कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणा हवेतच
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीला मंत्र्याचा आशीर्वाद असल्याचा आरोप
इटलीतून हद्दपार करण्यात आली आहे मिटेनी कंपनी
रत्नागिरी: कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणा गेल्या अनेक दशकांपासून कोकणवासीय सातत्याने ऐकत आले आहेत. मात्र कोकणचा कॅलिफोर्निया होताना कोणाला दिसला नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. परंतु कैलिफोर्नियापेक्षाही सुंदर असलेल्या कोकणात उद्योगधंद्यांच्या नावावर रासायनिक प्रकल्प आणले जात आहेत. इटलीतून हद्दपार केलेला मिटेनी कंपनीचा रासायनिक प्रकल्प त्यामधील यंत्रणेसह लोटे औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑरगॅनिक नावाने जून २०२५ पासून सुरूही झाला आहे. अत्यंत घातक असा हा रासायनिक प्रकल्प असल्याची माहिती समोर येत असतानाच या प्रकल्पाला केंद्रातील एका मंत्र्याचा आशीर्वाद असल्याचा आरोप सर्वपक्षीय समितीनेच केला आहे.
कोकणच्या पर्यावरणाच्या मुळावर उठणारा हा प्रकल्प तत्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही काळात लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात जोरदार आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांचा आशीर्वाद असल्यामुळे राज्य सरकारच्या यंत्रणेवरही दबाव आल्याची चर्चा आहे.
ठोका ठोका, टाळे ठोका! निसर्गसंपन्न कोकण…; ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’विरुद्ध कॉँग्रेस अन् स्थानिकांचे आंदोलन
सुरू असलेला विरोध तीव्र; आंदोलनात होणार रूपांतर
त्यामुळे उद्योग मंत्र्यांसह राज्य सरकारला या प्रकरणात लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. तसे न झाल्यास या प्रकल्पावरून सुरू असलेला विरोध तीव्र होऊन त्याचे मोठ्या आंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. या कंपनीची उभारणी आणि त्यानंतर या कंपनीतील उत्पादन गुप्त पद्धतीने सुरू झाले आणि रासायनिक घातक प्रकल्प आहे याची कोणाला चाहूल लागू दिली नाही. या प्रकल्पाचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक लोकांची चिंता आहे.
दुर्लक्षामुळे केवळ खासगी हितसंबंधांचे संरक्षण
कंपनीच्या विस्तारामुळे कोकणच्या नैतिकतेला धक्का पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कंपनीमुळे कोकणात होणा-या प्रदूषणामुळे अनेक पर्यावरणीय अडचणींचा सामना करावा लागणार असून, राज्य सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. जर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही, तर या संघर्षाची तीव्रता आणखी वाढेल, असा इशारा विरोधकांनी दिला आहे. जून महिन्यापासून कंपनीचे उत्पादन सुरु झाले असून, राज्याचे उद्योग विभागाने या प्रकल्पाविषयी यापूर्वी योग्य माहिती घेतली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विभागाच्या दुर्लक्षामुळे केवळ खाजगी हितसंबंधांचे संरक्षण होत असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे. तर आता सर्व पक्ष एकत्र येण्याचे संकित देण्यात आले आहेत. यामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, उद्योग मंत्री उदय सामंत यांना स्पष्ट भूमिका घेण्याबाबत सांगितले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीही काही माहिती दिली होती त्यानुसार या कंपनीत एकूण २० उत्पादनांपैकी दोन प्रॉडक्टचे उत्पादन सुरू करण्यात आले आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






