सोलापूरमध्ये पावसाची हजेरी (फोटो- सोशल मीडिया)
सोलापूरमध्ये पावसाची हजेरी
सोलापूरकरांनी लुटला गारव्याचा आनंद
पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून
सोलापूर: रखरखत्या उन्हानंतर अखेर सोलापूरकरांना शनिवारी दिलासा मिळाला. रोहिणी नक्षत्राच्या आगमनाबरोबरच जिल्ह्यात पहिल्या पावसाच्या धारा कोसळल्या. दुपारनंतर अचानक आलेल्या ढगांनी आभाळ भरून आले आणि वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
शहरातील मार्केट यार्ड, एमआयडीसी, विजापूर रोड, सोलापूर रोड परिसरासह ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाला.
अवघ्या अर्ध्या तासात रस्ते ओले झाले. तापमानात घट झाल्याने दिवसभराच्या काहीनंतर सोलापूरकरांनी गारव्याचा आनंद लुटला.
रोहिणीच्या या पहिल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आणली आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना हा पहिला पाऊस म्हणजे खरीप हंगामाची चाहूल घेऊन आला आहे . मागील तीन महिन्यात क** उन्हामुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांनी पहिल्या पावसाचा आनंद पावसात भिजून घेतला चिमुकल्याने अंगावर सरी झेलत नाचत या पावसाचे स्वागत केले.
मृग नक्षत्राच्या पावसाकडे लक्ष
मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात चांगला पाऊस पडला. यंदा रोहिणी नक्षत्राच्या पावसाच्या आगमन झाले, त्यानंतर रोहिणी नक्षत्राचा पाऊस होणार आहे .हा पाऊस पडला तरच पेरणीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
संपूर्ण राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पावसाळा कधी सुरू होणार याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मात्र आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकणात पावसाने हजेरी लावली आहे.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून दाखल; तळकोकणाला झोडपले; आता काही दिवसांतच…
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यांसाह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पावसाळा सुरुवात होणार आहे. लवकरच मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांनी राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. कालपर्यंत मान्सून कर्नाटक आणि गोव्यात दाखल झाला होता. आज अखेर महाराष्ट्रात मान्सूनने धडक दिली आहे. कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.






