Maharashtra Breaking News
03 Nov 2025 03:51 PM (IST)
राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या अभिनेता अल्लू अर्जुनला त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार 2025 मध्ये त्यांना ‘मोस्ट व्हर्सटाइल ॲक्टर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
03 Nov 2025 03:40 PM (IST)
यंदा पावसाळ्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले होते. हा आनंदमय सण गोड करण्याचे वचनही दिले होते. मात्र, दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अनुदान जमा झालेले नाही.
03 Nov 2025 03:29 PM (IST)
रत्नागिरी शहरातील वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप परिसरात सकाळच्या सुमारास दोन तरुणांमध्ये जोरदार ‘राडा‘ झाल्याची घटना घडली आहे. सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना थापटांनी मारहाण करणे, शिवीगाळ करणे आणि इतकेच नव्हे तर पोलिसांसमक्षच एकमेकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
03 Nov 2025 03:15 PM (IST)
शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांडवगण फराटा, पिंपरखेड, जांबुत, वडगाव रासाई, शिरसगाव काटा, निमोणे, पिंपळसुटी,नागरगाव, रांजणगाव सांडस इत्यादी गावांच्या परिसरात बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय बनला आहे.
03 Nov 2025 03:06 PM (IST)
बराच काळ तोट्यात असलेल्या व्होडाफोन आयडियाला (Vi) आता एका अमेरिकन कंपनीचा आधार मिळण्याची चिन्हे आहेत. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, अमेरिकेतील गुंतवणूक फर्म टिलमन ग्लोबल होल्डिंग्ज (TGH) व्होडाफोन आयडियामध्ये $4 ते $6 अब्ज (अंदाजे रु. 35,488 ते रु. 53,232 कोटी) गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.
03 Nov 2025 02:56 PM (IST)
प्रत्येक जन्माला आलेल्या बाळाचं घट्ट नातं जुळत ते म्हणजे स्वतःच्या आईशी. बाळाच्या जन्मानंतर रूढार्थानं त्याची आईसोबतची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ तिच्यासोबत आयुष्यभर जुळलेली असते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते.
03 Nov 2025 02:55 PM (IST)
जेव्हा जेव्हा क्रिप्टोकरन्सीची चर्चा होते तेव्हा गुंतवणूकदारांना संमिश्र प्रतिक्रिया येतात. बिटकॉइन असो किंवा इतर क्रिप्टो, बरेच गुंतवणूकदार क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे टाळतात. त्याच वेळी, बरेच गुंतवणूकदार देशात डिजिटल क्रांतीची लाट पाहत आहेत आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करतात. तथापि, जेव्हा आपण परतावा पाहतो तेव्हा वास्तव वेगळे असते. आर्थिक तज्ज्ञ अक्षत श्रीवास्तव यांनी बिटकॉइन आणि पेटीएमच्या कामगिरीची तुलना केली.
03 Nov 2025 02:50 PM (IST)
सातारा : सातारा शहराच्या अस्मितेचा बिंदू असणाऱ्या सातारा नगरपालिकेची निवडणूक तब्बल साडेतीन वर्षांनंतर अखेर जाहीर होण्याच्या मार्गावर आली आहे. प्रशासकांच्या राज्यात विकासाचे दावे झाले असले तरी प्रत्यक्षात पायाभूत सुविधांचा लाभ सातारकरांना किती मिळाला, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनाच्या चर्चांना वेग आला आहे. दोघांमधील सहकार्य की मैत्रीपूर्ण लढत, हे समीकरण अजून स्पष्ट झालेले नाही. इच्छुकांना संधी न मिळाल्यास बंडखोरीचा भडका उडू शकतो, अशी चर्चा आहे.
03 Nov 2025 02:45 PM (IST)
मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून एका महिलेने आपल्या नवजात बाळाची हत्या केली नंतर पतीच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा हल्ला केल्याचे समोर आले आहे. बाळ केवळ २७ दिवसांचा होता. त्याची गळा दाबून हत्या केली. बाळाला वाचवण्यासाठी आलेल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेने गंभीररीत्या जखमी झालेल्या पीडित पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना मध्यप्रदेशातील भिंड येथील मालनपुर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
03 Nov 2025 02:45 PM (IST)
प्रत्येक जन्माला आलेल्या बाळाचं घट्ट नातं जुळत ते म्हणजे स्वतःच्या आईशी. बाळाच्या जन्मानंतर रूढार्थानं त्याची आईसोबतची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ तिच्यासोबत आयुष्यभर जुळलेली असते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबरची साथ कधी सोडत नाही, तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं. अशीच आई आणि मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, ज्याचे नाव आहे 'उत्तर.'
03 Nov 2025 02:40 PM (IST)
अमेरिकेने भारत, चीनसह काही देशांवर आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लागू केल्यामुळे अनेक देशांसोबत तणाव वाढला आहे. त्यातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरही मोठ्या प्रमाणात टॅरिफ लागू केले. त्यावर प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेवर आयात शुल्क लागू केले. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव सातत्याने वाढत चालला आहे. त्यातच दुसरीकडे रशिया आणि अमेरिकेचे संबंधही बिघडत चालले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केलं आहे.
03 Nov 2025 02:35 PM (IST)
विविध सामाजिक, जनहिताच्या मुद्यांवर याचिका दाखल करणारे वकील अॅड. असीम सरोदे यांना मोठा धक्का बसला आहे. एक वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांची ३ महिन्यांसाठी सनद रद्द करण्याचे आदेश देण्यात आहेत. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने ही कारवाई केली आहे. अॅड. विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे.
03 Nov 2025 02:30 PM (IST)
भारतातील पाणी संकट केवळ पाणी टंचाईपुरते मर्यादित नाही. आपण रोज पित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या ग्लासपर्यंत हे संकट एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे पोहोचले आहे.आपल्या आरोग्यासाठी हा गंभीर मुद्दा झाला आहे.एकीकडे भूजलाची पातळी कमी होत आहे, तर दुसरीकडे औद्योगिक प्रदूषण वेगाने वाढत आहे.त्यामुळे जड धातू आणि कीटकनाशकांचे विषारी मिश्रण घरगुती पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहे.माणसाच्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेला पाणी हा मुख्य स्रोतच आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागला आहे. जाणून घेऊयात डॉ.अनिल कुमार, जलशास्त्रज्ञ, युरेका फोर्ब्स यांच्याकडून भूजल संकट आणि त्याद्वारे होणाऱ्या आरोग्याच्या समस्या.
03 Nov 2025 02:22 PM (IST)
मराठी चित्रपटाचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता अशातच आणखी एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. क्षितिज पटवर्धन दिग्दर्शित 'उत्तर' चित्रपटाचे टीझर लाँच झाले आहे.
03 Nov 2025 02:20 PM (IST)
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. ऐन दसरा, दिवाळीत देखील राज्यात पावसाने कहर केल्याचे दिसून आले. आता नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान राज्यात पुस आणखी काही दिवस कोसळणार असल्याचे म्हटले जात आहे. हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
03 Nov 2025 02:15 PM (IST)
झी मराठीवरील तारिणी मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. तारिणी निशीच्या सोबत युवराजचं खरं रूप समोर आणण्यासाठी घरात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी युवराजवर एका ड्रग डीलमधील नुकसानाची रक्कम न भरल्याचा आरोप आहे. या रहस्यामागे नक्की कोण आहे, हे शोधण्याचा निर्धार तारिणी करते. दुसरीकडे, निशी खांडेकरणाच्या घरातील वातावरणात अडकते. पद्मिनी नोकरांना जेवायला सांगते पण जेवण बिघडल्याने घरात गोंधळ होतो. तारिणी ते सावरते. पण कौशिकीच्या मनात संशयाचं बीज पेरलं जातं. दरम्यान, केदार तारिणीला मिस करतोय.
03 Nov 2025 02:05 PM (IST)
सुपरमून हा विश्वातील सर्वात सुंदर आणि दुर्मिळ असा खगोलीय घटनांमधील एक ग्रह मानला जातो. पंचांगानुसार, दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या रात्री एक सुपरमून येतो. यावेळी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ असतो, ज्यामुळे तो मोठा आणि उजळ दिसतो. या काळात बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी एक सुपरमून दिसेल. या दिवशी चंद्र मेष राशीमध्ये संक्रमण करणार आहे. यावेळी ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला आनंद, मन, आई, मानसिक स्थिती आणि वाणीचा कारक मानले जाते.
03 Nov 2025 02:02 PM (IST)
भूल भुलैया फ्रँचायझीमधील सर्व चित्रपट खूप यशस्वी झाले आहेत. आता हॉरर-कॉमेडी फ्रँचायझीचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलीकडेच, दिग्दर्शक अनीस बझमी यांनी "भूल भुलैया ४" वर काम करण्याबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. त्यांनी पुढच्या भागाच्या कलाकारांबद्दल अपडेट दिले आहेत. त्याबद्दल त्यांचे आणखी काय म्हणणे आहे हे आपण जाणून घेणार आहोत.
03 Nov 2025 01:58 PM (IST)
राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूका होत असल्या तरी मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीसह मनसे पक्ष देखील यामध्ये सहभागी झाला आहे. निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये घोळ करत असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात सर्व विरोधकांनी मिळून मोर्चा देखील काढला.
03 Nov 2025 01:50 PM (IST)
चार दिवसांपूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हिंदू भावनांचा अनादर केल्याचा आरोप झाल्यानंतर पंजाबी गायक गॅरी संधू वादात सापडला आहे. या सादरीकरणादरम्यान, संधूने एक प्रसिद्ध हिंदू भक्तिगीत गायले होते, ज्यामध्ये ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडले गेले होते, ज्याचे बोल “चलो बुलावा आया है, ट्रम्प ने बुलाया है” असे होते. आणि आता याच गाण्यामुळे तो वादात सापडला आहे. आणि शिवसेनेच्या रडारवर आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण हे जाणून घेणार आहोत.
03 Nov 2025 01:45 PM (IST)
देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायंस जिओच्या रिचार्ज प्लॅनबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत असतात. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्सचा समावेश आहे. यामध्ये डेटा प्लॅनपासून फक्त कॉलिंगपर्यंत अनेक प्लॅन्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त कंपनी सतत नवीन रिचार्ज प्लॅन्स जोडत असते. यातील काही प्लॅन्सची किंमत खूप जास्त असते तर काही प्लॅन्सची किंमत युजर्सच्या बजेटमध्ये असते.
03 Nov 2025 01:35 PM (IST)
सध्याच्या काळात UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकं अगदी छोट्या खरेदीपासून मोठ्या शॉपिंगपर्यंत सर्वासाठी ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहे. ऑनलाईन पेमेंटचे बरेच फायदे आहेत. या फायद्यांसोबतच काही तोटे देखील आहेत. ऑनलाईन पेमेंटच्या वाढत्या वापरासोबतच फ्रॉडच्या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याच सर्वांचा विचार करून युजर्सच्या सुरक्षेसाठी भारतीय रिजर्व बँक म्हणजेच RBI ने नवीन UPI सुरक्षा गाइडलाइन जारी केली आहे. RBI ने 5 महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, या नियमांचे पालन केल्यास तुमचे बँक अकाऊंट आणि डिजिटल पेमेंट 100 टक्के सुरक्षित राहणार आहे.
03 Nov 2025 01:25 PM (IST)
एका वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर पहिला आयसीसी विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून इतिहास रचला. आता सर्वांच्या नजरा भारतीय पुरुष संघाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या विजय परेडमध्ये भारतीय महिला संघ पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यावर असाच आनंद साजरा होईल का याकडे लागल्या आहेत? बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी याबाबतची त्यांची योजना सांगितली.
03 Nov 2025 01:15 PM (IST)
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाच्या ₹३,०८४ कोटी किमतीच्या ४० हून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आले. जप्त मालमत्तांमध्ये अनिल अंबानी यांचे पाली हिल्स येथील निवासस्थान आहे. ईडीने देशाच्या विविध भागांमध्ये अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या मालमत्ता देखील गोठवल्या आहेत.
03 Nov 2025 01:05 PM (IST)
गुलटेकडी परिसरात राहण्यास असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, दिवंगत साहित्यिक ना. स. इनामदार यांच्या ‘झेप’ बंगल्याची तोडलेली संरक्षित भिंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर बांधकाम व्यावसायिकाने पुन्हा बांधून दिली आहे. या प्रकरणात जबरदस्तीने तसेच पुर्वसूचना न देता भिंत पाडून ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह चौघांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
03 Nov 2025 12:55 PM (IST)
पालघर आणि डहाणू तालुक्यातील अनेक माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकत्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाला बळ दिले आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकांपूर्वी शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली असून, पालघर व डहाणू नगरपरिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, बोईसरचे आमदार विलास तरे, उपनेत्या ज्योती मेहेर, सहसंपर्कप्रमुख केदार काळे, जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, माजी आमदार मनीषा निमकर यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशामुळे दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेना (शिंदे गट) आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
03 Nov 2025 12:50 PM (IST)
भारताच्या मुलींनी अखेर वर्षानुवर्षे सुरू असलेला दुष्काळ संपवला आहे. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर, हरमनप्रीत आणि कंपनीने वर्षानुवर्षे स्वप्न राहिलेले यश मिळवले आहे. टीम इंडियाने पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी ५२ धावांनी पराभव केला. एकेकाळी खेळ निसटत चालला होता असे वाटत असले तरी, कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या एका चालीने दक्षिण आफ्रिकेच्या जबड्यातून विश्वचषक ट्रॉफी हिसकावून घेतली.
03 Nov 2025 12:45 PM (IST)
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत काम, आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. पण काहीवेळा झोप पूर्ण करूनसुद्धा शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. सकाळी उठल्यानंतर अंगात सुस्तपणा जाणवू लागतो, याशिवाय काम करण्याची जास्त इच्छा होत नाही. शरीरात खूप जास्त आळशीपणा जाणवू लागतो. याला जीवनशैलीतील चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात. प्रत्यक्षात केलेल्या काही चुकांमुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यामुळे कायमच आराम करून नाहीतर शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. झोप व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर सुद्धा शरीरात थकवा निर्माण होण्याची शक्यता असते
03 Nov 2025 12:40 PM (IST)
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपींची हातावर नावे लिहिण्यात आली. यामधील आरोपी प्रशांत बनकर आणि गोपाल बदने यांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरुन राज्यभरातील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन छेडण्यात आले आहे. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे.
03 Nov 2025 12:35 PM (IST)
गणेशोत्सवाचा सण कोकणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या उत्सवासाठी चाकरमानी मुंबई, पुणे इतर सर्व शहरांमधून कोकणामध्ये दाखल होतात आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथे एक गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरात एक आगळीवेगळी अशी परंपरा आहे. काय आहे या मंदिराची परंपरा जाणून घेऊया.
03 Nov 2025 12:30 PM (IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवर लागू केलेल्या आयात शुल्काचा म्हणजेच टॅरिफचे विनाशकारी परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. मागील चार महिन्यांत भारताच्या निर्यातीत ३७% घट झाल्याचे समोर आले आहे. ट्रम्प यांच्या आयात शुल्कामुळे भारतातील अनेक उद्योगांवर त्याचे गंभीर परिणार झाल्याचेही दिसून येत आहे.
03 Nov 2025 12:25 PM (IST)
गँगवार अन् टोळ्यांच्या गुन्ह्यांनी शहर रक्तरंजित होत असताना दुसरीकडे स्ट्रीट क्राईमने सर्व सामान्य नागरिकांची “सुरक्षितता” धोक्यात आणली आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांमुळे भीतीच वातावरण निर्माण झालं असून, चैन स्नॅचिंग, मोबाईल लुटमारी तसेच घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांमुळे “भयमुक्त पुणे की गुन्हेगारांचा अड्डा” आहे अशी म्हणण्याची वेळ आली आहे. पोलिस गस्त असूनही गुन्हेगारांना अजिबात भीती उरलेली नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच सामान्य नागरिक “पोलिस आयुक्त साहेब, इकडेही लक्ष द्या ! असे म्हणत धुमाकूळ घालणाऱ्या या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी नम्रविनंती करू लागले आहेत.
03 Nov 2025 12:23 PM (IST)
कोंढव्यात झालेला खून वनराज आंदेकरच्या खूनाचा दुसरा बदला म्हणूनच घडल्याचे समोर आले असून, याप्रकरणी आता बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, स्वारज आंदेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तत्पुर्वी गोळ्या व कोयत्याने वार करून पसार झालेल्या आरोपींना कोंढवा पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
03 Nov 2025 12:00 PM (IST)
शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे चिमुकल्या मुलावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काही वेळात वनविभागाची शार्पशुटरची टीम,ड्रोन टिम घटनास्थळी दाखल होणार. नरभक्षक बिबट्याचा पिंपरखेड परिसरात वनविभागाकडुन शोध सुरु आहे. हिंसक बिबट्यांचा शोध घेऊन गोळ्या घालणार असल्याची माहिती समोर आली आहे. चिमुकल्यावर हल्ला केल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यानंतर वनविभागाकडून बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले.
03 Nov 2025 11:50 AM (IST)
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फलटणमधील मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी करत त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, त्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही करू. राजकारण बाजूला ठेवून, माणुसकीच्या, नैतिकतेच्या नात्याने आम्ही या कुटुंबासोबत आहोत असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला
03 Nov 2025 11:40 AM (IST)
फलडणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर घाटीतील मार्ड या संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद करण्यात आली. बंद पुकारल्याने रुग्ण सेवेवर परिणाम होणार आहे. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी मार्ड संघटनेचे सर्व डॉक्टर आक्रमक झाले आहेत.
03 Nov 2025 11:30 AM (IST)
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार दौरा केला. याच क्षणचित्र शेअर करताना फडणवीस यांनी लिहिले आहे की, आज बिहार दौऱ्यात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मोहिउद्दीननगर विधानसभेतील भाजप उमेदवार राजेश कुमार सिंह, कुधनी विधानसभेतील भाजप उमेदवार केदार प्रसाद गुप्ता, सिमरी बख्तियारपूर विधानसभेतील एनडीए उमेदवार संजय कुमार सिंह, परबत्ता विधानसभेतील एनडीए उमेदवार बाबूलाल शौर्य, फुलवारी विधानसभेतील एनडीए उमेदवार श्याम रजक आणि उजीयारपूर विधानसभेतील एनडीए उमेदवार प्रशांत कुमार पंकज यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभांमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देवासारख्या लोकांना भाजप आणि एनडीएच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
" 'लालटेन' में तेल नहीं और बिहार चलाना बच्चों का खेल नहीं!"
बिहार दौरे के दौरान आज केंद्रीय मंत्री चिराग पासवान जी के साथ मोहिउद्दीननगर विधानसभा भाजपा के उम्मीदवार राजेश कुमार सिंह जी, कुढ़नी विधानसभा भाजपा के उम्मीदवार केदार प्रसाद गुप्ता जी, सिमरी बख्तियारपुर विधानसभा एनडीए के… pic.twitter.com/G6ZMFIi1Ck
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 2, 2025
03 Nov 2025 11:20 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषदेचे (ESTIC) २०२५ चे उद्घाटन केले, ज्यामध्ये एआय, क्वांटम सायन्स आणि इतर क्षेत्रातील ३,००० हून अधिक तज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात १ लाख कोटी रुपयांची नवीन संशोधन, विकास आणि नवोन्मेष (RDI) योजना समाविष्ट आहे, जी स्वच्छ ऊर्जा आणि आरोग्य तंत्रज्ञानातील खाजगी क्षेत्रातील संशोधनासाठी कमी व्याजदराने कर्ज आणि इक्विटी प्रदान करते. २०४७ पर्यंत जागतिक नेतृत्व साध्य करण्यासाठी भारताचा खाजगी संशोधन आणि विकास खर्च GDP च्या ०.७% वरून वाढवण्याचे अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट आहे.
03 Nov 2025 11:10 AM (IST)
इमर्जिंग सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (ESTIC) २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "आज, रिटेलपासून लॉजिस्टिक्सपर्यंत, ग्राहक सेवेपासून मुलांच्या गृहपाठापर्यंत, सर्वत्र AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरली जात आहे. म्हणूनच, भारतातही, आम्ही समाजाच्या प्रत्येक घटकासाठी AI ची शक्ती उपयुक्त बनवत आहोत. इंडिया AI मिशनमध्ये १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जात आहे. आज, भारत नैतिक आणि मानव-केंद्रित AI साठी जागतिक चौकट तयार करत आहे. आमचा येणारा AI प्रशासन चौकट या दिशेने एक मोठे पाऊल असेल. त्याचे उद्दिष्ट नवोपक्रम आणि सुरक्षितता एकत्रितपणे विकसित करणे आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारत जागतिक AI शिखर परिषदेचे आयोजन करेल तेव्हा समावेशक, नैतिक आणि मानव-केंद्रित AI साठीच्या प्रयत्नांना नवीन गती मिळेल. उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये आपली ऊर्जा दुप्पट करण्याची वेळ आता आली आहे. विकसित भारताचे आपले ध्येय साध्य करण्यासाठी देखील हे महत्त्वाचे आहे."
03 Nov 2025 11:00 AM (IST)
उत्तर पेशवाईमधील एक लोकप्रिय कलावंत म्हणून अनंत फंदी ओळखले जातात. मूळचे संगमनेर येथे राहत असलेल्या अनंदी फंदी यांचे खरे आडनाव घोलप होते. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या रचल्या. लोककला आणि लोकसाहित्यामध्ये अनंत फंदी यांचे नाव अजरामर ठरले. त्यांचे तमाशांतील साथी एक मलकफंदी, दुसरे रतनफंदी, तिसरे राघवफंदी आणि चौथे हे अनंतफंदी.त्यांना ‘फटका‘ या काव्यप्रकाराचे जनक म्हणले जाते. आजच्या दिवशी 1819 यांचा मृत्यू झाला.
03 Nov 2025 10:59 AM (IST)
अंतिम सामन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट अमनजोत कौरचा झेल होता, ज्याने दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डला बाद केले, जिने आधीच शतक झळकावले होते. त्या झेलने सामना उलटला आणि भारतीय संघाने कधीही मागे वळून पाहिले नाही, दक्षिण आफ्रिकेचा डाव बाद करून विजेतेपद जिंकले. भारतीय संघाने उपांत्य फेरीत अनेक झेल सोडले. तथापि, अंतिम फेरीत भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच चांगले होते. काही झेल सोडले गेले, परंतु अमनजोतच्या प्रयत्नाने निश्चितच हृदयाचे ठोके वाढवले. डावाच्या ४२ व्या षटकात लॉराने दीप्ती शर्माविरुद्ध मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू हवेत उंच गेला. डीप मिडविकेटवर बसलेली अमनजोत चेंडूची वाट पाहत होती आणि झेल घेण्याचा प्रयत्न करत होती.
03 Nov 2025 10:52 AM (IST)
नाशिकच्या मालेगाव शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यात गोळीबार आणि हाणामारी देखील करण्यात आली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
03 Nov 2025 10:47 AM (IST)
फ्री फायर मॅक्सने पुन्हा एकदा त्यांच्या प्लेअर्ससाठी नवीन रिडीम कोड्स जारी केले आहेत. हे रिडीम कोड्स क्लेम करून प्लेअर्स अनेक धमाकेदार रिवॉर्ड्स जिंकू शकणार आहेत. हे रिडीम कोड्स प्लेअर्ससाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. हे कोड्स 12 ते 16 डिजीटचे असतात. भारतीय प्लेयर्स केवळ भारतीय सर्वरसाठी जारी करण्यात आलेल्या रिडीम कोड्सचा वापर करू शकणार आहेत. गरेनाने जारी केलेल्या आजच्या रिडीम कोड्सबाबत अधिक जाणून घेऊया.
03 Nov 2025 10:40 AM (IST)
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या सीए परीक्षेचे निकाल आज जाहीर करणार आहे. सीए फायनल, इंटरमीडिएट आणि फाउंडेशन या तिन्ही सीए अभ्यासक्रमांचे निकाल आज icai.org आणि icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जातील. आयसीएआय सीए सप्टेंबर २०२५ चा निकाल तपासण्यासाठी रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक यासारख्या तपशीलांची आवश्यकता असेल.
03 Nov 2025 10:31 AM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन बहुप्रतिभावान अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रिया पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. आणि यावेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना एका थरारक कथेत पाहायला मिळणार आहे. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोन्ही अभिनेत्रींचा आगामी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट ‘असंभव’ २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर आणि पोस्टरमुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कथानक, कलाकारांची जोडी आणि टिझर, ट्रेलरमधून निर्माण झालेलं रहस्य यामुळे ‘असंभव’ हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा ठरला आहे.
03 Nov 2025 10:23 AM (IST)
अंतिम सामन्यातील पराभवानंतर लॉरा वोल्वार्ड्टचे भावनिक विधान आले. तिने टीम इंडियाच्या कामगिरीचे कौतुक केले आणि तिच्या संघाच्या पराभवाबद्दल निराशा व्यक्त केली. ती म्हणाली, “मला या संघाचा अभिमान वाटू शकत नाही. टीम इंडियाने खरोखरच चांगले क्रिकेट खेळले. आम्ही हरलो हे निराशाजनक आहे, परंतु एक गट म्हणून, आम्ही भविष्यात यातून बरेच काही शिकू. आम्ही त्या वाईट सामन्यांना मागे टाकण्याचे उत्तम काम केले. काही सामने खूप चांगले होते, तर काही खूप वाईट होते. तथापि, बहुतेक वेळा गोष्टी खरोखरच चांगल्या झाल्या.”
03 Nov 2025 10:16 AM (IST)
Apple सतत त्यांच्या नवीन प्रोडक्ट्सवर काम करत आहे. यासोबतच कंपनी अॅप स्टोअरला सुरक्षित ठेवण्यासाठी देखील सतत प्रयत्न करत आहे. आयफोन युजर्सची सुरक्षा टिकून राहावी आणि अॅप स्टोअरवर कोणतेही चुकीचे अॅप्स उपलब्ध नसावे, यासाठी कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी कंपनीने अलीकडेच दोन डेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने अॅप्स स्टोअरवरून Tea आणि TeaOnHer हे दोन्ही डेटिंग अॅप्स हटवले आहेत. आता हे दोन्ही अॅप्स जगभरातील आयफोन युजर्ससाठी बॅन केले जाणार आहेत. कंपनीने ही कारवाई युजर्सची सुरक्षा आणि प्रायव्हसी लक्षात घेऊन केली आहे.
03 Nov 2025 09:58 AM (IST)
अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली. भारतीय महिला संघाच्या दमदार कामगिरीनंतर टीम इंडियाने इतिहास घडवला आहे. भारताच्या संघाने फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करुन ट्राॅफी नावावर केली आहे. जर या विजयात इतके रक्त आणि घाम गाळणारा कोणी असेल तर तो संघाचा प्रशिक्षक अमोल मुझुमदार आहे, म्हणूनच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर तिच्या मार्गदर्शकाला आदरांजली वाहिली.
03 Nov 2025 09:55 AM (IST)
शहरातील सिडको एमआयडीसी पोलीस ठाणे परिसरात “आय लव मोहम्मद” असे बॅनर लावल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हे बॅनर भाजप कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याविरोधात हालचाल सुरू केली.घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅनर हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने शहरातील संभाव्य तणाव टळला आहे. “आय लव मोहम्मद” हे बॅनर नेमके कोणी लावले आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेण्याचे काम सध्या संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.
03 Nov 2025 09:48 AM (IST)
नाशिक: नाशिकच्या मालेगाव शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या भांडणातून दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यात गोळीबार आणि हाणामारी देखील करण्यात आली. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
Marathi Breaking news live updates : भारताची सलामीवीर शफाली वर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात चांगली कामगिरी केली नाही, परंतु संघ व्यवस्थापनाने तिच्यावरचा विश्वास कायम ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. शेफालीने हा विश्वास साकारला आणि तो खरा केला. तिने जेतेपदाच्या सामन्यात अर्धशतक झळकावत शानदार कामगिरी केली.






