मध्य रेल्वेचा २२ दिवसांचा पर्यावरण जागृती उपक्रम
रे रोड स्थानकाचा वृक्षारोपणात मोठा सहभाग
मुंबई मंडळाने विक्रेत्यांवर नजर ठेवून प्लास्टिक बंदी राबवली. भुसावळ, नागपूर, पंढरपूर-शेगाव, कलबुर्गी येथे स्काऊट गाईड आणि सांस्कृतिक पथकांनी वातावरण बदलाव पथनाट्य सादर केली. माटुंग्यात कर्मचाऱ्यांसाठी ‘पार्शल पाउच कटिंग’ तंत्रज्ञानाव चर्चासत्र घेऊन मायक्रोप्लास्टिक पर्यावरणात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. विविध ठिकाणी वृक्षारोपणही झाले. ज्यात रे रोड स्थानकाचा मोठा सहभाग होता.
मध्य रेल्वेचे प्रवाशांना करण्यात आले आवाहन
मध्य रेल्वेने आपल्या दैनंदिन कामात शाश्वतता आणि हरित पायाभूत सुविधा आणण्याचा संकल्प केला असून, प्रवाशांनाही स्टेशन परिसर स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त ठेवण्यात सहकार्य करण्याचे आवाहन कैले आहे. प्रवासी पुन्हा वापरता येणारी पाण्याची बाटली, पर्यावरणपूरक पिशवी वापरून आणि स्थानकांवरील वेगळ्या डस्टबिनचा योग्य वापर करून योगदान देऊ शकता, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले.
स्टीकर, बॅनर आणि कार्यशाळांद्वारे जनजागृती
हजारो अधिकारी, कर्मचारी, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना शाश्वत विकास, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि एकल वापर प्लास्टिकच्या निर्मूलनासाठी प्रेरित करण्यात आले. माटुंगा कारखान्याने ऊर्जा बचत आणि जलसुरक्षेचा संदेश देणाऱ्या सुमारे ५० सहभागींच्या मोठ्या रॅलीचे आयोजन केले. वृक्षारोपण आणि पर्यावरण वॉर्केथॉनही घेण्यात आले, प्रवासी सहभागासाठी ‘स्वच्छ प्लॅटफॉर्म, हरित भविष्य’ अंतर्गत प्रमुख स्थानकांवर ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी रंगीत डस्टबिन बसवले, प्लास्टिक बाटल्या क्रश करणारी यंत्रेही बसवून प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘पाण्याची बाटली सोबत ठेवा’ आणि ‘प्लास्टिकला नकार द्या’ या संदेशांचे स्टिकर, बॅनर आणि कार्यशाळांद्वारे जनजागृती झाली.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






