फोटो सौजन्य: गुगल
म्हाडाच्या कोकण विभागातील 2,147 घरांसाठी सोडतीचा निकाल ठाण्यात काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे आयुक्त संजीव जायसवाल आणि VC द्वारे अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. शिंदे म्हणाले की, गृहनिर्माण प्रकल्पामध्ये 2147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी आजची ही सोडत होती आहे.सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळाला पाहिजे चांगलं घर मिळालं पाहिजे. परवडणाऱ्या किंमतीमध्ये घर मिळाला पाहिजे. अडीच वर्षात अनेक प्रकल्प मार्गी लावण्याचे काम केलं.या अडीच वर्षात आम्ही अनेक प्रकल्प मार्गी लावले.स्पिडब्रेकर दूर केले. म्हाडाची 2100 घर आहे मात्र . 31हजार दोनशे लोकांनी या घरांची मागणी केली. त्यामुळे आता म्हाडाच्या घरांची विश्वासाहर्ता आता वाढली आहे.
शिंदे पुढे असंही म्हणाले की, डेव्हलपरला आम्ही सांगतो चांगले काम कर गळती नको स्पष्ट सूचना आम्ही दिल्या आहेत. लोकांना चांगली घरे मिळायला हवी हा आपला अजेंडा आहे.आपण जमिनी वरचे लोक आहोत. प्रोटोकॉल बाजूला ठेऊन काम करतो..जेव्हा जेव्हा सोडतीचा कार्यक्रम असतो तेव्हा मी नेहमी येतो ज्यांना घरे लागतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो..आम्ही गृहनिर्माण योजना करतोय. परवडणारी घरे ज्येष्ठ न साठी, स्टूडेंट हॉस्टेल, गिरणी कामगारांना घरे हवेत त्यांना देखील आम्ही घरे देणार आहोत. असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
डबेवाल्यांसाठी सदनिका योजना
एकनाथ शिंदे पुढे असंही म्हणाले की, म्हाडाच्या सदनिकांसाठी मुंबईतल्या डबेवाल्यांना देखील याचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर
पत्रकारांचे काम अवघड असते. त्यांना देखील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करावं लागतं त्यांच्यासाठी देखील म्हाडामध्ये घरे आहेत. या शासकीय गृहनिर्माण प्रकल्पात पारदर्शकता असायला हवी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.म्हणून म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकांचा विश्वास आहे. याचपार्श्वभूमीवर ठाण्यात पाच ठिकाणी कामं सुरु आहेत. येत्या ९ तारखेला अनेक ठिकाणी ठाण्यात भूमिपूजन होणार आहे. तसंच पुढील वर्षात दोन लाख दोन लाख घरे बांधणार आहोत,हे म्हाडाचं टार्गेट आहे, असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.