Kalyan Murbad Pickup Viral Video (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर रविवारी घडलेल्या एका घटनेने वाहनचालकांची चांगलीच धडकी भरली. भरधाव वेगात धावणाऱ्या एका पिकअपने काहीकाळ संपूर्ण रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण केले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इतर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. सुदैवाने मोठा अपघात टळला, मात्र या प्रकारामुळे काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवळे गावाजवळ भाजीपाला घेऊन जाणारे पिकअप वाहन अचानक भरकटू लागले. वाहन कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला जात असल्याचे पाहून मागून येणाऱ्या वाहनचालकांना संशय आला. काही अंतरापर्यंत हा प्रकार सुरूच राहिला. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना या वाहनामुळे मोठा धोका निर्माण झाला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखत वेळेत बाजूला होत स्वतःचा जीव वाचवला.
A pickup truck swerving across lanes on Malshej Ghat. Off the road into a puddle, narrowly missing a biker. Then straight into oncoming traffic. Witnesses assumed drunk driving. When they finally forced the truck to stop, the driver was still holding his phone to his ear.… pic.twitter.com/rxqF3TI8Rz — Rajneeti Tadka 🌶️ 🔥 (@RajneetiTadka) July 26, 2026
वाहनाची धोकादायक हालचाल पाहून काही कारचालकांनी आणि स्थानिकांनी एकत्र येत पिकअपचा पाठलाग सुरू केला. योग्य संधी मिळताच त्यांनी स्वतःची वाहने पुढे लावून पिकअपचा वेग कमी केला आणि अखेर ते वाहन थांबवण्यात यश मिळवले. या संपूर्ण घटनेदरम्यान रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण होते. (Kalyan Murbad Pickup Viral Video)
वाहन थांबल्यानंतर चालकाची अवस्था पाहून उपस्थित नागरिकांना धक्का बसला. तो मद्याच्या नशेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. लोकांनी त्याला याबाबत विचारणा केली, मात्र तो कोणाशी तरी मोबाईलवर बोलण्यात व्यस्त होता. त्यामुळे उपस्थितांचा संताप आणखी वाढला. इतरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या चालकाला काही नागरिकांनी चांगलाच जाब विचारला. काहींनी त्याला मारहाणही केल्याचे सांगितले जात आहे.
Soya Chaap Viral Video: सोया चाप खाणाऱ्यांनी सावधान! हा व्हिडीओ एकदा पाहाच
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत केले आणि संबंधित चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वाहनही जप्त करण्यात आले. चालकाने मद्यपान केले होते का, याची खात्री करण्यासाठी आवश्यक तपासणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेचा थरार एका कारमध्ये बसवलेल्या डॅशकॅममध्ये कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये पिकअपची बेफाम धाव, वाहनचालकांची धावपळ आणि अखेरीस नागरिकांनी केलेली कारवाई स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला असून, त्याच्या आधारे पुढील चौकशी केली जाणार आहे.
AC Train Puja: रेल्वेच्या एसी कोचमध्ये पूजा अन् पेटवला दिवा; Viral Videoनंतर सुरक्षेची चिंता वाढली
दरम्यान, याच महामार्गावरील माळशेज घाट परिसरात आणखी एक गंभीर समस्या समोर आली आहे. मुसळधार पावसानंतर रस्त्याचा मोठा भाग खचल्याने वाहनचालकांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. जवळपास शंभर फूट लांबीचा आणि आठ फूट खोल भाग खचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने त्यावेळी त्या ठिकाणावरून कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली.






