वणव्याचा बागायतदारांना फटका (फोटो- istockphoto)
८ दिवसांत ४ ठिकाणी वणवा लागल्याची घटना
वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन वणवे
दोन बागायतदारांना बसला मोठा फटका
रत्नागिरी: जिल्ह्याच्या विविध भागात बागायती वणवा लागण्याचे प्रकार वाइले आहेत. सध्या थंडीच्या वातावरणामुळे जिल्ह्यातील विविध भागात आंबा कलमांना तसेच काजू कलमांनाही मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे त्यामुळे यावेळी आंबा आणि काजूचे पीक चांगले होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे त्याच वेळी बनव्याचे प्रकार वाढल्यामुळे बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांच्या कालावधीत रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरातील गावांमध्ये आंबा बागायती वणव्यात भस्मसात झाल्या आहेत.
परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील माखरे रामेश्वरवाडी परिसरातील दोन बागायतदारांच्या बागेला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असून, सुमारे लाखीचे नुकसान झाले आहे. ही आग सोमवारी (ता. १२) सकाळी दहाच्या दरम्यान लागली असून, सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत ४० आंबा, काजू कलमे खाक झाली आहेत. रविवारी पाच ठिकाणी लागलेल्या आगीत एका प्रौढाचा होरपाडून मृत्यू झाला होता. वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे बागायतदार चिंतेत आहेत.
South Africa Wildfires : केप टाऊन हादरले! आकाशात धुराचे लोट आणि जमिनीवर आगीचे तांडव; दक्षिण आफ्रिकेत आणीबाणी
८ दिवसांत ४ ठिकाणी वणवा लागल्याची घटना
तसेच त्यांच्या शेजारी असलेल्या पेडेकर खच्या बागेला आग लागून त्याचीही दहा कलमे आगीत भस्मसात झाली. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात तातडीने फिनोलेक्स अग्निशमन दलाला मळाल्यानंतर साडेदहाच्या दरम्यान अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले, त्याने आग विझवण्यास सुरवात केली, तरीही आग आटोक्यात आणण्यात सुमारे दीड तास गेला, तलाठी नामपेकर, उपसरप दिसय वाण बेलिसघटील सुधीर वाळीचे आणि ग्रामस्य घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. त्यामुळे आग आणखी पसरती नाही. अन्यवा आजूकचया बागायतीचे मोठे नुकसान झाले असते, दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात वनवे लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गेल्या आठ दिवसात खरयते, वेली, नाखरे या ठिकाणी दोनपेक्षा वगरी लागून लाखीची हानी झाली आहे. पंचनाम्य इाला असून, भरपाई मिळणार असाली तरी लागणारे वये यावर तीस उपयोजन करण्याची मागणी केली जात आहे.
Turlte News: कासव संवर्धनामध्ये राज्यात गुहागर अग्रेसर; १,४१८ अंड्यांचे संरक्षण
वणवे लागून मोहोर आलेली आंबा, काजूची कलमे खाक होत असल्याने बागायतदारांच्या हंगामावर मोठा परिणाम होणार आहे. यावर्षी झाडांना चांगला मोहोर आता असून, अनेक ठिकाणी मोहोरातून कणी डोकावू लागली आहेत. त्यामुळे फवारणीही जोरात सुरू आहे. अशावेळी वणवे लागून बागा नष्ट होत असल्याने बागायतदार चिंतेत पडले आहेत. तालुक्यात कातळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून आंबा, काजूच्या जागा फुलवण्यात येत आहेत. त्यासाठी प्रचंड खर्च करण्यात येत आहे. पाण्याचीही व्यवस्था कोली जात आहे. ही कलमे पाच वर्षाची झाल्यानंतर उत्पन्न देऊ लागतात. त्याचवेळी कातळावरील गवताला लागलेल्या चष्णव्यात या आंबा बागा खाक होत आहेत. त्यामुळे पाच वर्षे केलेला खर्च, त्यासाठी काढलेले कर्ज यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे.






