मुंबई : केंद्रातील मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे थेट दादागिरी करत धमकी देत आहेत. शिंदे फडणवीस यांचं सरकार (Shinde fadnvis government) गुन्हेगारांना पाठीशी घालून दादागिरी करत उघडपणे धमक्या देत फिरत असेल तर असे दादागिरी करणारे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी आमची आणि सामान्य जनतेची मागणी असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादात आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar) यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. अशा आमदाराला माझा मित्र असल्याचे म्हणत केंद्रातील मंत्री भेटत असतील आणि मुंबई व महाराष्ट्रात फिरायचं आहे ना अशा धमक्या देत असतील तर राज्यातील हे सरकार गुंडांचं सरकार आहे का असा सवाल करत दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
[read_also content=”एकरकमी एफआरपी द्या, अन्यथा कारखाने चालू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा https://www.navarashtra.com/maharashtra/give-frp-otherwise-sugar-factory-not-working-raju-shetty-325117.html”]
दरम्यान, मुंबई व महाराष्ट्र शिंदे भाजप यांना आंदण म्हणून दिल आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) आहेत, ते जर राज्यात कायदा व सुव्यस्था राखू शकत नसतील आणि अशाप्रकारे गुंडगिरी व दादागिरी होत असेल तर अशा सरकार ला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचा दानवे म्हणाले.