फोटो सौजन्य - Social Media
सातारा : 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी सातारा शहराच्या पश्चिम भागात पावसाने दमदार पुनरागमन केले. सुमारे अर्धा ते पाऊण तास कोसळलेल्या जोरदार परींमुळे वातावरणात गारवा पसरला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.
दुपारच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसादरम्यान अनेकदा विजांचा मोठा आवाज झाल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करावा लागला. मात्र सुमारे पाऊण तासानंतर पावसाने उघडीप दिली आणि पुन्हा एकदा ऊन पडले. या पावसामुळे शहराच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून खरीप हंगामासाठीही हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान वारंवार होणाऱ्या जोराच्या मेघगर्जनेमुळे हा पाऊस नक्की मान्सूनचा की मान्सून पूर्व म्हणजेच अवकाळी आहे असाच प्रश्न सातारकरांना पडला आहे.
या पावसामुळे सोमवारी सातारा जिल्ह्यात साजरे होणाऱ्या वटपौर्णिमेच्या व्रत सणासाठी लागणाऱ्या पूजा साहित्य खरेदी तसेच शालेय खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पालक तसेच बालचमु ना मात्र दुपारी जोरदार झालेल्या या पावसामुळे आडोसा गाठावा लागला अनेक अंबा विक्रेते तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांना आडोसा धावा लागला अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली जोरदार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर विशेष करून उतार भागांमध्ये पाण्याचे लोट वाहताना दिसत होते तसेच राजवाडा राधिका रोड नगरपालिका चौक येथे पाण्याची मोठी तळी साचलेली दिसून येत होती .
दमदार पावसाचे सरी पडल्यामुळे सातारकरांनी निश्चिंततेचा सुस्कारा सोडला आहे कारण दास धरणातून होणारा पिण्याचा पाणीपुरवठा पातळी खालवल्यामुळे अनेक भागात कमी प्रमाणात केला जात आहे मात्र या दमदार पावसामुळे पाण्याची पातळी सुधारेल अशी अपेक्षा सादर करीत आहे. 3 दिवस पावसाने दडी मारल्यानंतर झालेल्या या दमदार सरींमुळे शहरातील वातावरण प्रसन्न झाले असून, पुढील काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.उशिरा का होईना परंतु सुरू झालेल्या या पावसामुळे आता शेतीच्या मशागतीच्या कामांना वेळ घेणार असून अनेक ठिकाणी कोळंबलेल्या पेरण्यानाही सुरुवात होईल.






