Russian Citizen Beaten Up In Pune The Wife Was Also Shocked Nrdm
पुण्यात रशियन नागरिकाला मारहाण; पत्नीलाही धक्काबुक्की
पुण्यात एका रशियन नागरिकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ता न दिल्याने मारहाण झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
पुणे : पुण्यात एका रशियन नागरिकाला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. रस्ता न दिल्याने मारहाण झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात ३३ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यावरून दुचाकीवरील तीन अनोळखी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे मुळचे रशियाचे आहेत. नोकरीनिमित्ताने ते पुण्यात राहण्यास आहेत. ते एका कंपनीचे सल्लागार आहेत. दरम्यान, रात्री त्यांच्या मित्राच्या घरी पार्टी असल्याने गेले होते. पार्टीवरून ते पायी चालत घरी जात होते. त्यांच्यासोबत त्यांचा श्वान देखील होता. दरम्यान, पाठिमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्याशी रस्ता का देत नाही म्हणून वाद घातला. तसेच, त्यांना मारहाण केली. त्यांची पत्नी भांडण सोडविण्यास आली असता तिला धक्काबुक्की केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Web Title: Russian citizen beaten up in pune the wife was also shocked nrdm