मुंबई : राज्यात सत्तांतर झाले आहे. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोप तसेच ऐकमेकांची उणीधुणी काढण्याचे काम सुरु आहे. तसेच नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात सुद्धा नेते व्यस्त आहेत. दरम्यान, शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत, आज आमदार सदा सरवणकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. (Sada Sarvankar meet to MNS president Raj Thackeray)
[read_also content=”दिलासादायक बातमी! खाद्य तेल स्वस्त होणार, ‘एवढ्या रुपयांनी’ स्वस्त होणार खाद्य तेल https://www.navarashtra.com/india/edible-oil-will-be-cheaper-edible-oil-will-be-cheaper-by-this-much-money-301314.html”]
दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप व मनसे एकत्र आल्याने मनसेच्या एका आमदारानं देखील विधानसभेत भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूनं मतदान केलं आहे. त्यामुळं मनसेची भाजपा व शिंदे गटातील आमदारांशी जवळीक वाढली आहे. आता शिंदे गटातील नाराज आमदार मनसे अध्यक्ष राज यांच्या दरबारी येऊ लागले आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी भेट घेतली. यावेळी त्यांचे पुत्र समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) देखील उपस्थित होते.
भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सरवणकर म्हणाले की, बाळासाहेबांच्या शिवसेनेची आणि मनसेची भूमिका एकच आहे. राज साहेबांना हिंदू जननायक म्हटलं जातं. राज ठाकरेंनी तब्येत नाजूक असताना देखील मला भेटण्यासाठी वेळ दिला. त्यांचा मी नेहमीच आदर करतो, असं सदा सरवणकर म्हणाले. दरम्यान, शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदार सुद्धा राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.