मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेवर (Mumbai corporation election) झेंडा फडकविण्यासाठी भाजपा तयार झाली आहे. मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हालचालींना वेग दिला आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळं (OBC reservation) पालिका निवडणूक लांबणीवर गेली आहे. पण पुढील दोन ते तीन महिन्यात मुंबई पालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळं सर्वंच पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर मागील अनेक वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेच्या (Shivsena) झेंडा आहे, यामुळं पालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, तसेच ही निवडणूक शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची तसेच अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळं पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Udhav Thackeray) कंबर कसली असून, आज शिवसेना भवनमध्ये माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. (Meeting of former corporators in Shiv Sena Bhavan)
[read_also content=”खात्यासाठी मंत्र्यामध्ये स्पर्धा होईल, खातेवाटप लवकर होईल असं वाटत नाहीय – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/cabinet-ministers-for-department-will-be-fight-jayant-patil-315350.html”]
दरम्यान, जे कुणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही. शिवसैनिक आपल्यासोबत आहेत. लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे. जनतेची कामे करत राहा. सामाजिक बांधिलकी सोडू नका, वॉर्डामध्ये फिरा अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मुंबईतील यामिनी जाधव, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे या चार आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर, खासदार राहुल शेवाळे आणि नगरसेविका शीतल म्हात्रे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच, ठाकरे सरकारने प्रभाग रचना बदलण्याच्या निर्णय शिंदे सरकारने बदलला, यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील गणिते बदलणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे गटाकडून शिवसेनेला मोठ्या प्रमाणात खिंडार पाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका. कोणत्याही परिस्थितीत महापालिका निवडणूक जिंकायचीच आहे. त्यासाठी तयारीला लागा. ही महापालिका निवडणूक तुमच्याच जीवावर जिंकणार, असं बैठकीत उद्धव ठाकरेंनी सांगितले.
प्रभाग रचना निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार?
शिंदे सरकारने २०१७ ची वॉर्ड रचनाच पुन्हा तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला. नव्या वॉर्ड रचनेत पुन्हा एकदा आरक्षणे बदलण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे पुन्हा निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नव्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय शिवसेना लवकरच घेणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पक्षाच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. आगामी पालिका निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यात आले. तसेच निवडणुकीसाठी कोणती रणनिती वापरायची, निवडणूक कशी लढवायची आदी बाबीवर सुद्धा चर्चा झाली.