रामदास आठवले : आज जळगावमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले म्हणाले, विरोधक संघ आज मुंबई इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. मुंबईची हवा खावी मुंबईचा समुद्र बघावा. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीने त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा आता २६ पक्ष एकत्र आले आहे त्यामध्ये अजून १६ ते १७ पक्ष समावेश होणार आहेत अशी माहिती मला मिळाली आहे. विरोधकांनी त्यांना जेवढा कांगावा करायचा आहे तेवढा करावा मात्र जनता आमच्या सोबत आहे. २०२४ मध्ये मोदींच्या नेतृत्वातच पुन्हा सरकार येईल असे रामदास आठवले म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ज्या मंत्र्यांना जी खाती दिली गेली आहेत. त्यांचे अधिकार त्या मंत्र्यांकडे असतात. तसेच मंत्री मंडळाचे निर्णय हे सामूहिक असतात. ही सामूहिक जबाबदारी असते त्यामुळे सर्व देवेंद्र फडणवीस करणार असं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून अजित पवार निर्णय घेत आहेत. त्यामुळे यात वादाचा विषय नाही. आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष महायुती सोबत राहील. ज्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत त्या ठिकाणी काही जागा आम्हाला द्यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा आणि आम्हाला एक मंत्रीपद द्यावं आणि महामंडळ द्यावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
वर्षा बंगल्यावर आज महायुतीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे, त्या बैठकीला मलाही बोलावणं आलं आहे आणि मी त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. आगामी काळात ही महायुतीच्या माध्यमातून आमचा एकत्र लढण्याचा निर्णय राहील. मात्र काही ठिकाणी निवडणुकांमध्ये जरा मी एकत्र आलो नाही तर त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र निवडणुका लढवू आणि निवडून आल्यानंतर पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करू. या ठिकाणी जागा वाटपाबाबत मत जुळणार नाहीत त्या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवू आणि इतर ठिकाणी महायुतीला पाठिंबा देऊ. २०२९ मध्ये शरद पवार यांच्या सांगण्यावरून भाजपसोबत चर्चा झाली होती. मात्र ती फिसकटली होती त्यानंतर अजित पवार यांनी काही आमदार सोबत घेऊन शपथविधी घेतला मात्र पुरुष आमदार त्यांच्यासोबत आले नाहीत त्यामुळे ते माघारी गेले. आता पूर्ण नियोजन करून अजित पवार सोबत आले आहेत असे रामदास आठवले म्हणाले.