Photo Credit- Social Media छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार?
Maharashtra Politics Latest News: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत थेट अजित पवारांनाच आव्हान देत बंडखोरी केली आहे. अशातच आता छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सोमवारी (23 डिसेंबर) त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने याबाबतच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. छगन भुजबळांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते शांत वाटत होते. त्यानंतर येत्या आठवडाभराच आपण आपली भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ म्हणाले, “मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक गोष्ट आपल्याला सोडवायची आहे. कारण यावेळच्या विजयात ओबीसींचा मोठा वाटा आहे.
Bigg Boss 18 : करणवीर मेहरा रजत दलालमध्ये धक्काबुक्की! राशनच्या टास्कवरून भिडले
दरम्यान, छगन भुजबळ यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली आणि राज्यातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर चर्चा केली. सुमारे 30 मिनिटांच्या या भेटीत भुजबळ यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळही होते. बैठकीनंतर फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळांना राष्ट्रीय राजकारणात पाठवण्याची योजना आखली जात आहे. कारण राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष व्हावा, अशी अजित पवारांची इच्छा आहे. भुजबळ मला मुंबईत भेटले. ते आमचे नेते आहेट. अजित पवारांनाही भुजबळ साहेबांची काळजी आहे. आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना देशाच्या राजकारणासाठी पाठवण्याची चर्चा होती.
तर दुसरीकडे अजित पवारांनी छगन भुजबळांच्या या भूमिकेबाबत मौन बाळगून आहेत. भुजबळांच्या तक्रारींना सडेतोड उत्तर देत, हा पक्षाचा अंतर्गत विषय असून तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, असंही त्यांनी नमुद केलं. तर, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या मोठ्या विजयात इतर मागासवर्गीयांचा महत्त्वाचा वाटा आहे. समाजाच्या हिताला धक्का लागणार नाही याची काळजी घेणार असल्याचं भुजबळ म्हणाले.
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी बीट पनीर कबाब
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले छगन भुजबळ यांनी 1960 च्या दशकात शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजीचे दुकान चालवत होते. त्यांनी 1973 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवकपदाची निवडणूक लढवली आणि जिंकून राजकारणात पुढे गेले. तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर 1991 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र 1999 मध्ये काँग्रेस सोडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यानंतर गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा छगन भुजबळ यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना पाठिंबा दिला होता. ते अजित पवार गटात सामील झाले होते. मात्र, सध्याच्या सरकारमध्ये मंत्री न केल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आता ते अजित पवारांना सोडून भाजपसोबत जाऊ शकतात.