Top Marathi News Today Live : पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; ममता बॅनर्जींनाच 'तृणमूल'च्या अध्यक्षपदावरून काढले
23 Jun 2026 10:30 AM (IST)
IANS शी बोलताना शिल्पाने सांगितले की, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीत तिची थोडी जुनी विचारसरणी आहे. त्याला महिलांचे धूम्रपान अजिबात आवडत नाही. शिल्पा म्हणते की, स्त्री केवळ धूम्रपान, दारू पिऊन किंवा लहान कपडे घालून बोल्ड किंवा आधुनिक होत नाही. धाडसाचा खरा अर्थ काही औरच आहे.
23 Jun 2026 10:20 AM (IST)
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. इथे किशोरवयीन भाऊच कुटुंबाच्या जीवावर उठला आणि एका क्षणातच त्याने हसत्या-खेळत्या घराची राखरांगोळी केली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी केवळ १६ वर्षांच्या मुलाने हातात धारदार शस्त्र घेत आपल्या घरातील तीन जणांचा खून केला. यात भाऊ, वहिनी आणि ३ वर्षांच्या भाच्याचा समावेश आहे. नववीत शिकणाऱ्या मुलाने तिहेरी हत्याकांडाचा रचलेला हा डाव पाहून आजूबाजूचे लोक घाबरले असून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
23 Jun 2026 10:10 AM (IST)
नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील ताजबाग परिसराजवळ असलेल्या एका मदरसा शिक्षकाने तब्बल १० अल्पवयीन विद्यार्थ्यांचा लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. याघटनेने नागपूरच्या सक्करदरा पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.
23 Jun 2026 10:00 AM (IST)
भारतात 23 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,652 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,431 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,989 रुपये आहे. भारतात 23 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,46,520 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,890 रुपये आहे. भारतात 23 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.
23 Jun 2026 09:50 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टरांचा विषय चर्चेचा मुद्दा बनत आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मानसिक तणावात असतात. त्यांच्यावर कामाचा ताण असतो. यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात समुपदेशकांची नियुक्ती केली गेली. मात्र, डॉक्टर म्हणून सेवेत असलेल्या एका तरूण डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली.
23 Jun 2026 09:40 AM (IST)
परळस्थित हाफकिन महामंडळाचे वादग्रस्त व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांची राज्य सरकारने महिन्याभरापूर्वी बदली केली. तर हाफकीन महामंडळाचा कार्यभार रमेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावा, असा शासन निर्णय जारी करण्यात आला असताना देखील महिंद्रकर हे या ना त्या कारणाने केबिनमध्ये अथवा कार्यालयात सतत येत असतात, तर महामंडळाचे शासकीय निवासस्थान नाममात्र शुल्क भरून कुटुंबासह राहत असल्याचेही समोर आले आहे. माजी संचालकाच्या कार्यालयीन हस्तक्षेपाबाबत कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
23 Jun 2026 09:30 AM (IST)
मुंबईवरील जलसंकटाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले असून, त्याचे तीव्र पडसाद सोमवारी महापालिका सभागृहात उमटले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. भविष्यातील तीव्र पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील जलस्रोतांच्या संवर्धनाचा एक स्वतंत्र मास्टर प्लान तयार करावा, तसेच शहरातील बंद पडलेल्या सर्व बोरवेलचे पुनरुज्जीवन करावे, अशी आक्रमक मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली.
23 Jun 2026 09:22 AM (IST)
जिल्ह्यातील नद्यांवरील पाणी उपसाबंदीच्या आदेशामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने नदीपात्रातील पाणी उपसाबंदीच्या आदेशात तात्पुरती शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कृष्णा, कोयना, उरमोडी, तारळी, कुडाळी, वेण्णा, वांग आणि उत्तरमांड या नद्यांवरील उपसाबंदी २६ जूनपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
Marathi Breaking News Updates : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, पक्षांतर्गत बंडाला एक मोठे वळण लागले. उलुबेरिया पूर्वचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्याची आणि ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची घोषणा केली. हा निर्णय बंडखोर गटाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. या नेत्यांनी नवीन संघटनात्मक समितीच्या स्थापनेनंतर लगेचच एक ठराव मंजूर केला.
बंडखोर गटाने ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची नव्याने स्थापन झालेल्या संघटनात्मक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ऋतब्रता गटाची ही बैठक न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये झाली, ज्यात बंडखोर आमदार आणि कोलकाता महानगरपालिकेसह तीन जिल्ह्यांतील ७० ममता बॅनर्जी यांच्या जागी हावडा सेंट्रलचे आमदार अरूप रॉय यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. अभिषेक बॅनर्जी यांच्या निलंबनानंतर, तृणमूल काँग्रेसचे खरे नेतृत्व आणि वैचारिक प्रभाव कोणाकडे आहे, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.






