मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना खासदार नवनीत राणा यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली आहे. त्यांच्या याच मागणीला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सणसणीत उत्तर दिले
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले ?
नवणीत राणा आणि संविधानाचा काय संबंध आला? मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा अट्टहास करणाऱ्या रवी राणा आणि नवणीत राणा यांना संविधान कधीपासून कळायला लागलं? संविधानाचा खून करणारी ही लोकं आहेत. संविधानावर त्यांनी बोलू नये. संविधान अनुच्छेद दोन आणि चारनुसारच भारतीय जनता पार्टीचं सरकार बनू शकत नाही. इथे फ्लोअर टेस्ट करावी लागेल. इथे संविधानाने तुमच्यामध्ये आडकाठी आणली आहे,” असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केलाय.
तसेच “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अपेक्षित असणारं सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊ नये यासाठी भारतीय लोकशाहीला धरून महाविकास आघाडी सरकार स्थापन करेन. नवणीत राणा आता संविधान बोलतात आणि विधान परिषदेचे आमदार हनुमान चालिसाच्या भरोशावर निवडून आले असे म्हणतात. एका म्यानामध्ये दोन तलवारी घालणाऱ्या बेगडी लोकांकडून संविधानाच्या बाबतीत आदरयुक्त शब्द म्हणजे नथुराम गोडसेच्या तोंडी महात्मा गांधी यांचा जयजयकार करण्याचा प्रकार आहे,” असंही यावेळी मिटकरी म्हणाले.
[read_also content=”एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांची रात्रीच्या अंधारात भेट? चर्चांना उधाण https://www.navarashtra.com/maharashtra/eknath-shinde-devendra-fadnavis-meeting-in-the-dark-of-night-discussions-abound-nrdm-296953.html”]
नवणीत राणा काय म्हणाल्या होत्या?
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती अतिशय गंभीर असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे कार्यकर्ते असणारे शिवसैनिक आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असताना त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व कुटुंबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा पुरवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.