागल्यानंतर ज्याप्रमाणे वडापाव खाल्ला जातो तसेच पश्चिम बंगालमध्ये झालमुरी खाल्ली जाते. हा पदार्थ चवीला अतिशय तिखट असतो. यात विविध मसाले आणि कांदा टोमॅटोचा वापर केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या दौऱ्यात चाखलेल्या झालमुरीचे आणि तिथे असलेल्या खाद्यसंस्कृतीचे कौतुक केले. त्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम बंगालमधील राजकीय विजयामुळे बंगाली झालमुरी पुन्हा एकदा ट्रेडींगला आली आहे. संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर विकतचे पदार्थ खाण्याऐवजी तुम्ही बंगाली झालमुरी घरीच बनवून खाऊ शकता. या व्हायरल रेसिपीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चला तर जाणून घेऊया झालमुरी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

  • 06 May 2026 03:10 PM (IST)

    06 May 2026 03:10 PM (IST)

    Wai News: पाचगणीच्या वैभवाला अस्वच्छतेचा डाग!

    Wai News : पाचगणी पर्यटन स्थळवरील बाजारपेठेतील स्वच्छता गृहाची अवस्था दुर्लक्षामुळे दयनीय झाली आहे. त्यामुळे शहाराच्या वैभवाला अस्वच्छतेचा डाग लागताना दिसत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शॉपिंग सेंटरमधील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, वारंवार निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म हलत नसल्याने नगरसेवक  प्रसाद लक्ष्मण कारंजकर यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास जाहीर निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

  • 06 May 2026 03:04 PM (IST)

    06 May 2026 03:04 PM (IST)

    Delhi New Traffic Rules: दिल्लीत ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यांची आता खैर नाही!

    Delhi New Traffic Rules: सरकार वेळोवेळी वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करत असते; परिणामी, दिल्लीमध्ये आता नवीन नियमांचा एक संच लागू करण्यात आला आहे, ज्यांची व्याप्ती वाढवण्यात आली असून त्यांची अंमलबजावणी अधिक कडकपणे केली जात आहे. या सरकारी नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला वाहतूक चलानला न्यायालयात आव्हान द्यायचे असेल, तर आता त्या व्यक्तीला सर्वप्रथम चलानच्या रकमेपैकी ५०% रक्कम जमा करणे अनिवार्य आहे. या उपायाचा उद्देश चलानचा निपटारा जलद करणे आणि संपूर्ण यंत्रणेची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.

  • 06 May 2026 02:59 PM (IST)

    06 May 2026 02:59 PM (IST)

    विजय यांच्या शपथेआधीच हायव्होल्टेज ड्रामा

    थलपती विजय यांच्याकडून सत्ता स्थापन करण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव सुरू असून दुसरीकडे आता मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. निकालाच्या ३६ तासामध्ये विरोधी बाकावरील मोठा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसू लागले आहे.

  • 06 May 2026 02:50 PM (IST)

    06 May 2026 02:50 PM (IST)

    एडीएमकेमध्ये फूट, टीव्हीकेला पाठींबा देण्याची मागणी

    एडीएमके पक्षात फूट पडण्याची चिन्हे आहेत. पक्षातील तब्बल 30 आमदारांनी विरोधी पक्षात न बसता टीव्हीकेला पाठींबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षाची आजची बैठक उद्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 06 May 2026 02:39 PM (IST)

    06 May 2026 02:39 PM (IST)

    जुन्नरमध्ये हृदयद्रावक घटना; पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा मृत्यू

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वसईवाडी परिसरातील तळेरान गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पाझर तलावात बुडून जुळ्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

  • 06 May 2026 02:30 PM (IST)

    06 May 2026 02:30 PM (IST)

    तळोदा शहरात भीषण अपघात; टायर फुटून ट्रक चालकाचा मृत्यू

    नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात एक भीषण अपघात घडला असून या घटनेत ट्रक चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर तपासत असताना अचानक टायरचा जोरदार स्फोट झाला आणि त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

  • 06 May 2026 02:21 PM (IST)

    06 May 2026 02:21 PM (IST)

    कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू

    कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ५ वाजता छातीत दुखूनही ९ पर्यंत उपचार मिळाले नाहीत. अॅम्बुलन्सऐवजी सुप्रिडेंटच्या गाडीतून रुग्णालयात आणल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला.

  • 06 May 2026 02:10 PM (IST)

    06 May 2026 02:10 PM (IST)

    कल्याणमध्ये झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

    कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणारे तीन सराईत चोरट्यांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय ढेकळे, शहबाज खान, अशोक मोरे अशी या आरोपींची नावे आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात फिरत असताना कल्याण रेल्वे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या तिघांनी याआधी किती मोबाईल चोरले आहेत. मोबाईल चोरून करून हे कोणाला विकतात? याचा तपास आता कल्याण रेल्वे पोलिसांनी सुरू केलाय.

  • 06 May 2026 02:00 PM (IST)

    06 May 2026 02:00 PM (IST)

    शेतकरी पुत्राची सीबीआयमध्ये भरारी! मोहित यादवची ही प्रेरणादायी गोष्ट वाचली का?

    शेतकरी पुत्राची सीबीआयमध्ये भरारी! मोहित यादवची ही प्रेरणादायी गोष्ट वाचली का?‘आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून चिकाटीने प्रयत्न करणारी व्यक्तीच यश मिळवू शकते’ याचे उत्तम उदाहरण हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील नारनौल येथील मोहित यादव यांच्या यशोगाथेचे आहे. गावातील रस्त्यापासून ते देशातील सर्वात प्रतिष्ठित तपास संस्था असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) मध्ये रूजू होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

  • 06 May 2026 01:55 PM (IST)

    06 May 2026 01:55 PM (IST)

    बिबट्याच्या थरारक घटनेनंतर अग्निशमन व वन विभागाच्या धाडसाला सलाम

    मिरा-भाईंदर शहरातील भाईंदर पूर्वेच्या तलाव रोड परिसरात डिसेंबर महिन्यात घडलेल्या बिबट्या शिरकावाच्या थरारक घटनेची आठवण आजही नागरिकांच्या मनात ताजी आहे. या भीषण प्रसंगात जीवाची बाजी लावून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या मिरा-भाईंदर अग्निशमन दल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आज (दि. ६ मे) महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

  • 06 May 2026 01:50 PM (IST)

    06 May 2026 01:50 PM (IST)

    ‘ममतांसारखीच परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या पक्षाची होईल’; राज्यमंत्री आशिष जायस्वाल यांची टीका

    काँग्रेसच्या संपर्कात आल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत पूर्णपणे मानसिक दिवाळखोर झाले आहेत, असा हल्लाबोल राज्यमंत्री आशिष जायसवाल यांनी राऊत यांच्यावर चढवला. नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटाच्या अस्तित्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संजय राऊत यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालावर म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पतनाची सुरुवात झाली आहे आणि म्हणीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, दिवा विझण्यापूर्वी त्याची ज्योत तेज होते. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जायस्वाल यांनी त्यांना भ्रष्ट बुद्धीचे जिवंत उदाहरण म्हटले.

  • 06 May 2026 01:45 PM (IST)

    06 May 2026 01:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर पालिकेत ‘रिल्स वॉर’! शिवसेना-एमआयएम वाद विकोपाला

    सभागृहात विकासाच्या मुद्यांऐवजी रिल्स काढून समाजमाध्यमांवर शेअर करण्याचे काम अनेक नगरसेवक करीत असून त्यात एमआयएम आणि शिंदे सेनेचे नगरसेवक आघाडीवर आहेत. हाच मुद्दा आता वादाची ठिणगी बनून सभागृहाबाहेरही पेटवला जात आहे. रिल्सच्या माध्यमातून एकमेकांचे कपडे फाडण्याचे काम केले जात असल्याने पालिका सभागृह ‘रिल्स वॉर’ सेंटर बनत चालले आहे. याच मुद्यांवरुन उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी सल्ला दिला की, त्यांनी रीलस्टार नव्हे तर रिअल स्टार व्हावे’. तर दुसरीकडे, ज्यांच्यावर दंगल घडवण्याचे आरोप आहेत त्यांनी आम्हाला चांगले काय, वाईट काय हे शिकवण्याची गरज नसल्याचे प्रत्युत्तर एमआयएमने दिले आहे. दरम्यान, महापालिकेच्या सभागृहात आता शिवसेना एमआयएम वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 06 May 2026 01:39 PM (IST)

    06 May 2026 01:39 PM (IST)

    शिरगाव अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आर्यन सय्यदवाडी संघ विजेता; आई महाकाली संघावर मात

    शिरगाव येथे के जी एन स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत आई महाकाली संघाला नमवित आर्यन सय्यदवाडी संघाने विजेतेपद पटकाविले. या विजयाबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनेदन केले.सदरच्या स्पर्धेला सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाले,कुंभार्ली उपसरपंच संदीप कोलगे,माजी उपसरपंच अजिंक्य कोलगे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजाभाऊ नारकर, अशोक गांधी, ग्रामपंचायत सदस्य बाळू जाधव, कुंभार्ली शिरगाव जमातीचे अध्यक्ष बशीर कडवेकर, जेष्ठ अब्दुल रहेमान कडवेकर, महमद कडवेकर, बाबा कुंभार्लीकर, असलम कुंभार्लीकर, हमीद कुंभार्लीकर, माजी उपसरपंच इकबाल कडवेकर, सिकंदर शेख, रफीक शिकलगार, रफीक शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर यांचा के जी एन स्पोर्ट्स यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

  • 06 May 2026 01:35 PM (IST)

    06 May 2026 01:35 PM (IST)

    दहावीचा निकाल ‘या’ दिवशी? निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट आणि सोप्या स्टेप्स पहा एका क्लिकवर..

    महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी इयत्तेच्या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला असून आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल केव्हा लागणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. आता दहावीच्या परीक्षा होऊन जवळपास दीड महिना उलटून गेला आहे. त्यामुळे बारावीनंतर दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.

  • 06 May 2026 01:25 PM (IST)

    06 May 2026 01:25 PM (IST)

    निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका; टीएमसी कार्यालयाला आग

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वातावरण अधिकच चिघळळे आहे. निकालाच्या अवघ्या ४८ ते ७२ तासांमध्ये अनेक ठिकाणांहून हिंसाचार, चकमकी आणि तोडफोडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मंगळवारी (५ मे) संदेशखालीच्या बामनघेरी परिसरात राजकीय तणाव निर्माण झाला. समाजकंटकांनी पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्यात तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

  • 06 May 2026 01:15 PM (IST)

    06 May 2026 01:15 PM (IST)

    बालविवाहपासून नेतृत्वापर्यंत! पारधी समाजातील महिला-मुलींच्या शिक्षणासाठी नानीबाईंचा संघर्षमय प्रवास

    ती एक शांत संध्याकाळ होती, सूर्य अजूनही पूर्ण मावळला नव्हता आणि आकाशात मावळतीचे रंग हळूहळू पसरत होते. तिसरीत शिकणारी आरती काळे आणि पहिलीत शिकणारा तिचा लहान भाऊ दीपक यांनी शाळेतून घरी येऊन पटकन जेवण केलं आणि आपल्या लहानशा पत्राच्या छप्पराच्या झोपडीबाहेर, अरुंद गल्लीत जमिनीवर तटई घालून बसले. त्यांच्या आजूबाजूला, जीवन शांतपणे चालू होते. आठ-नऊ मेंढ्या कोरड्या गवतावर चरत होत्या आणि आजूबाजूच्या महिला चुलीवर तवा मांडून संध्याकाळचा स्वयंपाक करत होत्या. त्यांच्या चुलीतून आलेला धूर हवा उबदार करत होता. या थोड्या गोंधळातही मुलं आपल्या माना खाली घालून अभ्यासात गुंगली होती. आजूबाजूच्या हालचाली आणि आवाजाने विचलित न होता गृहपाठ करण्यावर त्यांचा भर होता.

  • 06 May 2026 01:05 PM (IST)

    06 May 2026 01:05 PM (IST)

    संकटात सापडलेल्या Airline कंपन्यांना केंद्राचा ‘बूस्टर डोस’! 5000 कोटींच्या पॅकेजमुळे उड्डाणांना मिळणार गती

    पश्चिम आशियातील संकटामुळे भारतीय विमान कंपन्यांवर वाढत असलेल्या आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, ‘आपत्कालीन पतहमी योजने’च्या (ECLGS) ५.० आवृत्तीला मंजुरी देण्यात आली. या योजनेअंतर्गत, केवळ विमान वाहतूक क्षेत्रासाठीच ५,००० कोटी रुपयांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. या योजनेद्वारे, सरकारने विमान कंपन्यांना अतिरिक्त पतपुरवठा उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. हा पतपुरवठा संबंधित कंपनीच्या ‘peak working capital च्या गरजेच्या १०० टक्क्यांपर्यंत असू शकेल; पण प्रत्येक विमान कंपनीसाठी या रकमेची कमाल मर्यादा १,५०० कोटी रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

  • 06 May 2026 12:55 PM (IST)

    06 May 2026 12:55 PM (IST)

    ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाचे संकेत मिळताच तेलाच्या किमतीत घट

    नुकतेच ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिमेला पूर्णविराम दिला आहे. यामुळे बुधवारी तेलाच्या किमतीत मोठी घसरणा झाली आहे. संभाव्य शांतता कराराबाबत संकेत दिल्यानंतर मध्यपूर्वेतील खंडित कच्चा तेलाचा पुरवठा पुन्हा सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रेंट क्रू़डच्या किमतीत १.५५ चे १.३८ टक्क्यांपर्यंत घट झाली असून १०८.३५ डॉलर प्रतिम बॅरलवर स्थिरावली आहे. अमेरिकेन कच्चा तेलाची किंमत १.५० डॉलरवरुन १.४७ टक्क्यांनी १००.७७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.

  • 06 May 2026 12:45 PM (IST)

    06 May 2026 12:45 PM (IST)

    इराणच्या परराष्ट्र मंत्री अराघची यांचा चीन दौरा

    इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची चीनच्या दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी चीनच परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली. या भेटीत अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये होर्मुझचा मुद्दा केंद्रस्थानी होता. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचे मार्ग आणि सुरु असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यावर चर्चा झाली.

    अराघची यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष १४-१५ मे ला चीनला भेट देणार आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची ते भेट घेतील. यादरम्यान व्यापारविषयक वाटाघाटींच्या आणि 'पश्चिम आशिया' संघर्षाच्या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

    FM @araghchi held talks with his Chinese counterpart in Beijing. pic.twitter.com/qdGNxeduaK

    — Tehran Times (@TehranTimes79) May 6, 2026

  • 06 May 2026 12:35 PM (IST)

    06 May 2026 12:35 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिएतमानच्या राष्ट्रांध्यक्षांची घेतली भेट

    व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे दाखल झाले आहे. सकाळी त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यानंतर राष्ट्राध्यक्ष तो लामा यांनी भारताचे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांची भेट घेतली. राष्ट्रापती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीचीही त्यांनी भेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये उच्चस्तरीय बैठत पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या संरक्षण आणि धोरणात्मक संबंधाना नवी दिशा देण्यावर चर्चा होईल. व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्रही खरेदी करण्याची शक्यता आहे.

    #WATCH | Delhi: President of Vietnam, To Lam, met Indian Union Ministers and leaders after he was accorded a ceremonial reception at the forecourt of Rashtrapati Bhavan.

    President Droupadi Murmu and Prime Minister Narendra Modi also met the delegation from Vietnam.

    (Source: DD… pic.twitter.com/8hb0KbUs5R

    — ANI (@ANI) May 6, 2026

  • 06 May 2026 12:20 PM (IST)

    06 May 2026 12:20 PM (IST)

    गुजरातच्या इयत्ता १०वी निकालत मुलींनी मारली बाजी

    गुजरातमध्ये SSC चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ८८.८६% चा निकाल लागला असून यामध्ये मुलींनी पुन्हा बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८८.२८% नोंदवला गेला आहे. नर्मदा जिल्ह्याचा निकाल ९०.८५%, वडोदरामध्ये ७३.३८%, पंचमहाल जिल्ह्याचा निकाल ७६.४२% लागला आहे. तसेच गांधीन येथील केंद्राच्या निकालाची १००% नोंद झाली आहे, तर दाहोदा येथ मुनखोस्ला केंद्राचा निकाल ३३.७४% इतका सर्वात कमी लागला आहे.

     

     

  • 06 May 2026 12:10 PM (IST)

    06 May 2026 12:10 PM (IST)

    तामिनाडूत सरकार स्थापनेबाबत जोरदार चर्चा

    नुकत्याच तामिळनाडूच्या विनाधनसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणूकात थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाचा विजय झाला आहे. सध्या नवीन सरकार स्थापनेसंदर्भात राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. आज दुपारी ३ वाजता कॉंग्रेसचे नेते टीव्हीके पक्षाचे प्रमुथ विजय थलपती यांची भेट घेतील.

     

  • 06 May 2026 12:00 PM (IST)

    06 May 2026 12:00 PM (IST)

    ५० खलाशांना मुक्त करण्याचे न्यायालयाचे निर्देश

    आयुष्य एकदाच मिळते आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले आणि या वर्षी फेब्रुवारीपासून अरबी समुद्रात ताब्यात असलेल्या तीन जहाजांवरील ५० खलाशांच्या सुटकेचे आदेश राज्य सरकारला दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार, ५० खलाशांना न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी, त्यांना तिथे चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले असून समुद्रातील जहाजावर प्रचंड गैरसोयी असल्यामुळे त्यांच्यापैकी कोणालाही जहाजावर परतण्याची इच्छा नसल्याचे खलाशांनी खंडपीठाला सांगितले. तसेच जहाजांवर अत्यंत कमी अन्न आणि पाण्यावर जगत होते. त्यांना दररोज फक्त ३०० मिली पाणी मिळत असल्याची आपबिती न्यायालयाला सांगितली. त्याची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने निरीक्षण नोंदवत खलाशांना सोडण्याचे निर्देश दिले. वाचा सविस्तर

  • 06 May 2026 11:45 AM (IST)

    06 May 2026 11:45 AM (IST)

    Maruti Grand Vitara बेस व्हेरिअंट खेरदीसाठीचा संपूर्ण हिशोब

    भारतातील प्रमुख वाहन निर्मात्यांपैकी एक असलेली Maruti Suzuki वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री करते. कंपनीने मिड-साइज एसयूवी सेगमेंटमध्ये Maruti Grand Vitara सादर केली आहे. जर तुम्ही या गाडीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला किती डाऊन पेमेंट केल्यानंतर किती रक्कमेचा ईएमआय भरावा लागेल याबाबत आता जाणून घेऊया. नेहमी लक्षात ठेवा की कोणतीही गाडी खरेदी करताना डाऊन पेमेंट आणि ईएमआय यांचा हिशोब अत्यंत गरजेचं असतं. अन्यथा तुमचं संपूर्ण बजेट कोलमडू शकतं. Maruti Grand Vitara चे बेस व्हेरिअंट खरेदी करताना जर तुम्ही 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल, याबाबत जाणून घेऊया. वाचा सविस्तर

  • 06 May 2026 11:36 AM (IST)

    06 May 2026 11:36 AM (IST)

    ट्रम्प यांनी इराणविरोधी लष्करी मोहिमेला दिला पूर्णविराम

    ट्रम्प यांनी युद्धाच्या ठिणगीला शांत करण्याचे संकेत दिले आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ खाडीत सुरु केलेला प्रोजेक्ट फ्रीडम तातडीने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी इराणसोबत एका ठोस शांतता करारच्या शक्यतेचा दावा केला आहे. हा निर्णय जागतिक शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

  • 06 May 2026 11:25 AM (IST)

    06 May 2026 11:25 AM (IST)

    व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर

    Vietnam President India Visit : नवी दिल्ली : भारत आणि व्हिएतनामच्या मैत्रीपूर्ण संबंधांला एका एक नवी उंची मिळणार आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहे. ५ ते ७ मे दरम्यान त्यांचा हा दौरा असणार आहे. हा दौरा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि धोरणात्मक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे. तसेच व्हिएतनाम भारताकडून सर्वात शक्तिशाली शस्त्र ब्रह्मोसची खरेदी देखील करण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

  • 06 May 2026 10:50 AM (IST)

    06 May 2026 10:50 AM (IST)

    Pimpri-Chinchwad मध्ये ६० कोटींच्या उपसूचनांचा ‘महाघोटाळा’?

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ६० कोटीच्या उपसूचना आणि त्यापोटी अदा करण्यात आलेल्या बिलांचे प्रकरण एखाद्या क्राईम थ्रिलरप्रमाणे गाजले. लेखा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी याला ‘महाघोटाळा’ संबोधले, तर सत्ताधारी भाजपने हा प्रशासकीय दोष असल्याचे सांगत विरोधकांचा ‘फेक नॅरेटिव्ह’ उधळून लावला. तब्बल अडीच तास चाललेल्या या वादळी चर्चेनंतर महापौर रवि लांडगे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असून, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या तीन वर्षांतील सर्व उपसूचनांची ‘कुंडली’ तपासण्याचे आदेश दिल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

  • 06 May 2026 10:40 AM (IST)

    06 May 2026 10:40 AM (IST)

    लो स्टोरेज फोनमध्येही स्मूथ चालेल गेम! या सोप्या टिप्स एकदा वापरून तर पाहा

    ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्यासाठी नेहमी पॉवरफुल फोन गरजेचा असतो. असा फोन ज्यामध्ये जास्त स्टोरेज आणि दमदार फीचर्स असतील. पण तुम्हाला माहीत आहे का कमी स्टोरेज असलेल्या फोनमध्ये देखील तुम्ही फ्री फायर मॅक्स सारखे ऑनलाईन गेम्स अगदी सहज खेळू शकता. खरं तर कमी स्टोरेज असलेल्या फोनमध्ये फ्री फायर मॅक्ससारखे ऑनलाईन गेम्स स्मूथली खेळणं थोडं ट्रिकी असतं. पण काही स्मार्ट सेटिंग्स आणि ट्रिक्स वापरून जर तुम्ही खेळलात तर नक्कीच तुमचा गेमप्ले पूर्वीपेक्षा अधिक सुधारू शकतो.

  • 06 May 2026 10:30 AM (IST)

    06 May 2026 10:30 AM (IST)

    युद्धविराम धोक्यात? होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले सुरुच; इराण युद्ध भडकवत

    अमेरिका इराण संघर्ष (US Iran Conflict) आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन पोहोचला आहे. दोन्ही देशांतील युद्धविराम केवळ नावापुरता राहिला असून इराणने होर्मुझमध्ये हल्ले सुरु केले आहेत. यामुळे या भागात व्यापारी जहाजांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी इराणने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असल्याचा आरोप केला आहे. इराणमुळे परिस्थिती स्फोट होत चालली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 06 May 2026 10:20 AM (IST)

    06 May 2026 10:20 AM (IST)

    ‘नसरापूरमध्ये अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या’; वाईकरांची मागणी

    नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानवीय अत्याचार व निर्दयी खूनप्रकरणी संपूर्ण वाई शहरात संतापाची लाट उसळली आहे. त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी वाईकर एकत्र येऊन तहसीलदार सोनाली मेटकरी व पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. तसेच त्वरित शिक्षेची अमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

  • 06 May 2026 10:10 AM (IST)

    06 May 2026 10:10 AM (IST)

    शेअर बाजारात बाजारात तेजीची अपेक्षा; सेन्सेक्स-निफ्टीसाठी पॉझिटिव्ह ओपनिंगचे संकेत

    ६ मे रोजी आज भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांचा विचार करत हा दावा करण्यात आला आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २१६ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, २४,३२२ च्या पातळीवर ट्रेड करत होता.

  • 06 May 2026 10:00 AM (IST)

    06 May 2026 10:00 AM (IST)

    दुसरी, तिसरी, चौथीनंतर आता सहावीचाही अभ्यासक्रम बदलला; दादा भुसे

    इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासाठीच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीने इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी दिली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा  भुसे यांनी दिली.

  • 06 May 2026 09:35 AM (IST)

    06 May 2026 09:35 AM (IST)

    तामिळनाडूमध्ये 'थलपति'चा करिश्मा: १०८ जागांसह विजयचा टीव्हीके ठरला सर्वात मोठा पक्ष

    तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालाने (मे २०२६) भारतीय राजकारणात एक नवा इतिहास रचला आहे. प्रसिद्ध अभिनेते विजय (Thalapathy Vijay) यांच्या तमिळगा वेट्री कळघम (TVK) या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळवत राज्याच्या राजकारणातील ६२ वर्षांची 'द्रविडीयन' (DMK-AIADMK) मक्तेदारी मोडीत काढली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी बहुमतासाठी ११८ जागांची आवश्यकता होती. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

  • 06 May 2026 09:30 AM (IST)

    06 May 2026 09:30 AM (IST)

    भोरच्या घटनेनंतर पर्वती परिसरात ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न   

    पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुकलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच, शहरात पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पर्वती परिसरात एका ९ वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला असून, स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पर्वती भागात एका निर्जन ठिकाणी काही नराधमांनी ९ वर्षीय मुलीला गाठून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशय आल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. लोकांची चाहूल लागताच नराधमांचा प्रयत्न फसला आणि मुलगी बचावली.

  • 06 May 2026 09:25 AM (IST)

    06 May 2026 09:25 AM (IST)

    संगीतकार पलाश मुच्छल विरोधात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा

    बॉलिवूडमधील तरुण आणि लोकप्रिय संगीतकार-गायक पलाश मुच्छल याच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने सांस्कृतिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.  फिर्यादी विज्ञान प्रकाश माने (रा. शास्त्रीनगर, सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चित्रपट निर्मितीच्या नावाखाली मुच्छल यांनी त्यांच्याकडून तब्बल २५ लाख रुपये घेतले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत पैसे परत न केल्याने माने यांनी वारंवार पाठपुरावा केला. अखेर २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली-आष्टा मार्गावरील टोल नाका परिसरात दोघांची भेट झाली असता, पैशांची मागणी करताच मुच्छल यांनी संतापाच्या भरात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

  • 06 May 2026 09:20 AM (IST)

    06 May 2026 09:20 AM (IST)

    मुंबईत  ऐन उन्हाळ्यात ३० तासांचा पाणीकपात

    मुंबई: आधीच उन्हाचा पारा चढलेला असताना आता मुंबईकरांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) वडाळा परिसरात हाती घेतलेल्या महाकाय जल बोगद्याच्या कामासाठी ५ आणि ६ मे रोजी सलग ३० तासांचा मोठा 'शटडाऊन' जाहीर केला आहे. या दुरुस्ती कामामुळे मध्य आणि पूर्व मुंबईतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

    ५ मे सकाळी ८ वाजेपासून ते ६ मे दुपारी २ वाजेपर्यंत (एकूण ३० तास).

    वडाळा येथील नवीन जल बोगद्याच्या जोडणीचे अत्यंत महत्त्वाचे काम.

    प्रामुख्याने वडाळा, दादर, माटुंगा, सायन, परळ, शिवडी आणि कुर्ल्यातील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही.

  • 06 May 2026 09:15 AM (IST)

    06 May 2026 09:15 AM (IST)

    मुंबईकरांनो काळजी घ्या! आजपासून पारा चढणार; कोकणासह महामुंबईला 'यलो अलर्ट'

    मुंबई: महाराष्ट्रात निसर्गाचा लहरीपणा नागरिकांची सत्त्वपरीक्षा पाहत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता उन्हाचा तडाखा वाढला असून अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच हवामान विभागाने महामुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.आज, ६ मे पासून मुंबईसह संपूर्ण महामुंबई परिसरात तापमानाचा पारा पुन्हा वाढणार आहे.

     वाढत्या उष्म्यामुळे हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जाहीर केला आहे. समुद्रकिनाऱ्यावरील भागात आर्द्रता वाढल्यामुळे हवेत प्रचंड दमटपणा जाणवेल, परिणामी नागरिकांना घामाच्या धारा आणि अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो.

  • 06 May 2026 09:10 AM (IST)

    06 May 2026 09:10 AM (IST)

    बंगाल निकालानंतर हिंसाचाराचा भडका: आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पेटवले

    आसनसोल (पश्चिम बंगाल): पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांतून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. आसनसोल उत्तर विधानसभा क्षेत्रातील 'कोर्ट मोड' परिसरात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) कार्यालयाला काल रात्री उशिरा समाजकंटकांनी आग लावली. या घटनेमुळे परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

    हे कार्यालय वॉर्ड क्रमांक ५३ च्या तृणमूल नगरसेविका मौसमी बोस यांचे होते. मध्यरात्री लावलेल्या या आगीत संपूर्ण पक्ष कार्यालय जळून खाक झाले असून, शेजारील एका दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे.  घटनेची माहिती मिळताच आसनसोल अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Web Title: Maharashtra desh videsh 6th may breaking marathi news maharashtra india global breaking news live updates politics economics sports entertainment crime stock market agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 09:02 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 
1

Maharashtra Breaking News Updates Today:  राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून दिग्गज नेत्यांची नावे गायब 

Maharashtra Breaking News Updates Today:  नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा उघड
2

Maharashtra Breaking News Updates Today: नेपाळचे पंतप्रधान झाल्यावर बालेन शाह यांचा खरा चेहरा उघड

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?
3

Ethanol Blending: Petrol मध्ये 25% इथेनॉल? तेल संकटात भारताचा ‘हा’ मेगाप्लॅन तुमच्या गाड्यांवर करणार मोठा परिणाम?

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती
4

Maharashtra Breaking News Updates Today: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.