मुंबई : आज पावसाळी अधिवेशनाचा (Monsoon session) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, काल विधानभवनाच्या (Vidhanbhavan) पायऱ्यांवर विरोधक व सत्ताधारी यांच्यात तुंबळ हाणामारी घडली ती साऱ्या देशाने पाहिली. यामुळं आज अधिवेशनातील शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज विधानसभेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काही महत्त्वाची निर्णय घेतल्याचे सांगितले तसेच काही घोषणा सुद्धा केल्या.
दरम्यान, या अधिवेशनात (Adhiveshan) तीन ठराव मंजूर करण्यात आले. औरंगाबादचं संभाजीनगर (Aurangabad, sambhajinagar) नामांतर तर उस्मानाबदचं (Osamanabad dharashiv) धाराशीव नामांतर करण्यात आले. आणि नवी मुंबईतील विमानतळाला दिवगंत दि.बा. पाटील (Navi Mumbai D B Patil) यांचे नाव देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली.
[read_also content=”पायऱ्यांवर घडलेल्या हाणामारीवर राज ठाकरेंचा सत्ताधारी-विरोधकांवर हल्लाबोल, म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/mns-chief-raj-thackeray-rection-on-mla-rada-in-vidhabhavan-319333.html”]
दरम्यान, डान्सबारबाबत (Dance Bar) सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील अनेक डान्सबार बंद केले आहेत, त्यामुळं हळूहळू राज्यातील अनेक भागातील डान्सबार बंदर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र गुन्ह्यांमध्ये अकराव्या क्रंमाकावर आहे, गुन्हेगारीचा कणा मोडण्यासाठी मोक्कामध्ये वाढ करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच अंमली पदार्थबाबत 6622 गुन्हे दाखल झाले आहेत, राज्यात अपहरणामध्ये वाढ होत आहे, ज्येष्ठाच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आज विधानसभेत अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वरील सर्व माहिती दिली.